हरभरा व्यवस्थापन
हरभऱ्याची पट्टा पद्धतीने लागवड करावी. त्यासाठी पेरणी करतांना मध्ये मध्ये एक ओळ रिकामी ठेवा जेणे करून कीटकनाशकांची फवारणी करणे सोपे होईल, स्प्रिंकलरचे पाइप टाकण्यासाठी जागा उपलब्ध होइल अन्यथा या ओळीत सऱ्या पाडून पाणी देता येइल. याशिवाय पिकाला पसरण्यासाठी जागा उपलब्ध होऊन, फांद्याची संख्या वाढेल व जास्त घाटे लागतील.
बियाणे ४ सेंटीमीटर खोल पेरले जाईल असे बघावे जेणेकरून पुरेशी ओल मिळून अंकुरण उत्कृष्ट होईल. जाड टरफलाचे हरभरा बियाणे पेरणीच्या एक दिवस आधी पाण्यात साधारणतः ४ ते ६ तास भिजवावे व हवेशीर ठिकाणी पातळ थरात पसरून अतिरिक्त ओलसर पणा कमी करावा. बुरशीनाशकासोबत ह्युमोल जेली व सुपरजिब ची प्रक्रिया बीजांकुर वेगाने वाढायला मदत करतात.
बीजप्रक्रियेत ह्युमोल जेली चा वापर केल्याने मूळकुज ला रोगप्रतिकार क्षमता वाढते, पांढरी मुळे विकसित होऊन रोपांची वाढ जोमात होते.
सुरवातीच्या अवस्थेतील रोपे सुकण्यास सुरवात होत असेल तर मुळकुज झाली आहे असे समजावे. मुळकुज टाळण्यासाठी शेत तयार करतांना हूमणासूर चा वापर करावा तसेच बीजप्रक्रिया करावी.
हरभऱ्याची वाढ जोमदार झाली म्हणजे घाटे जास्त लागतील हा समज चुकीचा आहे. उलटपक्षी उत्पादनात घट संभवते. असे होऊ नये म्हणून अतिरिक्त वाढ रोखणे आवश्यक आहे. आमचे ऑक्सिजन हे उत्पादन यासाठी उपयुक्त आहे.
घाटे अळी च्या नियंत्रणासाठी कामगंध सापळे वापरले जावू शकतात. इथे क्लिक करून खरेदि करून ठेवा. थंड व कोरड्या जागी किंवा फ्रीज मध्ये खालच्या कप्यात ठेवल्यास १ ते २ वर्ष टिकून रहाते.
हरभऱ्यात अनेक विषाणूजन्य रोग पसरू शकतात त्यात बुशी स्टंट व्हायरस, डीस्टोरशन मोसाइक व्हायरस, फिलीफोर्म व्हायरस, अल्फा मोसाईक व्हायरस, नैरो लीफ बिन यलो मोजाईक व्हायरस, नेक्रोटिक यलो व्हायरस, पी स्ट्रीक व्हायरस ईत्यादि विषाणूंचा समावेश आहे. हे विषाणू कीटकांच्या माध्यमातून पसरतात. कीटकनाशक फवारण्या करून फारसा उपयोग होत नाही कारण फवारणी ची वेळ येईल पर्यंत मोठ्या प्रमाणात विषाणू पसरलेला असतो. सुरवाती पासून शेतात स्टिकी ट्रॅप लावायला हवीत.
घाट्यात दाणे भरायच्या अवस्थेत जंगली डुक्कर उपद्रव घालू लागतात. डुकरांचा अटकाव करता येतो त्यासाठी एका वेळी एका पेक्षा जास्त पद्धतींचा वापर करायला हवा. स्वस्त पर्याय म्हणून आपण आमचे भागमभाग उत्पादन शेता भोवती पसरवू शकता. जंगली श्वापदांना दूर ठेवायला हे मदत करते.
हरभऱ्या बद्दल आमचे इतर लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा
पुन्हा भेटू पुढील भागात तो पर्यंत तुम्ही आमची हि पोष्ट फेसबुकवर शेअर करायला विसरू नका, हि पोष्ट व्हायरल व्हायला हवी ना!
तंत्रज्ञान म्हणजे काय हे जाणून घेण्यसाठीइथे क्लिक करा. |
हरभरा व्यवस्थापन लेख आवडला
अधिक उत्पादन देणाऱ्या जाती विषयी माहिती सांगावी !
Ok Thanks for the imipramine
.
khup chan mahiti aahe v.kharokhar harbara perni purv mahiti dili karan he pudhil problem ase kitek vela baghyla milale aahe
Thanku patil sir
खुप छान.