Call 9923974222 for dealership.

लागवडीत निवडक सुधारणा करून वाढवा भुईमुग उत्पादन

 • १५ जानेवारी ते 15 फेब्रुवारी या काळात पेरणी करावी, त्याअगोदर केल्यास थंडीमुळे उगवण कमी होते (खरिपा चा भुईमुग जूनचा शेवटचा आठवडा ते जुलैचा पहिला आठवडा)
 • भुईमुगाची लागवड पाण्याचा चांगला निचरा होणार्‍या जमिनीतच करावी
 • जमीन तयार करतांना ३ टन प्रती एकर या दराने सेंद्रिय खता सोबत, एकरी ३ किलो हुमणासूर, ७० ते ९० किलो क्रांती १०-५-१० हे जिप्सम युक्त भूसुधारक,२० किलो युरिया, १२५ किलो एस एस पी मिसळून द्यावे 
 • ------------------

  फेसबुक, व्हाटसएप व टेलेग्राम वरीलआमच्या सोशल गृप्सला जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा आणि वेळो वेळी प्रसारित होणारे लेख नियमित मिळवा.

  ------------------

 • बीजप्रक्रिया: प्रतिकिलो २५-५० ग्राम ह्युमोल जेली + ३ ग्राम थायरम किंवा 2 ग्राम कार्बेन्डाझीम
 • दाण्याच्या आकारानुसार ८० ते  १२५ किलो बियाणे प्रती हेक्टरी लागते, टोकन पद्धतीने पेरणी केल्याने बियाण्यात २५ % बचत केली जावू शकते.
 • पसाऱ्या, निमपसाऱ्या व उपट्या या तीन प्रकारानुसार कमी जास्त बियाणे लागते
 • एमेझोनवर उत्तम दर्जाचे साधन उपलब्ध आहे त्याच्या मदतीने बी ५ से.मी. खोल पेरता येते, मजुरी खर्चात व वेळेची मोठी बचत शक्य होते.त्याची लिंक इथे दिली आहे.
  प्लास्टिक मल्चिंग पेपर चा वापर केल्याने उत्पादनात वाढ होते कारण 

  बियाण्यां नुसार शेंगदाण्याची उत्पादकता, प्रादेशिक उपयुक्तता

  • एस.बी- 11 (545 किलो/एकर); संपूर्ण महाराष्ट्र
  • टीपीजी-24 (1015 किलो/एकर); संपूर्ण महाराष्ट्र
  • फुले उनप जे.एल.-286(718 किलो/एकर); पश्‍चिम, उत्तर महाराष्ट्र
  • टीपीजी-41 (828 किलो/एकर); पश्‍चिम, उत्तर महाराष्ट्र
  • जे.एल.501(968 किलो/एकर); संपूर्ण महाराष्ट्रासाठी
  • आरएचआरजी 6083 फुले उन्नती (1015 किलो/एकर); संपूर्ण महाराष्ट्रासाठी
  • आरएचआरजी 6021(1015 किलो/एकर) पश्‍चिम महाराष्ट्रासाठी

  "संकटे "खुजी" करायची लक्षवेधी योजना" या नावाचा एक लेख आम्ही या पूर्वी प्रसिद्ध केला होता. यात निसर्गाला गुरु मानून त्याच्या रचनेतून प्रेरणा घेण्याचे व अपयश टाळण्याचे सुचवले होते. अतिरिक्त तयारी, विविधता, विवेकशीलता, लवचिकता, ऐक्य यांचा वापर आपण भुईमुगाच्या नियोजनात करू शकतो का?

  • उन्हाळ्यात जलव्यवस्थापन हि एक मोठी अडचण असू शकते. त्या दृष्टीने आपण काय अतिरिक्त तयारी करू शकतो? ठिबक वापरले तर पाणी मुळातच कमी लागेल. मल्चिंग वापरले तर बाष्पीभवन कमी होऊन लागणाऱ्या पाण्याची गरज अधिक कमी करता येईल. 
  • एकच बियाणे वापरले व त्यावर काही रोगराई आली तर उत्पादनात घट येईल. जर आपण विविध बियाणे वापरले तर सरासरी उत्पादन वाढेल व नुकसान टळेल. 
  • सर्व उत्पन्न एकाच व्यापाऱ्याला विकण्याऐवजी आपण अगोदरच नियोजन केले तर आपण ओल्या शेंगा, कोरड्या शेंगा, शेंगदाणे, तेल याच्या विक्रीतून आपला नफा वाढवू शकतो. यात आपला विवेक व लवचिकता कारणी लागेल.
  • आपले क्षेत्र कमी असल्याने आपणास विक्रीव्यवस्थापन करण्यात जास्त कष्ट लागतील. अशी समस्या असली तर एकीचे बळ वापरू शकता. त्यासाठी इतर शेतकरी बांधवांना सोबत घ्या. 


  मित्रहो, संकटे "खुजी" करायची लक्षवेधी योजना या लेखाच्या संदर्भातून वर मांडलेले कोणते मुद्दे आपणास योग्य वाटतात? कोणते मुद्दे योग्य वाटत नाही? आपण अजून काय सुचवू इच्छिता? 

  "संकटे "खुजी" करायची लक्षवेधी योजना" हा लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

    

  या पिकासाठी पाटील बायोटेक तंत्रज्ञान उपलब्ध आहे.

  तंत्रज्ञान म्हणजे काय हे जाणून घेण्यसाठी

  इथे क्लिक करा.

  4 comments

  • अगदी उपयोगी आणि महत्वाचे लेख आहे.. आणि आपल्या पाटील boitech च्या लेख वरून खूप काही शिकायला मिळाले त्या बदल पाटील समूहाचे आम्ही नेहमीच ऋणी राहू

   शिवाजी जेऊरे
  • ठिक आहे

   Vijay Yelure
  • Khup Chan shetakaryana jagnyachi navi disa denyache kary apan karat ahat

   ketan kakde
  • Very good

   chandrakant Dattatraya Dhawale

  Leave a comment

  Name and Mobile number .
  .
  Message with Address, District & Pincode .

  Please note, comments must be approved before they are published