भुईमुगातील कीडनियंत्रण
"लागवडीत निवडक सुधारणा करून वाढवा भुईमुग उत्पादन" या ब्लॉगमध्ये आपण लागवडीबद्दल माहिती घेतली आहे. आपल्या प्रदेशानुसार आपण कोणते वाण निवडावे व अपेक्षित उत्पादकता किती याविषयी चर्चा देखील केली आहे. आपण वाचली नसेल तर या ब्लॉगखाली लिंक देत आहे ती नक्की पहावी. या भागात आपण कीडनियंत्रणाविषयी माहिती मिळवू.
इतर सर्व पिकाप्रमणे भुइमुगात देखील काही किडी नियमित येतात. भुईमूग उगवणीनंतर ३० ते ६० दिवसांचा काळ विशेष करून महत्वाचा असतो. याच दरम्यान मावा, फुलकिडे, तुडतुडे, पांढरीमाशी, पाने गुंडाळणारी अळी व पाने खाणा-या अळ्या या किडींचा धोका मोठा असतो. जर या काळात दुर्लक्ष झाले तर मोठा तोटा संभवतो.
पिकाच्या नियमित निरीक्षणातून आपण या किडींवर लक्ष ठेवू शकतो. लपून बसणाऱ्या, उडणाऱ्या रससोशक किडींच्या निरीक्षणा साठी निळे व पिवळे चिकट सापळे अतिशय उपयुक्त आहेत. एक एकर क्षेत्रात ७ पिवळे व ३ निळे चिकट सापळे लावल्यास यावर चिकटून बसलेल्या किडींचे निरीक्षण करून, त्यांचे प्रमाण बघून आपण आवश्यक पाउल उचलू शकतो.
------------------
पाटील बायोटेकचे नियमित प्रसारित होणारे फेसबुकलाइवचे व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
------------------
कोणत्याही पिकाप्रमाणे भुइमुगात देखील संतुलन पोषण केल्यास पिकाची रोग व कीड प्रतिकारशक्ती वाढते. संतुलन पोषणामुळे उत्पादकता देखील टिकून रहाते. पिक वाढीच्या टप्प्या नुसार आपण योग्य खते द्यायला हवीत?
प्रार्थमिक खताच्या बाबतीत, सुरुवातीच्या काळात अमृत गोल्ड १९-१९-१९ व १३-४०-१३ हि खते दिल्याने पिकाची वाढ योग्य वेगाने होते. पिक फुलावर यायच्या वेळी अमृत गोल्ड १२-६१-०० व ००-५२-३४ हि खते दिल्याने चांगला बहार येतो तर दाने भरले जाण्याच्या काळात अमृत गोल्ड ००-००-२३, १३-००-४५ व ००-००-५० यांचा वापर केल्याने दाणे चांगले भरतात, पोचे रहात नाहीत.
नाव दुय्यम असले तरी हि खते योग्य प्रमाणात आवश्यकच असतात. लागवडी नंतर पिक वाढीत पडले कि, त्यानंतर फुले लागतील तेव्हा व त्यानंतर दाणे भरायचे वेळी अमृत प्लसची आळवणी (एकरी एक कीट) करावी. असे केल्याने पांढरी मुळे जोमाने वाढतात व त्यामुळे खतांचे चांगले शोषण शक्य होते. खते उचली जातात. मृदेची तयारी करते वेळी ह्युमेग दिलेले नसेल तर अमृत प्लस सोबत एकरी एक किलो दराने द्यावे. अमृत कीट मधील घटक प्रथिन व स्निग्ध (तेल) निर्मितीत महत्वाची भूमिका बजावतात.
पिकास सर्वच पोषक तत्वे भारंभार प्रमाणात लागत नाहीत. काही पोषक तत्वे अगदी सूक्ष्म प्रमाणात लागतात पण त्यांची कमतरता झाल्यास उत्पादकतेत व रोग-कीट प्रतिकारशक्तीत खूप खालावते व मोठे नुकसान होते. असे होऊ नये म्हणून सूक्ष्मअन्नद्रव्ये वेगवेगळी देण्याएवजी मिश्र स्वरूपातीलच द्यायला हवी ज्यामुळे खत मात्रेचे संतुलन टिकून रहाते. सुरवातीला मशागत करते वेळी मायक्रोडील ग्रेड १ एकरी १० किलो मातीत मिसळून द्यावे. असे करण्यात काही दिरंगाई झाल्यास किंवा पानांवर कमतरतेची लक्षणे आढळून आल्यास पिकवाढीच्या काळात मायक्रोडील सुपर सिक्स या खताची दोन ते तीन वेळा ०.५ ग्राम प्रती लिटर दराने फवारणी करावी.
आपल्या क्षेत्रात कोणती इतर पिके उभी आहेत किंवा कोणती पिके अलीकडील काळात घेतली गेली याची शेतकरी बांधवांनी नोंद घ्यायला हवी. भुईमुग लागवडीच्या परिसरात कापूस, एरंडी, चवळी, सुर्यफुल, हरभरा, मका, भेंडी, बटाटे, टमाटे, तंबाखू, गुलाब अशी पिके घेतली असतील तर भुईमुगात पाने खाणारी अळी किंवा तंबाखू अळी यायची शक्यता वाढते. अशी कीड येवू नये म्हणून सुरवाती पासून काही प्रमाणात कामगंध सापळे लावून ठेवले तर निरीक्षण करणे शक्य होते. जर यात पतंग वारंवार आढळून येत असतील तर सापळ्यांची संख्या वाढवल्याने किडीची संख्या नियंत्रणात ठेवणे शक्य होते. भुइमुगात लावायचे सापळे आपण खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून खरेदी करू शकता.
भुइमुगात प्रकोप करणाऱ्या किडी, पिकात दिसून येणारे त्यांचे परिणाम व त्यावर शिफारस करण्यात आलेली औषधे, औषधांची व्यापारी नावे यांची माहिती आपल्याला असणे आवश्यक आहे. आपण हि माहिती नोंदवहीत लिहून घ्यावी जेणे करून गरजेच्या वेळी वापरता येईल.
नागअळी/लीफ मायनर
हि कीड भुईमुगा व्यतिरिक्त सोयाबीन, तूर व आयुर्वेदिक पिक "बकुची" मध्ये आढळून येते. इतर किडीप्रमाणे या किडीच्या देखीव वेगवेगळ्या वाढीच्या अवस्था असतात. अंड्यातून बाहेर आलेला लार्वा रंगाने हिरवा असतो. त्याचे डोके काळे असते. ज्या प्रमाणे खाण कामगार जमिनीखाली भुयारे खोदत बोगदा बनवत जातात त्या प्रमाणे हा लार्वा पानाच्या मध्ये फिरत फिरत पानातला हिरवा गर खातो व मागे एक पांढरी रेषा सोडतो. पानाच्या वरील बाजूस मध्य शिरेच्या भोवती बारीक फोड दिसून पडतात. पुढे पानावर तपकिरी डाग पडतात, पाने वळतात व वाळतात. याचा प्रौढ छोटा, डार्क तपकिरी रंगाचा असतो व त्याच्या पंखावर पांढरा ठिपका असतो.
शिफारस केलेली कीटकनाशके
क्विनॉलफॉस २५ ईसी-इकालक्स, फ्लॅश, बेरुशील, वज्र, कीनालक्स, सुक्विन, क्विनॉलटॉफ, कुश, क्विनगार्ड, मिलक्स - १.५ ते ३ मिली प्रती लिटर, काढणी अगोदर ३० दिवसा पर्यंत वापरू शकतात.
लॅमडा- सीहॅलोथ्रीन ५ ईसी-रिवा, कराटे, एजंट प्लस, रूद्रा, ब्रॉव्हो ५०००, संत्री - ०.५ मिली प्रती लिटर, काढणी अगोदर १० दिवसा पर्यंत वापरू शकतात.
डेल्टामेथ्रीन २.८ टक्के प्रवाही - डेसिस, डिकामेथ्रीन, डेकागार्ड - १ मिली प्रती लिटर, काढणी अगोदर ३ दिवसा पर्यंत वापरू शकतात.
लाल केसाळ अळी
अतिशय खादाड असलेली लाल केसाळ आली भुईमुग, काजू, एरंडी, काकडी, चवली, डाळवर्गीय पिके, बाजरी व रुई वर आढळून येते.
नियंत्रणासाठी डायक्लोरव्हास ७६ ईसी (नुवान, वॉपोन, डुम, सुक्लोर, व्हॅन्टॉफ, लुहोन, कोच) या कीटकनाशकाची शिफारस करण्यात आलेली असून ०.५ ते १.० मिली प्रती लिटर च्या दराने फवारणी करावी.
मावा
हि कीड देखील खूप खादाड असून भुईमुगा सोबत चवळी सारख्या द्विदल पिकात मोठा घात करतात. ५० पेक्षा अधिक व्हायरस यांच्या माध्यमातून फसरू शकतात जे अधिक धोकेदायक आहे.
या किडीच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रीड १७.८ एस.एल हे कीटक नाशक शिफारसीत केलेलं असून १५ लिटर साठी २-४ मिली चा डोस आहे. या कीटकनाशकाची व्यापारी नवे टाटामिडा, कॉन्फीडॉर, ॲटम, व्हिक्टर, सुनर, सिमर, मिडा, इमीग्रीन, इमीडा गोल्ड, चेमिडा, इमिडा सेल, महाराजा व सनसेक्स अशी आहेत. काढणीच्या ४० दिवस अगोदर कीटकनाशकाचा उपयोग थांबवायचा आहे.
तुडतूडे (बारीक नाकतोडा)
तुडतूडे हि कीड सर्वपरिचित असून याची पिल्ले व प्रौढ पानात विष सोडतात. यामुळे शिरा पांढरया पडतात व पानावर पिवळे डाग पडतात. असे डाग शक्यतो टोकावर पडतात व त्याचा आकार इंग्रजीतील व्ही (V) अक्षरा प्रमाणे असतो. जास्त प्रकोप झाल्यास संपूर्ण पिकाच पिवळे पडते. मित्रहो या किडीच्या नियंत्रणासाठी खाली दिलेली कीटकनाशकांची शिफारस केलेली आहे.
इमिडाक्लोप्रीड १७.८ एस.एल. -टाटामिडा, कॉन्फीडॉर, ॲटम, व्हिक्टर, सुनर, सिमर, मिडा, इमीग्रीन, इमीडा गोल्ड, चेमिडा, इमिडा सेल, महाराजा, सनसेक्स (डोस वर दिल्या प्रमाणे)
लॅमडा- सीहॅलोथ्रीन ५ ईसी (रिवा, कराटे, एजंट प्लस, रूद्रा, ब्रॉव्हो ५०००, संत्री) डोस ०.५ मिली प्रती लिटर
क्विनॉलफॉस २५ ईसी-इकालक्स, फ्लॅश, बेरुशील, वज्र, कीनालक्स, सुक्विन, क्विनॉलटॉफ, कुश, क्विनगार्ड, मिलक्स - १.५ ते ३ मिली प्रती लिटर, काढणी अगोदर ३० दिवसा पर्यंत वापरू शकतात.
कोम्बो कीटकनाशक "थायमेथोक्झाम १२.६% + लॅमडा- सीहॅलोथ्रीन ९.५ % झेडसी ४.५ मिली प्रती १५ लिटर च्या दराने फवारावे. हे कीटकनाशक "अलीका" नावाने उपलब्ध आहे
फुलकिडा
फुलकिड्यांच्या तीन प्रजाती आहेत. काळसर रंगाच्या फुलकिडीमुळे भुईमुगाच्या खालील पानावर पांढरट चट्टे/पट्टे दिसून येतात. इतर प्रकारच्या तुडतुड्यामुळे भुईमुगाच्या वरील आणि मधल्या पानावर पिवळसर चट्टे उमटतात. फुलकिडीच्या माध्यमातून शेंडामर हा विषाणुयुक्त रोग पडतो. याच्या नियंत्रणासाठी लॅमडा- सीहॅलोथ्रीन ५ ईसी (रिवा, कराटे, एजंट प्लस, रूद्रा, ब्रॉव्हो ५०००, संत्री) हे कीटकनाशक ०.५ मिली प्रती लिटर दराने फवारावे.
भुईमुगाव्यतिरिक्त हि कीड टमाटे, तंबाखू, कापूस व इतर द्विदल पिकात दिसून येते
तंबाखू अळी
या किडीच्या सविस्तर माहितीसाठी आमचा या पूर्वी प्रसिद्ध केलेला ब्लॉग नक्की वाचवा. नियंत्रणासाठी मिथोमिल ४० एसपी (लॅनेट, डुनेट, डॅश) १.५ ते २ मिली प्रती लिटर किंवा क़्विनोलफॉस २०% एएफ हे कीटक नाशक १.५ ते २.५ मिली प्रती लिटर या दराने वापरावे. वर सूचित केल्याप्रमाणे कामगंध सापळे वापरावेत.
वाळवी नियंत्रण
पांढरी-थोडी पारदर्शक मुंगी सारखी "वाळवी" आपल्या चांगल्याच परिचयातील आहे. भुइमुगात त्या मुळे व खोडं खराब करतात ज्यामुळे रोप मरते. शेंगा व दाणे दोन्ही फस्तगत करतात. पुढे त्यात बुरशी लागते ज्यामुळे अफ्लाटोक्झीन (कडवट दाणे) तयार होतात. या किडीच्या नियंत्रणासाठी शेतात न कुजलेला किंवा अर्धवट कुजलेला काडी कचरा ठेवू नये. गोळा करून शेत स्वच्छ ठेवावे.
थायमेथोक्झाम ७५% भार/भार एस जी ५०-५५ मिली प्रती २००/४०० लिटर पाण्यात मिसळून आळवणी किंवा ड्रीपने द्यावे. हा एका एकरचा डोस आहे.
पाने खाणारी अळी
अळी पाने-फुले खाते. पान कळी खाल्ली असल्यास नवीन पानावर दोघी बाजूला सारखी छिद्र दिसतात. या किडीच्या नियंत्रणासाठी कोम्बो कीटकनाशक "थायमेथोक्झाम १२.६% + लॅमडा- सीहॅलोथ्रीन ९.५ % झेडसी ची शिफारस असून ४.५ मिली प्रती १५ लिटर च्या दराने फवारणी करावी. हे कीटकनाशक "अलीका" नावाने उपलब्ध आहे
संदर्भ
- भुईमुगातील तंबाखू अळीचे करा वेळीच नियंत्रण
- लागवडीत निवडक सुधारणा करून वाढवा भुईमुग उत्पादन
- मल्चफिल्मची निवड व फायदा
- कृषीसेवाडॉट कॉम
- केंद्रीय कीटकनाशक बोर्ड
- तामिळनाडू कृषी विद्यापीठ
- भा. कृ. अनु. प. राष्ट्रीय कृषीकीटक कोष केंद्र
आपल्याला हे लेख कसा वाटला? शेअर करायला विसरू नका.
तंत्रज्ञान म्हणजे काय हे जाणून घेण्यसाठीइथे क्लिक करा. |