संत्रा, मोसंबी व लिंबूतील डिंक्याचे पाटील बायोटेक तंत्रज्ञानाने अचूक व्यवस्थापन

संत्रा, मोसंबी व कागदी लिंबु च्या दर्जेदार उत्पादनातील सर्वांत महत्त्वाचा अडसर हा डिंक्‍या रोगाचा प्रादुर्भाव आहे. हा रोग फायटोप्थोरा या बुरशीच्या प्रजातीमुळे उद्‌भवतो. ही बुरशी जमिनीत व रोगग्रस्त पिकांचे अवशेषांवर वर्षानुवर्षे वास्तव्य करून राहते. बागेत दीर्घ काळ भरपूर ओलावा टिकून राहिल्यामुळे या रोगाचा प्रादुर्भाव व वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण होते. हवेतील अधिक सापेक्ष आर्द्रता यामुळे या रोगाचा प्रादुर्भाव आणि प्रसार झपाट्याने होतो. 

डिंक्यामुळे रोप कोलमडणतात, क्राऊन रॉट होतो, मूळसड होते, डिंक श्रवतो, पाणगळ होते, फळसड (ब्राऊन रॉट) होते व  शेंडेमर होऊन झाड वाळणे

रोगाचा प्रार्थमिक प्रसार रोपवाटिकेतील रोगग्रस्त रोपांद्वारा तसेच रोगग्रस्त बियाण्यांमार्फतसुद्धा होतो; तर दुय्यम प्रसार हा पावसाच्या पाण्याचे थेंब आणि पाटाच्या प्रवाहित पाण्याद्वारा होतो. 

फायटोप्थोरा बुरशीबरोबरच इतर अजैविक घटकांचासुद्धा- उदा.- आद्र हवामान, जमीनीतील कायमची ओल, पाटाचे दुषित पाणी, जमीनिची अपूर्ण मशागत, यांचा महत्त्वाचा वाटा असल्यामुळे डिंक्‍या रोगाच्या बंदोबस्तासाठी सर्वकष रोग व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब करणे क्रमप्राप्त आहे.

 • रूट स्टॉक (खुंट)- उदा.- रंगपूर लाइम, ट्रायफोलिएट ऑरेंज, क्‍लिओपाट्रा ऑरेंज इत्यादींवर- कलम/ डोळे भरून लागवडीसाठी रोपे तयार करावीत. 
 • रोपे रोगमुक्त रोपवाटिकेतूनच घ्यावीत. 
 • चुनखडीचे प्रमाण जास्त असलेल्या, चिबाड, चिकणमाती, दलदल, खोलगट इत्यादी जमिनीत या फळझाडांची लागवड करू नये. 
 • जमिनीची योग्य व पुरेपूर मशागत व अंतरमशागत करावी 
 • जमिनीलगतच्या फांद्या छाटून टाकाव्यात- दाटीवाटी कमी करून, बागेत हवा खेळती ठेवावी. 
 • अतिरिक्त पाण्याचा  निचरा करावा. 
 • बागेत ठिबक सिंचनाने किंवा बांगडी (मुख्य बुंध्याभोवती किमान 45 ते 50 सें.मी. अंतरावर) पद्धतीने पाणी द्यावे
 • बुंध्याचा व पाण्याचा प्रत्यक्ष संपर्क टाळावा 
 • फळझाडांना शिफारशीप्रमाणे आणि संतुलित मुख्य (नत्र, स्पुरद, पालाश), दुय्यम (केल्शींअम, मेग्नेशिंअम, सल्फर) व सूक्ष्म (लोह, जस्त, तांबे, मंगल, मोलाब्द व बोरॉन)  अन्नद्रव्ये द्यावीत बागेतील फळमाशी प्रादुर्भावग्रस्त फळांना फायटोप्थोरा बुरशीची सहज लागण होऊन फळसड (ब्राऊन रॉट) होऊ शकते, त्यामुळे मक्षिकारी सापळा वापरून फळमाशीचा वेळीच बंदोबस्त करावा
 • पावसाळ्यापूर्वी व पावसाळ्यानंतर प्रत्येक झाडाच्या मुख्य बुंध्यावर (तडकलेली साल व स्रवलेला डिंक खरवडून काढून खोड व बुंधा स्वच्छ करून पोटॅशियम परमॅंग्नेट 1 द्रावणाने निर्जंतुक करावे व जमिनीपासून 3 ते 4 फूट उंचीपर्यंत बोर्डोपेस्ट (1 किलो कॉपर सल्फेट + 1 किलो कळीचा चुना + 10 लिटर पाणी) लावावे किवा १०० ग्राम रेडोमिल गोल्ड 1 लिटर पाण्यात घेवून, पेस्ट बनवून लावावी.

 • तसेच 1 टक्का बोर्डो मिश्रणाची (1 किलो कॉपर सल्फेट + 1 किलो चुना + 100 लिटर पाणी) झाडांवर, जमिनीवर व गळालेल्या फळांवर फवारणी करावी.

जर जमिनीचा मगदूर, झाडाचे वय, त्यातील अंतर, जात यावर आधारित खत व फवारणी च्या शिफारशी चे पालन केले तर डिंक्या शेतात पाउल देखील ठेवणार नाही, खर्च कमी होऊन उत्पादन वाढेल. पाटील बायोटेक चे या बाबत चे तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी आजच आमचा फॉर्म भरा जेणे करून आपल्या एरियातील आमचे तंत्रज्ञ आपणाशी संपर्क साधून योग्य त्या शिफारशी देतील.

 

  

या पिकासाठी पाटील बायोटेक तंत्रज्ञान उपलब्ध आहे.

तंत्रज्ञान म्हणजे काय हे जाणून घेण्यसाठी

इथे क्लिक करा.