कोणत्याही पिकावर चुकून तणनाशकाची फवारणी झाली तर काय करणार?
अनेक वेळा शेजारच्या शेतात तणनाशकाची फवारणी होते, तर कधी कधी आपण तणनाशकाच्या पंपाने कीटक नाशक फवारतो व उभ्या पिकावर त्याचा वाईट परिणाम होतो. अश्या वेळी काय करावे?
कापसावर टू फोर डी या तणनाशकाचा परिणाम दिसतो आहे.
सर्वप्रथम हे तपासा कि तणनाशक कोणत्या प्रकारातील आहे. जर हे स्पर्शजन्य असेल तर सुरवातीला नुसत्या पाण्याची भरपूर फवारणी करा जेणेकरून पृष्ठभागावर पडलेले तणनाशक वाहून जाईल. पण जर आपण फवारलेले तणनाशक अंतप्रवाही असेल तर पाण्याच्या फवारणीचा फायदा होणार नाही. एव्हाना अशा वेळी नुसत्या पाण्याची फवारणी टाळावी.
जेव्हा उभ्या पिकावर चुकून तणनाशकाची फवारणी होते तेव्हा हि तण नाशके चय-अपचय प्रक्रिया मंदावतात व पिकाला इजा व्हायला सुरुवात होते. अश्या विपरीत परिस्थितीतून जेव्हा आपण पिकाला सावरायचा प्रत्यत्न करतो व त्यास पाणी व खते उपलब्ध करून देतो त्यावेळी विकरे तयार व्हायला वेळ जात असल्याने पिकाची वाढ पूर्ववत व्हायला वेळ लागतो. अशा वेळी आपण जर फॉलीबिओन ची फवारणी केली फायदा होतो कारण फॉलीबिओन मध्ये अमिनो एसिड आहेत ज्या पासून विकरे बनवली जातात. हा एक शॉटकट आहे. विकरे अपेक्षेपेक्षा अधिक लवकर बनल्याने पिकाच्या वाढीचा वेग पूर्ववत व्हायला मदत होते व पिक लवकर सावरते.
विपरीत परिस्थितीमुळे मागे पडलेले पिक फॉलीबिओन च्या मदतीने वेळ व सत्व भरून काढते ज्या मुळे उत्पादनावर होणारे दुष्परिणाम टाळले जातात.
फॉलीबिओन चे डोसेस काय आहेत? पिकाचे वय व वाढ लक्षात घेवून फवारणी चे डोसेस निवडावे. लहान पिकात १ मिली प्रती लिटर, फुलावर यायच्या वळेस २ मिली प्रती लिटर, फळावर यायच्या अगोदर ३ मिली प्रती लिटर. विपरीत परिस्थिती किंवा व्हायरस लागण झाल्यावर सुधारणे साठी १ ते २ मिली प्रती लिटर. ड्रीप ने देण्यासाठी ५०० मिली प्रती एकर, रोपांच्या पुनरलागवड करते वेळी रूट डीपिंग साठी ५ ते १० मिली प्रती लिटर.
तणनाशकाचा परिणाम खूप जास्त प्रमाणात असेल तर फॉलीबिओनच्या वर सांगितलेल्या डोसेस सोबत प्रती लिटर 3 ग्राम गुळ व ३ ग्राम डीएपी वापरावे.
अश्या अवस्थेत चुकुनही पोटाश युक्त खताची फवारणी करू नये.
फोटोवर क्लिक करून हे पुस्तक खरेदी करा व कीटकनाशक, तणनाशक व बुरशीनाशकावर खर्च होणारे हजारो रुपये वाचवा.

Hiii
Excellent Results