Call 9923974222 for dealership.

हुमणासुर: हुमणीच्या एकात्मिक नियंत्रणात वापरा हुमणी चा कर्दनकाळ हुमणासुर!

दिनांक १७, जून २०१६ च्या एग्रोवन मध्ये आलेल्या बातमी नुसार मराठवाड्यातील नांदेड, परभणी, बीड, जालना, हिंगोली व औरंगाबाद या सहा जिल्ह्यांत तीन वर्षांपासून हुमणी अळीचा प्रादुर्भाव खरीप व रब्बी हंगामात आढळून येतो आहे. होलोट्रीकिया सिराटा व होलोट्रीकिया फिसा या दोन जातीच्या हुमणी मराठवाड्यात प्राधान्याने आढळल्या. सोयाबीन, तूर, हरभरा, कापूस, ज्वारी, ऊस, हळद, आले, मका, मूग, कांदा इत्यादी पिकांचे हुमणीमुळे जवळपास ७० ते ७५ टक्‍के नुकसान झाले होते. गेल्या रब्बी हंगामात तर हुमणी प्रादुर्भावाने दुबार, तिबार पेरणी करण्याची वेळी आली होती. चार जिल्ह्यांत केलेल्या पाहणीत ६० गावातील ११ हजार ६०० हेक्‍टरवरील पिके हुमणीने फस्त केल्याचे समोर आले.

"दृष्टी आड सृष्टी" असा एक वाप्रचार प्रचलित आहे. कधी कधी काही समस्यांचा उलगडा दृष्टीसमोरील अडसर बाजूला केल्या शिवाय दिसत नाही. हुमणी हा तसाच एक प्रकार आहे. सर्व कही चांगले असून अचानक पिकाची वाढ खुंटते, कोरडे पडायला लागतात. वर वर बघता कुठलीच किड दिसत नहीं. रोप जमिनीतुन ओढले असता लगेच हाती येते, तेव्हा हुमणीचा प्रादुर्भाव झाला आहे असे समजावे

भात, भुईमूग, सोयाबीन, तूर, हरभरा, कापूस, ज्वारी, ऊस, हळद, आले, मका, मूग, कांदा आणि मिरची अशा पिकांमध्ये हुमनी आढळून येते. अळी अवस्थेतील हुमणी मूळ खाते त्यामुळे पिके कोरडी पडतात. काही समजायच्या आत मोठे नुकसान होते.

 

हुमणीच्या नियंत्रणासाठी विविध उपाय सुचवले गेले आहेत. झाडे हलवून भुंगेरे मारणे, सापळा पिके लावणे, नांगरणी करते वेळी हुमणी गोळा करणे, पक्षांना शेतात आकर्षित करून हुमणी खायला भाग पाडणे, रिकाम्या शेतात गवताचे ढीग करून त्याखाली हुमणी शोधणे, शिकारी कीटक पसरवणे, विषारी पदार्थ शेतात सोडणे इत्यादी इत्यादी.

असे सर्व प्रयोग करून थकल्यावरहि हुमणी नियंत्रण होत नाही हा अनुभव अनेक शेतकरी बांधवाना आहेच. हताशपणे आपले उभे पिक हुमणीच्या कोपाला बळी पडलेलं पाहण्यापेक्षा एकदा "हुमणासुर" वापरून बघा. 

हुमणी चा जीवनक्रम जाणून घेतल्यास हुमणासुर चा कसा फायदा होतो ते लक्षात येईल.

वळवाचा किंवा मॉन्सूनपूर्व पाऊस साधारणतः ६० ते ७० मि.मी. पडला, की हुमणीचे भुंगे जमिनीतून सायंकाळी साधारण ६.४५ ते ८.१५च्या दरम्यान बाहेर पडतात आणि नजीकच्या कडुनिंब, बाभळ, बोराच्या झाडांवर जातात. नर आणि मादीचे तेथेच मिलन होते. मिलनानंतर नर लगेच मरतो, मादी जमिनीत अंडी घालते. एक मादी साधारणपणे ५० ते ६० अंडी घालते. त्या वेळी जमिनीत पिके नसतात; पण सेंद्रिय खत मिसळलेले असते. अंडी साधारणतः १५ ते १८ दिवसांनी उबतात. हुमणीची अळी प्रथम सेंद्रिय पदार्थ खाते, नंतर ती पिकाच्या मुळांकडे वळते. अळीच्या तीन अवस्था आहेत. पहिली अवस्था ६० ते ९० दिवस, दुसरी अवस्था ५५ ते ११० दिवस आणि तिसरी अवस्था ४ ते ५ महिने असते. पूर्ण वाढ झालेली हुमणीची अळी जमिनीत ७० सें.मी. खोल कोषावस्थेमध्ये जाते. २० ते २२ दिवस ही कोषावस्था असते. त्यानंतर भुंगा बाहेर पडतो. पाऊस पडल्यानंतर हे भुंगे पुन्हा बाहेर पडतात. साधारणपणे एक पिढी पूर्ण होण्यास एक वर्षाचा कालावधी लागतो. या जीवनचक्रानुसार ही किड जास्तीत जास्त काळ जमिनिखालीच लपून रहाते हे स्पष्ट होते.

"हुमणासुर" हे जैविक आहे. एकरी ३ किलो चा डोस असून त्याला आपण ड्रीप द्वारे, आळवणीने किंवा चांगल्या कुजलेल्या शेण खतात किंवा कंपोष्ट खतात मिसळून पसरवू शकतो. "हुमणासुर" हुमणीत बुरशीजन्य रोगाची लागण पसरवतो. मेलेल्या हुमणीच्या शरीरातून "हुमणासुर" ची लागण दीर्घकाळ पसरत रहाते. अश्या प्रकारे जमिनीखालील  हुमणी चे साम्राज्य  पूर्णपणे उध्वस्त होते. 

"हुमणासुर" ची मित्रबुरशी मातीत वास्तव्य  करून दीर्घकाळ कार्यरत रहाते, हुमणी सोबत जमिनीतील इतर अनेक अपायकारक कीटक जसे वाळवी व परपोशी जसे सुतकृमी आपसूक नष्ट होतात. हुमणासुर महाराष्ट्रातील सर्व नामांकित कृषीकेंद्रात उपलब्ध आहे. 

 

15 comments

 • 21 divasachya maka pikavar (maize crops) vr ya kidicha pradurbhava Date : 19 june 2020

  Yogesh Khilari MSC Botany (9665851604)
 • Humnasur 3kg want.so send me.my mob.no.8275332557
  vasant dhavlkar
 • एकदम छान

  संजय शेलार
 • केली ला शेनद्रीय खत दिल्यावर हुमनी नियत्रंन कसे करावे

  Bharat Pate
 • Humani Vishay mahiti havi.

  Santosh Chandrakant Jagtap

Leave a comment

Name and Mobile number .
.
Message with Address, District & Pincode .

Please note, comments must be approved before they are published