Call 9923974222 for dealership.

या वर्षी हुमणीचा प्रादुर्भाव जाणवेल का?

मे च्या अखेरीस किंवा जूनच्या सुरवातीस, जेव्हा कडुनिंब, बाभळ, बोराच्या झाडांवरील पाने कुरतडलेली दिसतात, शास्त्रज्ञ "हुमणीचे भुंगे" नियंत्रित करण्याबद्दल सुचवतात. आता हे भुंगे नियंत्रित करण्यासाठी एकतर झाडावर फवारणी करणे किंवा रात्री दिवे लावून हे किडे आकर्षून घेवून दिव्याखालील हौदात त्यांना गोळा करणे असे प्रयत्न होतात. इथे दिलेल्या व्हिडीओत आपण हि प्रक्रिया बघू शकतात.

या व्यतिरिक्त नांगरणी करते वेळी हुमणी गोळा करणे, पक्षांना शेतात आकर्षित करून हुमणी खायला भाग पाडणे, रिकाम्या शेतात गवताचे ढीग करून त्याखाली हुमणी शोधणे, शिकारी कीटक पसरवणे, विषारी पदार्थ शेतात सोडणे असे अनेक प्रयोग सुचवण्यात व करण्यात येतात.

मित्रहो हे सर्व करूनही फारसा फायदा होतांना दिसत नाही. सर्व कही चांगले असून अचानक पिकाची वाढ खुंटते, उभ पिक कोरड पडायला लागते. वरवर बघता कुठलीच किड दिसत नहीं. रोप जमिनीतुन ओढले असता लगेच हाती येते, तेव्हा हुमणीचा प्रादुर्भाव झाला आहे असे आपल्याला समजते. पण आता आपल्याजवळ फारसे प्रभावी उपाय शिल्लक नसतात. आपण जितका प्रयत्न करू तितका खर्च वाढत जातो. नुकसान भरपाई तर होतच नाही. गेल्या काही वर्षात या किडीने फक्त आपले क्षेत्रच वाढवलेले नाही तर अधिकाअधिक पिकात ती नुकसान करतांना दिसून येते आहे. आजकाल हि कीड सोयाबीन, तूर, हरभरा, कापूस, ज्वारी, ऊस, हळद, आले, मका, मूग, कांदा अश्या नेहमीच्या पिकात देखील परिणाम करत आहेइतकेच नाही तर या किडीच्या प्रजातींची संख्या देखील वाढत आहेत. एकीकडे आपण तिचे अस्तित्वच संपवण्याचा प्रयत्न करतोय तर दुसरीकडे कीड तिचा प्रसार अधिक जोमाने करते आहे. याला पर्याय काय?

मित्रहो याला एकच पर्याय आहे...एकात्मिक प्रयत्न. या किडीला संपवायचे असेल तर तिचे जीवनचक्र लक्षात घेवून, या चक्राच्या विविध भागांवर प्रहार करायला हवा. कीड एकसाथ संपवणे शक्य नाही त्यामुळे तिची संख्या कशी दाबून ठेवता येईल हे बघायला हवे. समोर दिसलेला भुंगा आपण मारतो पण इतर भुंगे आपली नजर चुकवून त्यांचे जीवनचक्र सुरूच ठेवतात त्यांचेहि जीवन चक्र थांबवायला हवे. 

सर्व प्रथम आपण या किडीचे जीवन चक्र समजावून घ्यावे. वळवाचा किंवा मॉन्सूनपूर्व पाऊस साधारणतः ६० ते ७० मि.मी. पडला, की हुमणीचे भुंगे जमिनीतून सायंकाळी साधारण ६.४५ ते ८.१५च्या दरम्यान बाहेर पडतात आणि नजीकच्या कडुनिंब, बाभळ, बोराच्या झाडांवर जातात. नर आणि मादीचे तेथेच मिलन होते. मिलनानंतर नर लगेच मरतो, मादी जमिनीत अंडी घालते. एक मादी साधारणपणे ५० ते ६० अंडी घालते. त्या वेळी जमिनीत पिके नसतात; पण सेंद्रिय खत मिसळलेले असते. अंडी साधारणतः १५ ते १८ दिवसांनी उबतात. हुमणीची अळी प्रथम सेंद्रिय पदार्थ खाते, नंतर ती पिकाच्या मुळांकडे वळते. अळीच्या तीन अवस्था आहेत. पहिली अवस्था ६० ते ९० दिवस, दुसरी अवस्था ५५ ते ११० दिवस आणि तिसरी अवस्था ४ ते ५ महिने असते. पूर्ण वाढ झालेली हुमणीची अळी जमिनीत ७० सें.मी. खोल कोषावस्थेमध्ये जाते. २० ते २२ दिवस ही कोषावस्था असते. त्यानंतर भुंगा बाहेर पडतो. पाऊस पडल्यानंतर हे भुंगे पुन्हा बाहेर पडतात. साधारणपणे एक पिढी पूर्ण होण्यास एक वर्षाचा कालावधी लागतो. या जीवनचक्रानुसार ही किड जास्तीत जास्त काळ जमिनिखालीच लपून रहाते हे स्पष्ट होते. शिवाय किडीचे जमिनीमधील वास्तव्यच पिकावर वाईट परिणाम करते. वाढीच्या अवस्थेतील हुमणी अतिशय खादाड असते.  जमिनीखालील अवस्थेत किडीला मारण्यासाठी रसायनांचा प्रयोग करणे हास्यास्पद आहे कारण एकतर कीड नजरेस दिसत नाही शिवाय मृदेत परिणाम कारक ठरण्यासाठी रसायने खूप जास्त प्रमाणात लागतात. शिवाय हि रसायने किडीपर्यंत पोहोचवणे जवळपास अशक्य असते. रसायनाचा हट्टी पद्धतीने उपयोग केला तर "रोगापेक्षा इलाज भयंकर" अशी स्थिती होईल. 

या कामी जैविक कीटकनाशक अधिक चांगले कार्य करते. हे जैविक कीटकनाशक किडीत संसर्गजन्य रोग निर्माण करते. संसर्ग पसरत जातो,  मेलेल्या किडीतून हि संसर्ग वाढत जातो.  आता मुद्दा एकच आहे कि काय वापरल्याने संसर्ग निर्माण होईल? व हि प्रक्रिया नेमकी केव्हा करावी? 

मित्रहो या ठिकाणी मी आपल्याला हुमणासूर बद्दल सांगू इच्छितो. हे उत्पादन आपल्याला हुमणीच्मया जमिनीखालील अवस्ध्येथांमध्ये सुरवाती पासूनच संसर्ग निर्माण करण्यास मदत करते. जमिनीची तयारी करते वेळी चांगल्या कुजलेल्या शेणखतात एकरी तीन किलो च्या हिशोबाने हुमणासूर मिसळावे व हे मिश्रण शेतात एकसमान पसरवून घ्यावे.  असे केल्याने सुरवातीला अंड्यातून बाहेर पडणारी अळी जेव्हा शेणखतावर उपजीविका सुरु करेल तेव्हा तिला संसर्ग होईल. संसर्गाने ती लगेच मरत नाही, सुरवातीला ती आजारी पडते व हा संसर्ग इतर अळ्यामध्ये देखील पसरवते. अळी मृत झाली कि संसर्ग तिच्या शरीरातून निघून पुन्हा पसरायला सरुवात करतो. "हुमणासुर" चा संसर्ग वाळवी व सुतकृमीवर देखील परिणाम करतो. हुमणीचे चांगले खत बनते. हुमणासूर २००० पेक्षा अधिक कृषीकेंदात उपलब्ध आहे. उपलब्धए बद्दल काही अडचण असेल तर इथे दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा. 

7507775359, 8554983444, 9049986411, 7507775355

 

----------------------------------

"हुमणासुर: हुमणीच्या एकात्मिक नियंत्रणात वापरा हुमणी चा कर्दनकाळ हुमणासुर" असा लेख आम्ही यापूर्वी टाकला होता. तो वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

--------------------------------

हा लेख आपणास कसा वाटला ते कॉमेंट मध्ये नक्की लिहा.

 

  

प्रत्येक पिकासाठी पाटील बायोटेक तंत्रज्ञान उपलब्ध आहे.

तंत्रज्ञान म्हणजे काय हे जाणून घेण्यसाठी

इथे क्लिक करा.

 

आपण आमच्या फेसबुक व टेलेग्राम सोशल गृपला जुळून नियमित प्रसारित होणारी माहिती प्राप्त करू शकता. त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

1 comment

  • At / post/tal:Rahata distr.:
    ahmednager nice information

    Avinash bankar 9420800202

Leave a comment

Name and Mobile number .
.
Message with Address, District & Pincode .

Please note, comments must be approved before they are published