हुमणासुर चा परिणाम दिसतो स्पष्ट

अनेक प्रयोगांच्या आधारावर व सूक्ष्म निरीक्षण करून पाटील बायोटेक ने हुमणासुर हे बहुउपयोगी मृदा सुधारक बाजारात आणले. सुरवातीला काही शेतकरी बांधवानी याच्या कार्यक्षमतेबद्दल शंका उपस्थित केली पण बहुतेक बांधवानी एकदा तरी हुमणासुर वापरून बघावे हा विचार करून प्रत्यक्ष प्रयोग केला. आमच्या प्रतिनिधींनी देखील या प्रयोगात सिंहाचा वाटा उचलला. 

"हुमणासुर" हे जैविक आहे. एकरी ३ किलो चा डोस असून त्याला आपण ड्रीप द्वारे, आळवणीने किंवा चांगल्या कुजलेल्या शेण खतात किंवा कंपोष्ट खतात मिसळून पसरवू शकतो. "हुमणासुर" हुमणीत बुरशीजन्य रोगाची लागण पसरवतो. मेलेल्या हुमणीच्या शरीरातून "हुमणासुर" ची लागण दीर्घकाळ पसरत रहाते. अश्या प्रकारे जमिनीखालील  हुमणी चे साम्राज्य  पूर्णपणे उध्वस्त होते."हुमणासुर" ची मित्रबुरशी मातीत वास्तव्य  करून दीर्घकाळ कार्यरत रहाते, हुमणी सोबत जमिनीतील इतर अनेक अपायकारक कीटक जसे वाळवी व परपोशी जसे सुतकृमी आपसूक नष्ट होतात.

मराठवाड्यातील नांदेड, परभणी, बीड, जालना, हिंगोली व औरंगाबाद या सहा जिल्ह्यांत तीन वर्षांपासून (२०१३-२०१६) हुमणी अळीचा प्रादुर्भाव खरीप व रब्बी हंगामात आढळून आला. होलोट्रीकिया सिराटा व होलोट्रीकिया फिसा या दोन जातीच्या हुमणी मराठवाड्यात प्राधान्याने आढळल्या. सोयाबीन, तूर, हरभरा, कापूस, ज्वारी, ऊस, हळद, आले, मका, मूग, कांदा इत्यादी पिकांचे हुमणीमुळे जवळपास ७० ते ७५ टक्‍के नुकसान झाले होते.२०१५ च्या रब्बी हंगामात तर हुमणी प्रादुर्भावाने दुबार, तिबार पेरणी करण्याची वेळी आली होती. चार जिल्ह्यांत केलेल्या पाहणीत ६० गावातील ११ हजार ६०० हेक्‍टरवरील पिके हुमणीने फस्त केल्याचे समोर आले. हुमणी ने शेतकरी बांधवांचे प्रचंड नुकसान केले.

जितक्या शेतकरी बांधवानी हुमणासुरचा उपयोग केला त्यांच्या शेतात हुमणीचा प्रभाव १२ ते १५ दिवसात दिसेनासा झाला. हुमण्यांचे जमिनीतच खत झाले. पिके पुन्हा एकदा डौल धरू लागली!

राजस्थान मधील एका शेतकरी बांधवाने हुमणासुर चा उपयोग केला. तिकडे हुमणी ला सफेद लट असे म्हटले जाते. हा व्हिडीओ नक्की बघा.