लोहाची कमतरता करा दूर

लोहाची कमतरता करा दूर

पिकाच्या सुधृड वाढीसाठी लोहाची गरज महत्वाची असते. प्रकाशसंश्लेषणात व विकरांच्या असंख्य अभिक्रीयांत लोह महत्वाची भूमिका बजावते.  

लोहाची कमतरता सर्वप्रथम कोवळ्या पानांवर दिसून येते. पानांच्या शिरांमधील भाग पिवळा पडतो; मात्र शिरा हिरव्या राहतात. लोहाची कमतरता असताना नत्र देऊनही पानांना हिरवा रंग येत नाही, शिरादेखील पिवळ्या पडतात, संपूर्ण पाने फिकट पिवळी व पांढरी होऊन गळून पडतात. पीक नियमित फुलोऱ्यात येत नाही. फळांचा आकार लहान होतो. नवीन फांद्या वाकड्या होतात. अश्या अवस्थेत फुलोरा, फळधारणा, दाणे भरणे या प्रक्रिया व्यवस्थित होत नाहीत. 

लोहाच्या कमतरतेला शास्त्रीय भाषेत "लाईम इंड्यूसड क्लोरोसीस" असे म्हणतात व त्याची लक्षणे मॅग्नीज च्या कमतरतेच्या लक्षणासारखीच असतात. खर तर मृदेमध्ये लोहाची कमतरता असण्याची शक्यता फारच कमी असते. पण हे लोह पिकास उपलब्ध होत नाही. मृदेची सामू ६.५ च्या वर असेल तर हा प्रश्न नक्कीच उद्भवतो. पाणी साचल्याने वाफसा स्थितीचा अभाव निर्माण होतो व लोह पिकास मिळणे शक्य होत नाही. जर मृदेत अतिरिक्त मूलद्रव्य जसे कॅल्शियम, झिंक, मेंग्नीज, स्पुरद व तांबे असतील तरी देखील लोहाच्या उपलब्धतेत अडचणी निर्माण होतात. लोहाची कमतरता भरून निघावी म्हणून पिकांच्या मुळामधून सिडेरोफोर नामक द्रव्य सोडली जातात. मृदेतील जीवाणू देखील अशी द्र्व्य सोडतात. त्यांच्यात लोहाला मृदेतून  उचलून पिकाला पुरवठा करायची क्षमता असते. पण वर दिलेल्या कारणांमुळे हे शक्य होत नाही व लोहाची कमतरता निर्माण होते 

 जर आपल्या पिकात वर सांगितलेली लक्षणे दिसली तर आपण खालील उपाय करावेत

  • वाफसा स्थिती निर्माण होण्यासाठी अतिरिक्त पाणी साचले असेल ते काढण्याची सोय करावी.
  • रीलीजर+ (सल्फर ९०%) एकरी ३ ते ६ किलो द्यावे (आळवणी /ठिबकद्वारा). रीलीजर+ माय्रक्रोनाइज्ड असल्याने मातीत चांगले पसरते, सूक्ष्मजीवाणू त्याचे रुपांतर सल्फ्युरिक आम्लात करतात. हि अभिक्रिया मुळांच्या कक्षेत झाल्याने मुळांच्या कक्षेतील मृदेचा सामू सुधारल्यामुळे लोहाची उपलब्धता वाढते.   
  • मायक्रोडील एफइ-इडीटीए (एफ इ १२) ची ०.५ ग्राम प्रती लिटरच्या दराने फवारणी करावी. यातील लोह हा घटक पूर्ण चिलेटेड स्वरुपात असल्याने लगेच लागू होतो.

  • चिलेटेड मायक्रोडील सुपर मिक्स महाराष्ट्र ग्रेड २ ची 10-12 ग्राम प्रती पंप या दराने फवारणी करावी. यात लोहासहित एकूण सहा सूक्ष्मअन्नद्रव्यांचा समावेश आहे शिवाय ते चिलेटेड स्वरूपातील असल्याने लगेच शोषले जातात. यातून लोहाची अपूर्तीतर होतेच शिवाय पिकास योग्य प्रमाणात  जस्त, मंगल, तांबे, बोरान व मोलाब्द उपलब्ध झाल्याने अडखळलेल्या इतर जैविक प्रक्रिया देखील सुधारतात.
Back to blog