कृषीकेंद्राचा व्यवसाय कसा वाढवाल?

कृषीकेंद्राचा व्यवसाय कसा वाढवाल?

ग्रामीण भागातील चलतीचा व्यवसाय म्हणून कृषीसेवाकेंद्रा कडे बघितले जाते. इतर रोजगार व नोकऱ्या उपलब्ध नसल्याने कृषी शिक्षण मिळवलेले अनेक तरुण कृषीसेवा केंद्र सुरु करतात. ज्या प्रमाणे प्रत्येक डॉक्टर "कमवत" नाही तसेच "प्रत्येक" कृषीकेंद्र यशस्वी पद्धतीने चालत नाही. धूमधडाक्यात सुरु केलेले काही कृषी केंद्र "चार्जिंग नसलेल्या मोबाइल सारखे, बॅटरी डाऊन होत जावून बंद पडतो" त्याप्रमाणे हळूहळू बंद पडतात. साखळी पद्धतीने हे असेच सुरु रहाते.

इतर काही कृषी केंद्र मात्र उत्तरोत्तर प्रगती करतात. कुठेतरी काना-कोपऱ्यात टपरी वजा जागेत सुरु केलेले कृषी केंद्र पुढे नावारूपास येतात - भव्यदिव्य बनतात!

आजच्या या ब्लॉगमध्ये काही टिप्स देत आहोत ज्यांचा उपयोग करून आपण आपला कृषीकेंद्राचा व्यवसाय उत्तरोत्तर वाढवू शकतात.

आपली प्रसिद्धी चांगली करा: मित्रहो लोकं आपल्याकडे कसे बघता हे महत्वाचे आहे. आपल्या बोलण्या-चालण्यातून, वागणुकीतून, व्यवाहारातून लोकांचे "मत" ठरत असते. ग्रामीण भागात सातत्याने "चर्चा" सुरु असतात व त्या चर्चेतून लोकं आपल्याबद्दल बरे-वाईट मत बनवतात. आपण चांगले आहोत असे ओरडून सांगितल्याने काम भागत नाही. त्यासाठी चांगले असावेच लागते. आपले दुकान छोटे-साधे असले तर चालेल पण नीटनेटके ठेवा. चातुर्याने वागा. व्यवहार स्पष्ट ठेवा. 

आपले वेगळेपण जपा: आपला स्पर्धक कोणकोणत्या वस्तू विकतो? त्याच-त्याच वस्तू तुम्ही विकू नका. समोरच्याकडे दर्जेदार कीटकनाशके उपलब्ध असतील तर आपण पर्यायी कीटनियंत्रणाची दर्जेदार उत्पादने विक्रीस ठेवा. जसे पाटील बायोटेकचे कामगंध सापळे (मक्षिकारी, पिंक्या, मक्या), चिकट सापळे (पिवळे, निळे), बायोपेष्टीसाइड (सिंघम, माईटगार्ड, थ्रीपगार्ड).  "संतुलित खत मात्रा" दिल्याने पिकाची प्रतिकारशक्ती वाढते व कीटकनाशक कमी लागते हे लक्षात आणून द्या. संतुलित खत मात्रेसाठी अमृत गोल्ड एन-पी-के, अमृतप्लस कीट, हयूमॅग, मायक्रोडील या खतांची माहिती द्या. प्रत्येक पिकासाठी तक्ते बनवून ठेवा.

कार्यक्रम घ्या: नुसते पान-सुपारी तीर्थप्रसादाचे कार्यक्रम ठेवू नका. शेतकरी बांधवांच्या उपलब्धते नुसार पाटील बायोटेकच्या तांत्रिक तज्ञांचे कार्यक्रम आयोजित करा. वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन मिळेल असे नियोजन करा. प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम घेतल्याने खूप फायदा होतो.

 

 सातत्यपूर्ण प्रदर्शन: शेतकरी बांधवांच्या मनात आपल्या कृषीकेंद्राबद्दल चांगल्या प्रतिमा कोरल्या जातील हे बघा. अशा प्रतिमा नंतर जागृत होतात व गरजेच्या वेळी शेतकरी बांधवांचे पाय आपोआप आपल्या कृषीकेंद्राकडे वळतात.

आपल्या नियोजनातून निर्माण झालेले उत्तम दर्जाच्या पिकाची काही रोप-झाडे नियमित पणे आपल्या कृषीकेंद्रासमोर प्रदर्शित करा. उंच वाढलेला ऊस, दर्जेदार केळीचा घड, कपाशीचे झाड प्रदर्शित करा. कुणीही चौकशी केल्यावर हे प्रदर्शन का केले आहे हे कहाणी रुपात मांडा.

प्रातिनिधिक उत्पादने: दुकानाच्या प्रदर्शनी भागात एक काचेचे स्वच्छ शोकेस बनवावे.  यात विविध उत्पादने सूटसुटीत पद्धतीने ठेवावीत. नियमितपणे हि उत्पादने बदलवावीत. 

अधून मधून दुकानासमोर उत्पादनांचे प्रदर्शन करा. आज अमृत गोल्ड १९-१९-१९ ची २५ किलो ची गोणी समोर ठेवली असेल तर उद्या अमृत गोल्ड ००-५२-३४ ची १० किलो ची गोणी ठेवा. त्यानंतर कॅलनेट ची गोणी ठेवा. असे करते वेळी हे उत्पादन चांगले शोभून दिसेल असे ठेवा. उत्पादनाला हार घाला जेणेकरून चांगली भावना निर्माण होईल. आपण करत असलेले हे बदल दुकानात येणाऱ्या ग्राहकाच्या आपसूक लक्षात येतात. चर्चा होते व त्यातून विक्री होते. 

प्रचारक बना: इतर दुकानदारांशी बांधले गेलेले ग्राहक आकर्षून घ्यायला हवेत. हि मंडळी आपल्या कृषीकेंद्रात येत नसल्याने आपण त्यांच्या पर्यंत पोहोचायला हवे. त्यासाठी होर्डिंग लावलेली गाडी गावात फिरवावी. यात्रा-उरूस अशा ठिकाणी एक तात्पुरते दालन लावावे. अश्या ठिकाणी भारंभार सगळी उत्पादने न्यायची गरज नाही. इतर दुकानात उपलब्ध नसलेल एखाद अनोख उत्पादन अशा ठिकाणी प्रदर्शित करावे. त्याबद्दल उत्सुकता निर्माण करावी. इप्सित नक्की साध्य होईल. 

संकल्पना राबवा: मी बघा कसा चांगला आहे. माझे दुकान किती चांगले आहे. मी...मी..मी...भोपळ्याची बी. हा प्रकार फार चालत नाही. आपल्या ग्राहकाला काही विशेष सेवा देवू शकता का? समजा तुमच्या भागात खूप मोठ्या प्रमाणात टमाटे उत्पादन होणार आहे व टमाट्याचे भाव गडगडणार आहेत हे आपल्या लक्षात आले आहे. अशा वेळी आपण शेतकरी तोट्यात जावू नये म्हणून काय कराल? प्रक्रिया उद्योगाचे प्रशिक्षण आयोजित करा. टमाट्याचा सॉस, खेचअप कसे बनवायचे? टमाटे कापून कसे सुकवायचे? हे कोण शिकवते हे शोधून त्यांना बोलवा. निर्यात मार्गदर्शन शिबीर आयोजित करा.


एखाद्या शेतकरी बांधवाची मोटर जळाली, डीपी जळाली त्यामुळे पिकाला पाण्याचा ताण पडत असेल व आपल्याकडे जलसेवेची व्यवस्था असेल तर डीझेलचा खर्च शेतकऱ्या कडे ठेवून त्याला जलसेवा द्या. 

सोशल मिडिया वापरा: आधुनिक प्रसार माध्यमाचा वापर करा. व्हाटसअप, टेलेग्राम, फेसबुक यांचा विधायक उपयोग करा.  कृषीकेंद्राच्या नावाने ग्रुप बनवून "निवडक" व "नियमित" पोष्ट टाका. नकारात्मकते ऐवजी सकारात्मक उपयोग करा. 

मित्रहो, हा लेख कसा वाटला? प्रतिक्रिया नक्की नोंदवा. आमचे ब्लॉग नियमित वाचा. संपर्कात रहा!

Back to blog