या वर्षी कापसात दुहेरी नुकसान करणारा लाल्या पसरणार का?

या वर्षी कापसात दुहेरी नुकसान करणारा लाल्या पसरणार का?

कापूस हे प्रमुख व्यापारी पिक असल्याने या पिकाच्या व्यवस्थापनात महराष्ट्रातील शेतकरी तरबेज झाला आहे. असे असले तरी दर वर्षी कापसात एखादी नवी समस्या उभी ठाकते व त्याची मोठी बातमी देखील होते.

२०००-२००२ या वर्षात लाल्या या रोगाची मोठी चर्चा झाली होती. त्यानंतर याची फारशी चर्चा झाली नाही पण रोग टिकून आहे.

या रोगात पानांवर कडेने व टोकाकडून पिवळी छटा उमटू लागते. प्रकाशसंश्लेषणासाठी आवस्यक हरितलवक नष्ट होते. त्याची जागा ऎन्थोसायानिन हा लाल रंगाचा घटक घेतो. परिणामी पाने लाल दिसू लागतात.

मित्रहो लाल्या हा संसर्गजन्य रोग नसून पोषकतत्वाच्या कमतरते मुळे उद्भवणारी समस्या आहे. नत्र व मॅग्नेशियम या दोन पोषणमूल्यांच्या कमतरते मुळे लाल्या होत असतो.

 


लाल्यामुळे दुहेरी नुकसान होते ते कसे? हे समजावून घ्यायला हवे. पोषकतत्वाच्या कमतरते मुळे लाल्या रोग होतो. हा रोग जेव्हा आपल्या लक्षात येतो तेव्हा ज्या रोपावर तो दिसतो ते रोप शेतातील अन्य रोपांच्या तुलनेने मागे पडलेले असते. काही केल्या ते रोप इतर रोपा इतके उत्पादन देणार नसते. हि नुकानीची पहिली बाजू आहे. या कमतरतेमुळे हे रोप इतर रोग व किडींना सहज बळी पडते. त्या रोग किडींना ते आश्रय देते ज्यामुळे त्या भोवतीच्या इतर सशक्त रोपांवर हे रोग/किडी जास्त प्रभाव पाडू लागतात. टोपलीतील एक सडका आंबा इतर आंब्यांना सडवतो, हे तसेच आहे.

एकूण शेतात लाल्या येणारच नाही असा प्रयत्न करणे, असे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.

यासाठी युरिया व मॅग्नेशियम सल्फेट या खतांची फवारणी व आळवणी करावी असे सर्वसाधारणे सांगितले जाते. ते चुकीचे नसले तरी ते अचूक देखील नाही! पाटील बायोटेक तंत्रज्ञानात अन्नद्रव्य व्यवस्थापनासोबत वाणाची निवड, मृदेची घडण, जलव्यवस्थापन, वृद्धीनियंत्रण यांची सांगड घालून मुळात लाल्या व तत्सम कमतरता येणारच नाही असे नियोजन असते.

मित्रहो लाल्या आपल्या उत्पादकतेमध्ये १० ते ३० टक्के नुकसान करू शकते तर पाटील बायोटेक तंत्रज्ञान, उत्पादकतेत ३० ते १५० टक्के वाढ करू शकते. तंत्रज्ञानाला आपल्या इच्छाशक्ती व मेहनतीची जोड देण्याची तयारी असेल तर इथे दिलेला फॉर्म भरून आपण हे तंत्रज्ञान अगदी मोफत मिळवू शकता.

 


हा लेख आवडला असेल तर नक्की शेअर करा!
Back to blog