Call 9923974222 for dealership.

पूर्वीच्या हंगामात तुमच्या परिसरात नागअळी (लीफमायनर) चा त्रास होता का?

जर आपल्या परिसरात मागील हंगामात नागअळीचा प्रादुर्भाव होता तर मग जागे व्हा! हो जागे व्हा. या वर्षी पुन्हा असा प्रादुर्भाव झाल्यास पुन्हा तेच महागडे कीटकनाशक वापरू असा अविर्भाव ठेवू नका. तुमचा खर्च वाया तर जाईलच शिवाय हि कीड तुमचे "उत्पादन" देखील कमी करेल. 

हा लेख पूर्ण वाचा म्हणजे तुम्ही योग्य नियोजन करू शकाल. खर्च वाचवून उत्पादन वाढवू शकाल!

नागअळीला इंग्रजीत लीफमायनर म्हणतात याचा शाब्दिक अर्थ "पानातील खाण कामगार" असा होतो. ज्या प्रमाणे खाण कामगार जमिनीखाली भुयारे खोदत बोगदा बनवत जातात त्या प्रमाणे  अळी अवस्थेत हि कीड पानाच्या मध्ये फिरत फिरत पानातला हिरवा गर खाते व मागे एक पांढरी रेषा सोडत जाते.

या किडीची उपस्थिती फक्त अळी अवस्थेत असतांनाच आपल्याला जाणवत असली तरी या किडीच्या जीवनचक्रात इतर किडी प्रमाणेच चार अवस्था दिसून येतात. अंडी-अळी-कोष-प्रौढ. प्रौढ अवस्थेतील कीड क्षेत्रीय प्रसार करते व विविध ठिकाणी पानावर अंडी देते.. या अंड्यातून निघणारी अळी पानाचा पृष्ठभाग पोखरून आत प्रवेश करते व भरगोस खाते. खावून झाले कि कोष बनवते. कोष पानात किंवा मातीतहि बनतात. हि अवस्था पूर्ण झाली कि यातून पुन्हा प्रौढ तयार होतो. अशा प्रकारे एकदा जीवनचक्र फिरले कि संख्या शेकडो पटीने वाढते. जीवनचक्र काही दिवसात पूर्ण होत असल्याने हा-हा म्हणता संख्या वाढते व परिस्थती हाताबाहेर जाते.   

अनेक वेळेला नागअळी मुळे खूप नुकसान होत नाही पण नागअळी च्या अनके प्रजाती असून काही विशिष्ट प्रजाती पिकनिहाय अक्षरशः अवेळी पानगळ करून संपूर्ण हंगाम बरखास्त करू शकतात. सर्वसाधारण पणे नागअळी पिकाला पूर्ण पणे मारू शकत नाही पण जर ती अगदी सुरवातीच्या टप्प्यात आली तर रोप पूर्णपणे मारू शकते. 

मित्रहो विविध पिकातील लीफमायनर नियंत्रित करण्यसाठी केंद्रीय कीटकनाशक बोर्डाच्या शिफारसी विचारल्यास आपल्याला सांगू शकतो पण तत्पूर्वी आपण अशी माहिती जाणून घेवू जिच्याने या किडीच्या नियंत्रणावरील तुमचा खर्च - खूप कमी असेल शिवाय आपल्याला अनेक फायदे होतील. 

शत्रूचा शत्रू मित्र असतो या नियमानुसार लीफमायनरच्या नियंत्रणासाठी त्याचे अनेक शत्रू आपली मदत करू शकतात. लीफ मायनर ला अनेक रोग होत असतात व हे रोग काही विशीष्ट बुरशी-जीवाणू किंवा विषाणू (व्हायरस) मुळे होतात. तसेच काही शिकारी किडे देखील आहेत जे लीफ मायनरची शिकार करतात. हि नियंत्रण प्रणाली  नैसर्गिक अवस्थेत सुरूच असते. जर आपण बेताल होऊन "ब्रॉड स्पेक्ट्रम" कीटनाश्कांची फवारणी केली तर हे नैसर्गिक नियंत्रण देखील प्रभावित होते व त्यातून मिळणारे फायदेदेखील संपृष्टात येतात.

हि बाब लक्षात घेवून आपल्या शेतात लीफ मायनर येण्या अगोदर किंवा आल्यावर त्याचे प्रमाण वाढण्या अगोदर खालील बाबी केल्या जावू शकतात.

पिकावर जाळी पांघरून प्रौढ कीड पानावर अंडी देवू शकणार नाही हे सुनिश्चित करणे. या साठी आपल्याला स्वस्त जाळी किंवा जाळीदार जुनी/टाकून दिलेली साडी वापरता येईल

परिणाम झालेली पाने काढून नष्ट केल्याने मदत मिळेल. हि प्रक्रिया अगदी सुरवातीच्या टप्प्यात केली तरच उपयोग होईल

पिकाला अचूक पाणी पुरवठा, संतुलित खते देवून त्यांचा वाढीचा जोम सुनिश्चित करावा. यासाठी आपण अमृत गोल्ड १९-१९-१९अमृत आळवणीमायक्रोडील ग्रेड २ चा उपयोग करू शकता.. 

टमाट्यातील लीफ मायनर चे नियंत्रण करण्यासाठी शेतात लावा हे सापळे

मृदेतील सेंद्रिय कर्ब योग्य प्रमाणत असल्यास पिकाची तब्येत जोमदार असते. जर आपण योग्य प्रमाणात भरखते दिली नसतील तर ह्युमोल गोल्ड देवून चूक सुधारू शकता.

पिवळे व निळे चिकट सापळे सातास तीन या प्रमाणात एकरी १० ते १२ लावले तर त्यावर अंडी देवू शकणारे प्रौढ चिटकून बसतील. एकदा चिकटले कि ते ना अंडी देवू शकतील ना मिलन करू शकतील. आमच्या  वेबसाईटवरून आपने हे उत्पादन खूप स्वस्तात खरेदी करू शकतात; पोष्टाच्या माध्यमातून अगदी दुर्गम भागात देखील हे उत्पादन घरपोच पाठवले जाते.

आयुर्वेदिक तेलावर आधारित फवारणीने आपण या किडीच्या जीवनचक्रातील विविध अवस्थेतील प्रगतीला रोखू शकतो. यातून अंडी देण्याची प्रक्रिया मंदावते व कीड नियंत्रणात राहते. २० ते २५ मिली प्रती पंप फवारणी केल्याने परिस्थिती नियंत्रणात रहाते. तांत्रिक दर्जाचे करंज व निम तेल आमच्याकडे उपलब्ध आहे.

--------------------------------

  3 comments

  • विस्तृत माहीतीबद्दल आभारी आहे

   Vitthal Gawade
  • वागी पिक किड़ खत माहिती

   Rajendra Shinde
  • खूप छान माहीती,आभार

   Sunil Mote

  Leave a comment

  Name and Mobile number .
  .
  Message with Address, District & Pincode .

  Please note, comments must be approved before they are published