दैव आणि जोखीम

दैव आणि जोखीम

  • प्रयत्नातून यश मिळते आणि निष्क्रियतेतून अपयश. हे एक वाक्य कितीही खरे असले तरी ते परिपूर्ण नक्कीच नाही.
  • तुमच्या व्यक्तिगत यशा/अपयशात, तुमच्या व्यक्तिगत प्रयत्ना/निष्क्रियते शिवाय “दैव आणि जोखीमेचा”चा देखील सहभाग असतो.
  • जग इतके क्लिष्ट आहे कि तुमचे सर्व शर्थीचे प्रयत्न यशाची खात्री देवू शकत नाही. दैवाची साथ, काही प्रमाणात का असेना, लागते. ती असेल किंवा नसेलहि म्हणूनच प्रत्यत्न करते वेळी कोणतेहि धाडस तुमचे संपूर्ण प्रयत्न निष्फळ ठरवू शकणार नाही हे बघायला हवे.
  • कोणत्याही खेळात आपण कधीच एकटे नसतो. इतर खेळाडू आणि अनेक ज्ञात-अज्ञात घटक काम करतात. तुमच्या एकट्याच्या जाणीवपूर्वक प्रयत्नापेक्षा तुमच्या हाताबाहेरील ज्ञात-अज्ञात घटक अजाणपणे तुमच्या व्यक्तिगत यश-अपयशाचा निर्णय घेतात.
  • “प्रेरणादाई धाडस” आणि “अविवेकी मूर्खपणा” यातील फरक धूसर असू शकतो व प्रसंग घडल्यावरच ते जाणवते. दैव आणि जोखीम प्रतिरूपे आहेत (मी व माझ्याशी कुठलाही संबंध नसलेल्या पण हुबेहूब माझ्यासारख्याच दिसणाऱ्या व्यक्ती प्रमाणे)
  • आपण कोणाचे कौतुक व प्रशंसा करता? आपल्यालाला कुणासारखे व्हायचे आहे? आपण कोणाकडे दुर्लक्ष करता? कुणासारखे होणे आपणास टाळायचे आहे? या बाबतीत खबरदारी घ्या किंवा यश फक्त आणि फक्त तुमच्या व्यक्तिगत प्रयत्नांनी व निर्णयांनीच मिळणार आहे असे गृहित धरु नका.
  • विशिष्ट व्यक्ती आणि केस स्टडीवर लक्ष केंद्रित न करता सर्वसाधारणपणे काय घडू शकते? आजपर्यंतचे घटनाक्रम कसे आहेत याचा विचार करा.
  • मनाजोग्या घटना घडल्या तर त्यांना नम्रतेने स्वीकारा आणि काही विपरीत घडले तर दया आणि करुणेचा विचार करा. कारण कोणतीही गोष्ट वाटते तितकी चांगली किंवा वाईट नसतेच.
  • जोखीम स्विकारा कारण त्याने लाभ होत असतो. पण असे वेडगळ धोके पत्करू नका ज्यामुळे भविष्यात छोट्या-मोठ्या जोखीम स्विकारणेहि अवघड होऊन बसेल. कारण प्रगती जोखीमीशिवाय होत नसते.
Back to blog