मका पिकाचे खत व फवारणी व्यवस्थापन

 मक्याची लागवड वर्षातून तीन वेळा करता येते. पावसाळी लागवड मध्य जून ते मध्य जुलै, रब्बी लागवड मध्य ऑक्टोबर ते मध्य नोव्हेंबर तर उन्हाळी लागवड जानेवारीत करता येते. 

लागवडीपूर्वी द्यायचा एकरी बेसल डोस 

  • डीएपी/१२-३२-१६ १०० किलो  सोबत एम ओ पी ५० किलो किंवा १०:२६:२६ १०० किलो 
  • ह्युमॉल जी शुगरकेन स्पेशल २० किलो 
  • मायक्रोडील कीट २३ किलो किंवा मायक्रोडील सॉईल ग्रेड २० किलो
  • रीलीजर ५ किलो

ह्युमॉल जी शुगरकेनच्या वापराने पांढरी सूक्ष्म मुळे भरपूर वाढतात ज्यामुळे अन्नद्रव्य चांगली शोषली जातात.

मक्याची लागवड

मायक्रोडील वापरल्याने सूक्ष्मअन्न द्रव्यांचा चांगला पुरवठा होतो ज्यामुळे पीक सहजासहजी कुठल्या रोग किंडीना बळी पडत नाही. 

मक्याचे पोषण

रिलीजर म्हणजे अतिसूक्ष्म कणांचे गंधक. ते लगेच पसरते व मुळांच्या क्षेत्रात सामू सुधारणा करते. यामुळे खतांचा अपटेक वाढतो. 

भूसुधारक

बिज प्रक्रिया

प्रति एकर ७-८ किलो बियाणे लागते.  त्यावर २५० ग्राम ह्युमॉल जेली व थायोमेंथोक्झाम ३० % एफ़ एस १६० मिली चोळावे. बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेडाझिम चा देखील वापर केला जावू शकतो.  

मक्याची बीजप्रक्रिया

लागवडीचे अंतर

दोन ओळीत दीड फुट, दोन रोपात ९ इंच असे ठेवावे.

 

व्यवस्थापन

लागवडी नंतर १० दिवसांनी करायची आळवणी (प्रती एकर): एक अमृत किट +  ३ किलो १९-१९-१९ सोबत दीडशे ते दोनशे लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी

 

मक्याचे अन्नद्रव्य संतुलन

अमृत कीट मुळे अन्नद्रव्य संतुलन साधले जाते.

 

लागवडीनंतर २०-२५ दिवसांनी करायची फवारणी (फाल आर्मी वर्म नियंत्रणा साठी):

प्रती १५ लिटर पंप पोकलॅड २० मिली, नुवान १५ मिली, झेब्रॉन ५० मिली व  ब्लेझ १५ मिली घ्यावे

 

लागवडी नंतर ३०-३५ दिवसांनी करायची आळवणी (प्रती एकर):

युरिया ५० किलो + एम ओ पी ५० किलो + मायक्रोडील झिंक सल्फेट १० किलो

 

लागवडीनंतर ५०-६० दिवसांनी करायची फवारणी (फाल आर्मी वर्म नियंत्रणा साठी):

प्रती १५ लिटर पंप पोकलेंड २० मिली + नुवान १५ मिली किंवा डेलिगेट १०-१२ मी ली  + झेब्रॉन ५० मिली +  ब्लेझ १५ मिली 

मक्याचे दाणे भरीव करण्यसाठी

झेब्रॉनच्या वापराने दाणे चांगले पोसले जातात त्यामुळे फवारणीतील हा घटक अजिबात चुकवू नये

या माहिती संदर्भात आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण श्री. अमोल पाटील यांना व्हाटसअप वर प्रश्न विचारू शकता. त्याकरिता स्कीन वर दिसणाऱ्या बटनावर क्लिक करावे.