फळमाशी विरुध्द मक्षीकारी

फळमाशी विरुध्द मक्षीकारी

शेतात फुलोरा आला कि मन स्वप्न पाहू लागते. मनाच्या आकांक्षा उचावतात. ते शिळ वाजवून आपला आनंद जाहीर करते....नेमक्या याच वेळी फळमाशी हल्ला करते. काल पर्यंत न दिसणारी माशी आज अचानक सर्व दूर पसरते...कुजकी फळे दिसू लागतात. मग वेड्यासारखे फवारे सुरु होतात. जो जे म्हणेल ती फवारणी सुरु होते. आनंदा कडून हताशे कडे जाणारी हि वाट शत्रूच्याही नशिबात येवू नये एव्हडाच एक विचार आपल्या मनात सुरु राहतो...आणि सुरु राहाते शेतातील फवारण्यांची फडफड.

अफाट शत्रूवर समोरून हल्ला न करता त्याला हरवायचे कसब मराठ्यांकडे होते. मुघलांची लाखोची फौज हल्ला कधी करायचा? कसा करायचा? आदेशाची वाट पाहात झोपा काढायची. शिवाजी महाराज आपल्या मावळ्यांना गनिमी कावा सांगायचे आणि हे चतुर मावळे झोपलेल्या मुघल सैन्याला झोपेत ठेवून त्याच्या मोहोरक्याला शोधून नेमके टिपायचे. युद्ध व्हायचेच नाही...विजय मात्र नक्की व्हायचा.. महाराजांचा विजय! मराठी शेतकऱ्यांसाठी यापेक्षा अधिक प्रेरणादायी काय असेल! फळमाशी विरुद्ध माक्षिकारी हा असाच एक गनिमी कावा आहे.

टरबूज, काकडी असे वेल वर्गीय पिके असोत कि आंब्यासारखे फळपिक....माक्षिकारी प्रलोभन सापळा वापरला कि फवारणी शिवाय फळमाशी नियंत्रणात येते. फळमाशीचे पूर्णपणे नियंत्रण होते, मालाचा दर्जा उत्तम राहतो, प्रादुर्भाव व फवारण्या न झाल्याने निर्यात करण्यास अडचण येत नाही.

----------------------------------------------

प्रत्येकाने वाचावे असे पुस्तक
---------------------------------------------

फळमाशीची एक मादी, नराशी मिलन झाल्यावर, तिच्या जीवनकाळात फळाच्या सालीखाली 500 ते 1000 अंडीपुंजके देते. त्यातून 3 ते 4 दिवसांत अळ्या बाहेर येतात. या अळ्या फळाच्या गरावर उपजीविका करून फळे कुजवतात. अळीचा नंतर कोष होतो व कोषातून प्रौढ माशी जन्मते. अशा प्रकारे एका वर्षात फळमाशीच्या अनेक पिढ्या पूर्ण होतात. या विशिष्ठ जीवनचक्रामुळे फळमाशी कमी काळात मोठ्या प्रमाणात उत्पत्ती करते. या उत्पत्ती चक्रात नर-मादी मिलन हि महत्त्वपूर्ण घटना असते. मक्षीकारी नेमक्या या घटनेवर आक्रमण करते. जेव्हा आपण शेतात माक्षिकारी सापळा लावतो त्यातील खास कामगंध फळमाशी च्या नराला कामक्रिये साठी उत्तेजित व प्रलोभीत करतो. सापळ्यात आलेला नर सापळ्यातच मरतो. हि प्रक्रिया इतकी प्रभावी असते कि शेतातील सर्व नर मरतात शिल्लक राहतात त्या फक्त माद्या! या माद्या नराचा शोध घेत फिरतात, त्यांची अंडी फलित होत नाहीत. एकूणच फळमाशीचे जीवनचक्र खंडते व फळमाशीचा प्रादुर्भाव टळतो.

याचा सर्वात महत्वाचा भाग शेतकरी मित्रांनी लक्षात घ्यायचा आहे. आपल्या शेतात फुलोरा आला कि माक्षिकारी सापळे लावा. सापळ्यात माशा मरतात कि नाही, त्या कमी आहेत कि जास्त याची चिंता करू नका. आपली फळे कुजत नाहीत याकडे लक्ष द्या.मित्रहो, पाटील बयोटेक ने माक्षिकारी हे उत्पादन २००० साली बाजारात आणले. त्यावर अथक संशोधन सुरु आहे. अनेक लहान मोठे प्रयोग व बदल करून आम्ही माक्षिकारीत सुधारणा करत राहतो. या उत्पादनाच्या बदलत्या वातावरणात सतत ट्रायल सुरु असतात, त्यामुळे मक्षिकारी आहे सगळ्यात अद्ययावत व पर्यावरण पूरक तंत्रज्ञान.

लक्षात असू द्या, आंबा, पेरू, सीताफळ, वेलवर्गीय फळ पिके जसे कलिंगड, खरबूज, भोपळा, दुधी, कारली, दोडके, गिलके, काकडी, तींडे अशा पिकात मक्षिकारी वापरायलाच हवे!

Back to blog