शेतकरी बांधवांसाठी उपयुक्त पुस्तके

फळमाशी: प्रश्न-उत्तरे

फळमाशी म्हणजे काय?

जानेवारी च्या शेवटी कार्यरत होणारी बॅक्‍ट्रोसेरा जातीची हि एक कीड असून जगभरात हिच्या चार हजार प्रजाती आहेत. या पैकी १०० प्रजातीमध्ये फळपिकाची मोठी हानी करायची क्षमता आहे. भारतात तिच्या सुमारे दोनशे प्रजाती असून त्यातील पाच ते सहा प्रजाती पिकांना थेट नुकसान पोचविणाऱ्या असल्याने महत्त्वाच्या मानल्या जातातबॅक्‍ट्रोसेरा डॉरसॅलिस, बॅक्‍ट्रोसेरा झोनाटा, बॅक्‍ट्रोसेरा करेक्‍टा व बॅक्‍ट्रोसेरा कुकुरबीटी  हि निवडक उदाहरणे आहेत.

मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने गेल्या काही वर्षात अंतरराष्ट्रीय स्तरावर या किडीची दखल घेतली आहे.

------------------

फेसबुक, व्हाटसएप व टेलेग्राम वरीलआमच्या सोशल गृप्सला जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा आणि वेळो वेळी प्रसारित होणारे लेख नियमित मिळवा.

------------------

फळमाशी कोण-कोणत्या पिकात हानीकारक आहे?

आंबा, पेरू, सीताफळ, वेलवर्गीय फळ पिके जसे कलिंगड, खरबूज, भोपळा, कारली व काकडी

फळ माशी प्रादुर्भावाची लक्षणे कोणती?

 • फळे वाकडे होतात
 • अकाली पक्वता येते
 • फळात अळ्या पडतात - बुरशी लागते 
 • फळांवर डाग दिसतात
 • फळगळ होते

फळावर अशी खुण म्हणजे फळमाशीचा प्रादुर्भाव

फळमाशीचे जीवनचक्र कसे असते?

फळमाशीचे मिलन 

फळमाशीची एक मादी, नराशी मिलन झाल्यावर, तिच्या जीवनकाळात फळाच्या सालीखाली 500 ते 1000 अंडीपुंजके देते. त्यातून 3 ते 4 दिवसांत अळ्या बाहेर येतात. या अळ्या फळाच्या गरावर उपजीविका करून फळे कुजवतात. अळीचा नंतर कोष होतो. गळलेल्या फळातील कोश मातीत मिसळतात. कोषातून प्रौढ माशी जन्मते. अशा प्रकारे एका वर्षात फळमाशीच्या अनेक पिढ्या पूर्ण होतात. या विशिष्ठ जीवनचक्रामुळे फळमाशी कमी काळात मोठ्या प्रमाणात उत्पत्ती करते.

फळ निर्यातीसाठी फळमाशी बद्दल काय नियम आहेत?

फळमाशीचा प्रादुर्भाव फळतोडणी आधी होत असला, तरी फळ वाहतुकीदरम्यान वा मार्केटमध्ये येताना प्रादुर्भाव दिसून येतो. म्हणूनच फळमाशी ही "क्वारंटाइन' कीड आहे. (एका देशाहून दुसऱ्या देशात शेतमाल आयात-निर्याती वेळी महत्त्वाची) युरोप, अमेरिका आदी देशांत ही माशी "क्वारंटाइन' म्हणून जाहीर झाली आहे. त्यामुळे आंबा, कारले आदी शेतमाल निर्यात या देशांत करताना त्यात फळमाशीचा आढळ चालत नाही.

फळमाशी वर उपाय काय?

फलमाशीचा प्रकोप झाल्यावर उपाय करणे म्हणजे "वराती मागून घोडे" असे आहे. जर तुम्ही आंबा, पेरू, सीताफळ, कलिंगड, खरबूज, भोपळा, कारली व काकडी हि पिके घेत असाल तर पाटील बायोटेक चे माक्षिकारी सापळे वापरायला हवे. बाग स्वच्छ ठेवावी. सामुहिक स्तरावर नियंत्रणाचे प्रयत्न करणे अधिक फायद्याचे ठरते.

फळमाशी नियंत्रणासाठी कुणाला संपर्क करावा? 

पाटील बायोटेक चे माक्षिकारी हे उत्पादन महाराष्ट्रातील २००० पेक्षा अधिक कृषीसेवा केंद्रात उपलब्ध आहे. लिक्विड व टॅब स्वरुपात उत्पादन देणारी पाटील बायोटेक हि एकमेव कंपनी आहे. माक्षिकारीत चारपेक्षा अधिक प्रभावी घटक असून त्यांची नावे व प्रमाण गुप्त ठेवल्याने, प्रतिस्पर्धी कंपन्या दुय्यम दर्जाचे उत्पादन विकत आहेत.

आपल्या जवळच्या कृषीकेंद्राचा पत्ता मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा. आपण हे उत्पादन ऑन लाईन स्टोअर मधून देखील खरेदी करू शकता.

आपण ऑनलाइन देखील खरेदी करू शकता. विशेष ऑफर मध्ये ५० % सूट आहे.

5 comments

 • 10 maxshikari pahije

  Nitin Suryawansh
 • 1 सेट फळमाशी नियंत्रण करणारे ट्रॅप पाहिजे

  राहुल सहारे
 • Sundar mahiti dilit.Aabhar.

  Namdeorao Indalkar.
 • Good…very Good

  देशमुख लक्ष्मण माधवराव
 • आपली प्रतिक्रिया छान

  Ganesh Gaonkar

Leave a comment

Name and Mobile number .
.
Message with Address, District & Pincode .

Please note, comments must be approved before they are published