Call 9923974222 for dealership.

मक्षीकारी - कामगंध सापळा का, कसा व कुणी वापरावा?

जेंव्हा कोणतीही समस्या निर्माण होते तेव्हा आपल्या मनात त्या समस्येला सोडवण्यासाठी लागणाऱ्या पर्यायांचा विचार निर्माण होतो. जसे घरात साप घुसला तर आपण काठी शोधतो; तहान लागली तर पाणी' तलब लागली तर चहा!

मित्रहो जेव्हा शेतात कुठलीतरी कीड आली आहे हि समस्या आपल्या पुढे येते तेव्हा आपण लेगेच पर्याय शोधतो - कीटकनाशकाचा. पण जर हि कीड कीटकनाशकाने नियंत्रित होत नसेल तर काय?

कापसातील गुलाबी बोंडअळी/शेंदरी अळी, टमाट्यातील पतंग, वान्ग्यातील फळपोखरणारी अळी, कापूस-मका-तूर-हरभरे या पिकात येणारी हेलीकोव्हर्पा व वेलवर्गीय फळात (टरबूज, खरबूज, काकडी, कारले, दुधी ई) व आंबा-पेरू अशा फळबागेते येणारी फळमाशी  या अशा किडी आहेत ज्यावर कोणतेही कीटकनाशक पूर्णपणे नियंत्रण मिळवू शकत नाही. विशेष करून फळमाशी या किडीस कीटकनाशकाची कोणतीही शिफारस करण्यात आलेली नाही. मग या किडींसाठी काय करावे हा मोठा प्रश्न आपल्या समोर निर्माण होतो. या ब्लॉग मध्ये आपण फळमाशी नियंत्रणासाठी काय पर्याय आहे याची माहिती घेणार आहोत.      

फळमाशी सहजासहजी नजरेत पडत नाही. जेव्हा शेतातील फळे आतून पूर्णपणे सडू लागतात किंवा त्यावर माशीच्या डंखाचे व्रण दिसतात किंवा फळे वाकडी-तिकडी वाढतात तेव्हा "फळमाशी" च्या अस्तित्वाची शेतकऱ्यास जाणीव होते.

वरील फोटोत आपण टरबूजाच्या फळावर फळमाशीने केलेली जखम व फळाच्या खाली दोन फळमाश्या पाहू शकतो.फळमाशी सर्वसाधारणपणे फळाच्या पृष्ठभागावर जखम करते. अनेकवेळेला ती फुलाच्या बीजकोषावर देखील जखम करू शकते. अश्या प्रकारे जखम करून ती त्या ठिकाणी अंडी घालत असते.

आता आपण फळमाशीच्या नियंत्रणासाठी "मक्षिकारी" का वापरावे? हे जाणून घेवू.

"मक्षिकारी" हा फळमाशीचा कामगंध सापळा आहे. शेतात एकरी ६ ते ८ मक्षिकारी सापळे लावले कि यात फळमाशा मरून पडतात व कीड पूर्णपणे नियंत्रणात येते. इतर कुठल्याही कीटकनाशकाच्या फवारणीची आवश्यकता शिल्लक उरत नाही. या कामगंध सापळ्याचे दोन भाग आहेत, "कामगंध वडी किंवा ल्युअर व पिंजरा किंवा ट्रॅप.

मक्षिकारीच्या ल्युअरमध्ये "फळमाशीच्या मादेचा" कामगंध टाकलेला असतो. हा गंध माणसाला येत नाही पण "फळमाशीच्या नराला" येतो. जेव्हा शेतकरी शेतात मक्षिकारी ल्युअर व ट्रॅप टांगतो तेव्हा, फळमाशीचे नर "कामगंधा" मुळे कामोत्तेजीत होतात व "ल्युअर व ट्रॅप" कडे आकर्षित होतात. ट्रॅप मध्ये आल्यावर त्यातील विषारी वायूने "हे नर ट्रॅपमध्येच मरून पडतात".

परिसरातील सर्व नर मरून पडतात, रहातात फक्त माद्या. या माद्यांना मिलना साठी नर "उपलब्ध" होत नसल्याने त्या "अंडी" देवू शकत नाही. "त्या मुळे फळ माशी चे प्रजनन "थांबते". 

 मक्षिकारी नाही वापरले तर काय होईल?

फळमाशीची एक मादी, नराशी मिलन झाल्यावर, तिच्या जीवनकाळात 500 ते 1000 फळांच्या सालीखाली अंडी देते.

प्रत्येक अंड्यातून 3 ते 4 दिवसांत अळी बाहेर येते व फळाचा गर खावू लागते. पुढे या भागावर बुरशी जगू लागते व फळ कुजायला सुरवात होते.

अळीचा नंतर कोष होतो. गळलेल्या फळातील कोश मातीत मिसळतात. कोषातून प्रौढ फळमाशी जन्मते. अशा प्रकारे एका वर्षात फळमाशीच्या अनेक पिढ्या पूर्ण होतात. या विशिष्ठ जीवनचक्रामुळे फळमाशी कमी काळात मोठ्या प्रमाणात उत्पत्ती करते. नियंत्रण केले नाही तर फळमाशीमुळे १०० टक्के फळे वाया जाण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. 

मक्षिकारी चा वापर कसा व केव्हा करावा?

माक्षिकारी वापरणे अगदी सोपे आहे. ट्रॅपच्या बुडाकडील बारीक छिद्रातून ल्युअरचा तार ओवावा व झाकण लावून तयार झालेला सापळा पिकाच्या उंचीच्या थोड्या वर टांगून द्यावा. ल्युअरला हाताचा स्पर्श होणार नाही किंवा इतर काही घाण चिटकणार नाही याची काळजी घ्यावी. एकरी सहा ते आठ माक्षिकारी सापळे पुरेसे होतात. प्रकोप जास्त असेल किंवा क्षेत्रात पिकाची लागवड मोठी असेल तर जास्तीत जास्त एकरी बारा सापळे लावावेत. फळमाशी फुलाच्या बीजकोशावर अंडी देवू शकते त्यामुळे पिक फुलावर यायच्या वेळेपासूनच सापळे लावणे आवश्यक असते. ल्युअरची क्षमता ४५ दिवस टिकते त्यामुळे दर ४५ दिवसाला सापळ्यातील ल्युअरची वडी बदलवावी.

 

मक्षिकारी चा वापर कुणी करावा?

फळमाशी चा प्रकोप अनेक वेलवर्गीय व वृक्षवर्गीय फळात होतो. जसे आंबा, पेरू, सीताफळ, पपई, केळी, कलिंगड, खरबूज, भोपळा, दुधीभोपळा, गंगाफळ, कारले, गिलके, दोडके,  कडी ई. जे शेतकरी बांधव या पिकांचे उत्पादन घेत आहेत त्यांनी पिक फुलावर यायच्या वेळी मक्षिकारी चा वापर करायलाच हवा. 

इतर कुठल्याही उत्पादनापेक्षा मक्षिकारी कसे श्रेष्ठ आहे?

फळमाशीचे नियंत्रण कीटकनाशकच्या माध्यमातून होणे अशक्य आहे. कोणतेही कीटकनाशक फवारणीनंतर आठवडेभरापेक्षा जास्त काळ कार्यक्षम रहात नाही. या किडीची उडण्याची क्षमता चांगली असल्याने परिसरातून नवीन माशा सातत्याने पिकावर येतच रहातात. मक्षिकारी चे सापळे ४५ दिवस पूर्ण क्षमतेने काम करत असल्याने अशा बाहेरून येणाऱ्या फळमाशीला नियंत्रणात ठेवतात. कुठलेही कीटनाशक "माक्षिकारी" ची बरोबरी करू शकत नाही. या व्यतिरिक्त "मक्षिकारी" चा व पिकाचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संपर्क होत नाही, त्या मुळे कीटकनाशमाच्या रेसिड्युचा प्रश्न निर्माण होत नाही. पर्यावरणपूरक असल्याने सेंद्रिय शेतीत मक्षिकारीच्या वापरास परवानगी आहे.

मक्षिकारी चा फॉर्म्युला किती दमदार आहे हे वरील फोटोवरून स्पष्ट दिसते. जर सापळे लावण्यास उशीर झाला असेल व शेतात फळमाशी मोठ्या प्रमाणात असेल तर ल्युअरचे पाकीट उघडल्यावर सापळा बनवायच्या आत अनेक फळमाशा येवून मरतात. मक्षिकारीच्या गंध लहरी वेगाने पसरतात व ४५ व्या दिवसापर्यंत याची क्षमता टिकून रहाते 

 
मक्षिकारी कुठे मिळेल?

पाटील बायोटेकचे मक्षिकारी हे उत्पादन महाराष्ट्रातील २००० पेक्षा अधिक कृषीसेवा केंद्रात उपलब्ध आहे. इथे क्लिक करून आपण आपली मागणी नोंदवू शकता

  

प्रत्येक पिकासाठी पाटील बायोटेक तंत्रज्ञान उपलब्ध आहे.

तंत्रज्ञान म्हणजे काय हे जाणून घेण्यसाठी

इथे क्लिक करा.

 

आपण आमच्या फेसबुक व टेलेग्राम सोशल गृपला जुळून नियमित प्रसारित होणारी माहिती प्राप्त करू शकता. त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

15 comments

 • टरबुज लागवडकरुन 52 दिवस झाले फुगवन वाडविण्यासाठी कोणतीखते सोडली पाहिजे

  Dinesh Bhamare
 • Very nice

  Omprakash Laxmenrao Pawle
 • खुप छान विषमुक्त ओषध पेक्क्षा हे चांगले आहे

  निलेश म्हसाडे
 • Good

  Babasaheb Bhausaheb Kale
 • Chan

  Lalit dilip chaudhari

Leave a comment

Name and Mobile number .
.
Message with Address, District & Pincode .

Please note, comments must be approved before they are published