महाउद्योजक शेतकऱ्याचे स्व-मुल्यांकन

महाउद्योजक शेतकऱ्याचे स्व-मुल्यांकन

अनिश्चिततेच्या खेळात सर्वात पुढे असलेला खिलाडी म्हणजे शेतकरी. राखरांगोळीतून पुनःपुन्हा भरारी घेणारा  फिनिक्स पक्षी म्हणजे शेतकरी. कुठलीही शाश्वती नसतांना, घरदार गहाण ठेवून, इतरांना रोजगार व अन्नधान्य देणारा, स्वत:ला काय मिळेल याचा विचार न करता उद्योग करणारा महाउद्योजक म्हणजे शेतकरी.

शेतकरी मित्रहो, तुमचे हे गुणगान तुम्हाला ओंजारू-गांजारू शकते पण यशस्वी शेतकरी बनवू शकत नाही. सरकारी मदत, माध्यमातील सांत्वन कुठल्याही शेतकरी बांधवास उपयोगी सिद्ध होत नाही. 

ज्या प्रमाणे यशस्वी उद्योजक स्वत:चे मुल्यांकन करून घेतात त्याप्रमाणे शेतकरी देखील स्वमुल्यांकन करून घेवू शकतात. 

यथे एक तक्ता देत असून, प्रत्येक हंगामानंतर त्याचा अभ्यास करावा. कधीच नाही साठी १ मार्क, कधी कधी साठी २ मार्क, काही वेळा साठी ३ मार्क व नेहमी साठी चार मार्क द्यावे. स्वत:, कुटुंबातील सदस्यांकडून व जवळच्या मित्राकडून हा तक्ता भरून घ्यावा. स्वत:च्या नजरेतून व इतरांच्या नजरेतून स्वत:चे मुल्यांकन लक्षात घ्यावे. तुमचे मुल्यांकन किती झाले हे बघून खुश किंवा नाराज होण्या ऐवजी पुढच्या वेळेस ते कसे सुधारेल यासाठी प्रयत्नशील रहावे.

शेतकऱ्याच्या व्यवस्थापन कौशल्याचे मुल्यांकन

 मी/आम्ही कधीच नाही कधी कधी काही वेळा नेहमी
शेतीच्या बाबतीत लहान व मोठी लक्ष्य ठरवतो
हि लक्ष्य नोंदवून ठेवतो
अचूक हिशोब ठेवतो
खते व औषधी च्या किमतीची व वापराची लिखापढ ठेवतो
दर महिन्याच्या आर्थिक उलाढालीचे नियोजन व पालन करतो
शेतातील प्रत्येक कामाच्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष खर्चाची किंमत जाणतो
कर्ज सहज फेडू शकतो 
खर्चाचे निर्णय व्यावहारिकदृष्ट्या चांगले घेतो
कृषीयंत्र सामुग्री, बांधकाम व इतर मालमत्ता जपतो
शेतीच्या सर्व कामांची वेळ ठरवतो व वेळेत पूर्ण करतो
कामाच्या गरजेनुसार मजूर उपलब्ध करून घेतो
शेतावरील कर्मचारी नेमणे, प्रशिक्षित करणे, कमी करणे याबाबत हय गय करीत नाही
जोखीम कमी करण्यासाठी काटेकोर नियोजन करतो (विविध पिके घेतो, वेगवेगळ्या बाजारात विकतो, पिक विमा काढतो)
शेतीचा कस टिकून राहील, जमिनीची धूप होणार नाही हे बघतो
शेतात तण वाढू देत नाही, दिवसेंदिवस तण कमी होते आहे
शेत पहाण्यासारखे ठेवतो व आवर्जून दाखवतो 
नियमित वाचन करतो, नवीन काय ते शोधतो, विविध कार्यक्रमात भाग घेतो

 

Back to blog