दर्जेदार टरबूज पिकवा कमी खर्चात

दर्जेदार टरबूज पिकवा कमी खर्चात

उन्हाळा येतो आहे. अनुभवी शेतकरी बांधवांनी टरबूजाचा हंगाम घ्यायचे ठरवले आहे. मागील वर्षी बाजारभावाचा फटका बसल्यामुळे काही शेतकरी या वर्षी हात आखडता घेतील तर काहींच्या शेतात उसाचा खोडवा काढल्यावर पुढील उस लागवड होईपर्यंत शेत रिकामे पडू नये म्हणून टरबूज लागवडीचा निर्णय होईल.

वालुकामय, पोयट्याची, मध्यम ते काळी, पाण्याचा निचरा असणारी, सेंद्रिययुक्त जमीन लागवडीसाठी उत्तम असते. आठपेक्षा जास्त सामू, चुनखडीयुक्त, चोपण जमीन लागवडीत हे पिक घेवू नये.

उष्ण, भरपूर सूर्यप्रकाश व कोरडे हवामान चांगले मानवते. कलिंगडाच्या उत्तम वाढीसाठी २२ ते २५ अंश सेल्सिअस तापमान उपयुक्त असते. वाढीच्या कालावधीमध्ये हवेमध्ये दमटपणा व धुके असल्यास वेलीची वाढ व्यवस्थित होत नाही. पीक रोगास बळी पडण्याची शक्यता असते.

सर्वसाधारणपणे १५ डिसेंबर ते १५ फेब्रुवारी दरम्यान लागवड करावी. फळे ऐन उन्हाळ्यात एप्रिल-मे मध्ये बाजारात विक्रीसाठी तयार होतात. त्यांना मागणी अधिक राहते. काही शेतकरी लागवड ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात करतात. ही फळे नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये तयार होतात.

वाणांची निवड, रोपनिर्मिती, विद्राव्य खते, ठिबक, मल्चिंग पेपर तसेच आधुनिक व एकात्मिक व्यवस्थापन या सर्वांचा नियोजनबद्ध अवलंब केला तर टरबूजाचे उत्पादन वाढते,दर्जा चांगला येतो व खर्चदेखील कमी होतो. विस्तृत व प्रत्यक्ष मार्गदर्शनासाठी आजच संपर्क करा.

 

Back to blog