टरबूज काढणीपूर्वी त्यात इंजेक्शनने लाल रंग सोडावा का?

आपल्या शेतात येणारे उत्पादन चांगल्या दराने खपावे असे कोणत्या शेतकरी बांधवाला वाटणार नाही? प्रत्येकाला "चांगला दर" हवाच असतो. काढणीपुर्वी टरबूजात इंजेक्शनने लाल रंग सोडावा का? असा प्रश्न एका शेतकरी बांधवाने विचारला त्याला काय उत्तर द्यावे म्हणून हा लेख प्रपंच करीत आहे.

मित्रहो, हातून चुकून पाप घडले तरी त्यासाठी क्षमा मागणे हि आपली संस्कृती आहे त्यामुळे क्षणिक मोहात हा प्रश्न विचारला गेला आहे हे अगदी स्पष्ट आहे. असे कुठलेही काम करू नका ज्यामुळे आपल्या शेतात पिकलेले अन्न खाणाऱ्याला "कर्क रोगासारखा आजार" होण्याची शक्यता वाढेल. शिवाय अशी कृती केल्याने नंतर आपल्याच अंतर्मनात अपराधीपणाची भावना निर्माण होऊन  मिळवलेला पैसा आपल्याला समाधान लाभू देणार नाही. तेव्हा आपण स्वत:शी प्रतारणा करू नये.

फेसबुक, व्हाटसअप यासोशल माध्यमातून अनेक चुकीच्या गोष्टी पसरवल्या जातात त्यामुळे आपण त्यावर विश्वास ठेवू नका. टरबूजात इंजेक्शनने रंग देण्याचा व्हिडीओ मीदेखील बघितला आहे. दिल्ली सारख्या शहरात कदाचित असे घडतहि असेल. लोकं चोरी-दरोडेखोरी-लबाडी करून पैसा कमवतात, तो त्यांचा पेशा असतो. आपण शेतकरी आहोत आपल्याला ते भावणार/मानवणार नाही.

टरबूजात लाल रंग असणे हि एक नैसर्गिक बाब आहे, योग्य पद्धतीने लागवड, व्यवस्थापन केले तर फळाला नैसर्गिक रंग व चव "हे गुणधर्म" आपोआप प्राप्त होतात. आपल्या लागवडीत व व्यवस्थापनात काही "चुका झाल्या तरच बेरंग-बेचवपणा" निर्माण होऊ शकतो. तसे होऊ नये म्हणून काय करावे?

    1. बियाण्याची निवड नीट करावी. बाजारात अचानक आलेले नवीन बियाणे संपूर्ण शेतात लावू नये. एखाद्या कोपऱ्यात लावून त्याची चाचणी करावी. संपूर्ण शेतात लागवडीसाठी नामांकित व पारखलेले  बियाणे विश्वासू ठिकाणून रीतसर बिल घेवून खरेदी करावे. थोडे बियाणे पॅकिंग सहित राखून ठेवावे. आपल्याला ज्ञान व आवड असेल तर घरचे बियाणे देखील विकसित करू शकता. "शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी" याचा कधीच विसर पडू देवू नका.

----------------------------

मित्रहो आपण कोणत्याही पिकाचे उत्पादन घ्या पण त्याच्या मार्केटिंगचा विचार पहिले करावा. 

पाटील बायोटेक यामध्ये आपली मदत करू शकते.

आपले कृषीउत्पादन कधी विक्रीसाठी तयार होईल व इच्छुक खरीददार आपणास कोणत्या मोइबाइल नंबरवर संपर्क करू शकतो हे आपण आम्हाला सांगावे. हि माहिती आमच्या फार्म एक्चेंज या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रसारित करण्यात येईल. यात आमचे कोणतेही कमिशन नसेल.

आपण यात विशेष सहकार्य करू शकता.

पाटील बायोटेकच्या पोष्ट आपण नित्याने शेअर करा जेणेकरून त्या व्हायरल होतील व शेतकरी बांधवांचा नंबर अधिकाअधिक खरीददारांपर्यंत पोहोचेल.

अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा

----------------------------

  1. प्रत्येक शेतकरी बांधवाने खत व कीड व्यवस्थापनात हातोटी विकसित करणे आवश्यक आहे. प्रार्थमिक, दुय्यम व सूक्ष्मअन्नद्रव्य खतांचे संतुलन राखणे महत्वाचे आहे. या साठी पाटील बायोटेक आपल्याला नियमित मदत करते. आमच्या संपर्कात राहून मार्गदर्शन मिळवत रहावे.
  2. कीड व्यवस्थापन हि एक कला आहे हे लक्षात घेणे खूप महत्वाचे आहे. संतुलित खत व्यवस्थापन केल्याने पिकाची रोगप्रतिकार शक्ती चांगली कार्यरत रहाते. चिकट सापळे वापरल्याने उडणारी कीड वेळे अगोदर लक्षात येते. प्रतिबंध करणे शक्य होते.चिकट सापळ्यांची संख्या क्रमश: वाढवून रासायनिक कीटकनाशकांची फवारणी काही काळ पुढे ढकलता येते. फळमाशी हि एक घातक कीड आहे. तिच्या नियंत्रणासाठी मक्षिकारी सर्वात  प्रभावी सापळे आहेत. पिकाची रोगप्रतिकारशक्ती उत्तम ठेवण्यासाठे अरेना चॉकलेटची व बुरशी/लालकोळीच्या नियंत्रणासाठी रिलीजरची फवारणी केल्याने रासायनिक फवारण्या टाळण्यास मोठी मदत मिळते. 

हा लेख संपवण्यापूर्वी "योग्य पद्धतीने शेती केल्यास "इंजेक्शन" सारखे घातक प्रयोग करायची गरज नाही." असे मला अधोरेखित करायचे आहे.  

मित्रहो आपल्याला हा लेख कसा वाटला? मनात काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. आमचे तज्ञ आपली मदत करतील. 

आमची महत्वपूर्ण उत्पादने आपण खाली स्क्रोल करून बघू शकता. ऑनलाईन खरेदी देखील करू शकता!

  

या पिकासाठी पाटील बायोटेक तंत्रज्ञान उपलब्ध आहे.

तंत्रज्ञान म्हणजे काय हे जाणून घेण्यसाठी

इथे क्लिक करा.