टरबूजातील कीड व रोग नियंत्रण
कोणत्याही पिकातील कीड व रोग नियंत्रण करते वेळी पिकाचा दर्जा घसरणार नाही याचा विचार करणे आवश्यक आहे. अकारण व अनियंत्रित कीटकनाशक व बुरशीनाशकाच्या फवारणी मुळे टरबूज दिसायला चांगले दिसेलहि कदाचित पण ते खाल्ल्याने आरोग्यास अपाय होऊ शकतो. असा अपाय लगेच होणार नसल्याने प्रत्यक्ष दोष शेतकऱ्यावर येतच नसतो, पण तुमचे मन तुम्हाला खावू शकते!
------------------
फेसबुक, व्हाटसएप व टेलेग्राम वरीलआमच्या सोशल गृप्सला जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा आणि वेळो वेळी प्रसारित होणारे लेख नियमित मिळवा.
------------------
टरबूजात नागअळी, लाल भुंगेरे, फळमाशी या किडींचा व मर, भुरी, खोडावरील डिंक्या आणि करपा या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव येत असतो. संतुलित खत मात्रा व मृदेचे स्वास्थ्य चांगले नसेल तर अन्नद्रव्य कमतरतेची लक्षणे दिसून येतात. टरबूजचे अलीकडील काळात आलेल्या काही नवीन वाण सुतकृमी ला लवकर बळी पडतात. योग्य काळजी न घेतल्यास अकारण कीटकनाशक व बुरशीनाशकांच्या फवारणी मुळे खर्च वाढू शकतो.
पाटील बायोटेकची काही खास उत्पादने आपल्या टरबूजावर किडी, बुरशी, सुतकृमी व सूक्ष्मअन्नद्रव्य कमतरता येवू देत नाही. आपण यांची थोडक्यात ओळख करून घेवू
भू'सुधारक': हुमणासूर
"हुमणासुर" हे जैविक मृदा सुधारक आहे. एकरी ३ किलो चा डोस असून त्याला आपण ड्रीप द्वारे, आळवणीने किंवा चांगल्या कुजलेल्या शेण खतात किंवा कंपोष्ट खतात मिसळून पसरवू शकतो. "हुमणासुर" मुळे मृदेत कायटीन भक्षी सूक्ष्मजीवांची संख्या वाढीसलागते. बुरशी स्वरूपातील कायटीनभक्षी सूक्ष्मजीव कायटीन युक्त शरीर असलेल्या किडी जसे हुमणी, वाळवी व सुतकृमी यांचा नाश करते.
पूरकअन्नद्रव्य व्यवस्थापन: अर्मृत गोल्ड, मायक्रोडील
अमृत गोल्ड या खत शृंखलेत एन पी के १९-१९-१९ / १३-४०-१३/ १२-६१-००/००-५२-३४/१३-००-४५/००- ००-५० हि सहा पूर्णपणे विद्राव्य खते असून पिकाच्या वाढीच्या अवस्थेप्रमाणे फवारणी व ड्रीप च्या माध्यमातून देता येतात. चांगल्या वाढीसाठी १९-१९-१९ / १३-४०-१३, शाखीय वाढीसाठी १२-६१-००, फुलोरा व फळधारणा उत्तम व्हावी म्हणून ००-५२-३४ / १३-००-४५ / ००-००-५० असा वापर करावा.
--------------------
--------------------
मायक्रोडील ग्रेड २ हे लोह, जस्त, मंगल, तांबे, बोरॉन व मोलाब्द युक्त खत फवारणी व ड्रीप मधून देता येते. यातील सूक्ष्मद्रव्य चिलेटेड स्वरूपातील असल्याने पूर्णपणे लागू होतात.
चिकट सापळे: वाय एस टी, बी एस टी
एकीकृत कीटक नियंत्रण पद्धतीत या उत्पादनाचा पुरस्कार केला जातो. उड़णारया किटकांचा अभ्यास व् नियंत्रणात उपयोगी आहे. उड़णारया किटकांचे वेळीच नियंत्रण केल्याने त्यांच्या माध्यमातुन पसरणारया बुरशी व् व्हायरसचे देखिल नियंत्रण होते. याच्या वापराने
- पिकात येणाऱ्या किडींची माहिती वेळेवर मिळते
- ट्रैप वर चिकटलेल्या कीटकांचे प्रजनन रोखले जाते
- अनावश्यक कीटनाशक फवारणी पासून वाचले जाऊ शकते
- कीटनाशक फवारणीची परीणामकता अभ्यासता येते
- कमीत कमी फवारणीमुळे रेसीड्यू चा धोका कमी होतो
- फवारणी च्या खर्चात बचत होते
- कीटक विविधतेचा अभ्यास करता येईल
- मित्र व् शत्रु किडींचा अभ्यास केला जावू शकतो
कामगंध सापळा: मक्षिकारी
हा एक कामगंध असून, आंबा, पेरू, संत्र, सीताफळ, पपई, टरबूज, खरबूज, काकडी, कारले या पिकातील फळमाशी च्या नियंत्रणासाठी अतिशय प्रभावशाली आहे.
माक्षिकारी दोन स्वरुपात उपलब्ध आहे:
- टॅब-ट्रॅप
- लिक्विड
एक एकर क्षेत्रात मक्षिकारी चे ६ ते ८ सापळे टांगले कि त्यात फळमाशीचा नर येवून मरतो. मादीस मिलनासाठी नर न मिळाल्यामुळे ती फळात अंडी देवू शकत नाही.
पिकावर कुठलीही फवारणी करायची गरज रहात नसल्याने हे उत्पादन लोकप्रिय आहे.
तंत्रज्ञान म्हणजे काय हे जाणून घेण्यसाठीइथे क्लिक करा. |
अत्यंत उपयुक्त माहिती शेतकरी मीत्रांकरिता शिवाय आकर्षक ऑफ़र सहित 🤷♂️
केळी संदर्भात मार्गदर्शन माहिती, लागवड कधी,कशी जात कुठली परिपूर्ण माहिती द्यावी.
Nice
I like this product
खुप छान माहिती आहे शेतकरी बांधवांना त्याचा चांगला फायदा होईल