कोणतेही पिक विचारात घ्या, शेतकरी बांधवास लागोपाठ तीन वर्ष "हवातसा" नफा झाला आहे असे उदाहरण सापडणार नाही. अगदीच बोटावर मोजण्या इतक्या शेतकरी बांधवास हे शक्य होते. ज्यांना दोन वर्ष नफा झाला असे थोडेच जास्त असतात. तीन पैकी एका वर्षी नफा झाला अशांची संख्या बऱ्यापैकी असते. हवातसा नफा होतच नाही असे शेतकरी शोधावे लागत नाही. ९९ टक्के शेतकरी शेवटच्या वर्गातले असतात. आपणास जर सातत्याने नफा कमवून यशस्वी गटात सामील व्हायचे असेल तर काहीतरी वेगळेपण निर्माण करावे लागेल. हे वेगळेपण जपावे लागेल.
------------------
फेसबुक, व्हाटसएप व टेलेग्राम वरीलआमच्या सोशल गृप्सला जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा आणि वेळो वेळी प्रसारित होणारे लेख नियमित मिळवा.
------------------
पेरणीपूर्व ते विक्रीपश्चात - या संपूर्ण प्रक्रियेतील एका पेक्षा अधिक टप्प्यात आपणास कल्पक बदल करावे लागतील. विचार-विनिमयातून, अनुभवातून काही पद्धती बदलाव्या लागतील. हिशोब व व्यवाहारातून नफा वाढवता येईल!
टरबूज पिकाच्या बाबतीत काय काय कल्पकता केली गेली आहे याचा आपण एक आढावा घेवू.
जोखीम कमी करून नफा वाढवायचा प्रयत्न काही शेतकरी बांधवांनी केला आहे.
फेब्रुवारी 2, २०१२ च्या एग्रोवन मधील लेखानुसार चालगणी ता. उमरेड जिल्हा यवतमाळ येथील शेतकरी श्री. सुरेश कदम यांनी सहा एकरांतील उसात आंतरपिक म्हणन टरबूज घेतले. उसाला पाणी देण्याकरिता ठिबक सिंचनाची व्यवस्था करण्यात होती, "ड्रीपर'जवळ टरबूज बियाणे लावण्यात आले. उसाला देण्यात आलेल्या खतांचा वापर टरबुजाला करण्यात आला.
------------------
फेसबुक, व्हाटसएप व टेलेग्राम वरीलआमच्या सोशल गृप्सला जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा आणि वेळो वेळी प्रसारित होणारे लेख नियमित मिळवा.
------------------
डीएपी, युरिया, पोटॅश, सुपर फॉस्फेट, मॅग्नेशिअम सल्फेट, कॅल्शिअम नायट्रेट या खताव्यतिरिक्त ठिबक सिंचनाद्वारे पिकाला विद्राव्य खते दिली. टरबूज पिकावरील कीड व रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रासायनिक कीडनाशकांच्या सुमारे सहा फवारण्या केल्या
टरबुजाचे एकरी 16 टन उत्पादन मिळाले. चांगल्या दर्जाचा माल साडेपाच रुपये प्रति किलो दराने विकण्यात आला. 15 टन मालाची साडेपाच हजार रुपये प्रति टन याप्रमाणे विक्री केली. उर्वरित साधारण दर्जाचा एक टन माल तीन हजार रुपये प्रति टन याप्रमाणे विकण्यात आला. 15 टनांचे 85 हजार तसेच उर्वरित एक टन मालाचे तीन हजार याप्रमाणे 88 हजार रुपयांचे उत्पन्न उसातील आंतरपिकाने त्यांना मिळवून दिले.
बियाण्यावरील एकरी 3500 रुपये, फवारणीवरील 3550 रुपये, पाच हजार रुपयांचे खत, तणनियंत्रणावरील एक हजार रुपये, टरबूज तोडणीसाठी मजुरी एक हजार रुपये याप्रमाणे 14 हजार 50 रुपयांचा खर्च आला. सुमारे 73 हजार 950 रुपयांचे एकरी निव्वळ उत्पन्न या पिकातून मिळाले.(१)
इनाडू या वेबसाईट वर एप्रिल ५, २०१६ ला आलेल्या लेखानुसार जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील नागद येथील विनोद परदेशी या शेतकऱ्याने मोसंबी पिकात टरबूजची आंतरपीक म्हणून लागवड करून पाच एकरात ५ लाखांचा निव्वळ नफा मिळवला.
--------------------
--------------------
टरबूज पिकाचे बियाणे घेण्यासाठी ४२ हजार रुपये तसेच रासायनिक खते, मायक्रो न्युट्रीनसाठी १० हजार रुपये असा एकूण ५२ हजार रुपये खर्च आला. त्यातून पहिल्या टप्प्यात परदेशी यांना ९० टन टरबूजचे उत्पन्न मिळाले, या टरबूजाला त्यांना प्रतिकिलोग्रॅम ८ ते ९ रुपये दर मिळाला. त्यामुळे ५ एकर क्षेत्रात त्यांना साडेसात लाखांचे उत्पन्न मिळाले. सगळा खर्च वजा करता त्यांना ५ लाख रुपये निव्वळ नफा मिळाला. टरबूज पिकाचा दुसऱ्या टप्प्याचा बहर अजून बाकी होता त्यातून त्यांना १७ टन टरबूजापासून एक ते सव्वालाख उत्पन्न अपेक्षित होते (२).
पूर्वेकडील देशात विशिष्ठ पद्धतीचा वापर करून टरबूजास चौकोनी आकार दिला जातो. मोठ्या स्टोअर मधून हा माल विक्री होतो. वैशिठ्य पूर्ण आकारामुळे ग्राहक या कडे आकर्षित होतो व या उत्पादनाची विक्री चढ्या भावात होऊ शकते (३). आपल्याकडे देखील आता असे मोठे मोठे स्टोअर सुरु झाले आहेत. थोड्या प्रमाणात प्रयोग करून आपण हव्या त्या आकारचे पण चांगल्या चवीचे टरबूज तयार केले तर नफा जास्त होईल हे सांगायलाच नको. तुमच्या शेतातून येणाऱ्या उत्पन्ना पैकी काही उत्पन्न या प्रकारच्ये घेतल्याने जोखीम कमी होऊन नफा वाढेल. खाली दिलेला व्हिडीओ नक्की बघा!
शेतानजीक रहदारीच्या रस्त्यावर विक्री करून नफा वाढवणे शक्य आहे. अनेक शेतकरी बांधव हा प्रयोग नियमित करतात. या ठिकाणी फळे थंड करून कापून विक्री केल्याने नफ्याचा टक्का वाढवला जावू शकतो. अश्या प्रकारे विक्री करायचा ठेका एखाद्या तरुणास दिला तरी चालण्यासारखे आहे! आपल्या शेतात एखाद्या दिवशी माल नसेल तर इतरांकडून खरेदी करून विक्री सुरु ठेवावी जेणे करून ग्राहक बांधले जातील व उत्तरोउत्तर विकास साधता येईल.उर्वरित माल व्यापाऱ्यास विकावा.
तुमच्या शेताच्या आसपास एखादे पर्यटनस्थळ असेल तर थोडा वेगळा प्रयोग करणे शक्य आहे. अश्या ठिकाणी मौक्याची जागा बघून एखादा गाळा बुक करावा. या गाळ्यातून आपण थंडगार टरबूज ज्यूस विक्री करू शकता. त्यात इतर फळांचे ज्यूस मिक्स करून मोकटेल बनवल्यास "भरगोस" नफा पक्का आहे.
तिथे विदेशी पर्यटक असतील तर त्यांना आपल्या शेतात फेरफटका मारायला न्यायचा मौका सोडू नका कारण "अतिथी देवो भव!".
मित्रहो, सकारात्मक विचार सरणीतून खूप काही शक्य आहे. तुम्हाला काही भन्नाट कल्पना सुचत असतील तर आम्हाला कळवा.आम्ही तुमच्या नावासकट प्रसारीत करू!
तंत्रज्ञान म्हणजे काय हे जाणून घेण्यसाठीइथे क्लिक करा. |
