पाटील बायोटेकच्या सोशल ग्रुपचे सदस्य होण्यासाठी इथे क्लिक करा!

भरगोस प्रमाणात नत्र, स्पूरद, पालाश, कॅलशियम, मॅग्नेशियम, गंधक खते देवूनही उत्पादनात घट का?

सूक्ष्म अन्नद्रव्ये फार कमी प्रमाणात पिकांना लागत असली तरी त्यांपैकी प्रत्येकाची पिकाच्या वाढीसाठी जरुरी असते. यांपैकी एखाद्या अन्नद्रव्याचे प्रमाण कमी झाले अगर वाढले तर त्याचा पिकाच्या वाढीवर वाईट परिणाम होऊन पिकाचे उत्पादन घटते. पूर्वी आपण शेतात दरवर्षी शेणखत, कंपोस्ट खत, हिरवळीचे खत, निरनिराळ्या पेंडी, बोनमील भरपूर वापरत होतो. या सेंद्रिय खतांत सूक्ष्म अन्नद्रव्ये असल्याने त्यांचा जमिनीस आपोआप पुरवठा होत असे.
-------------------------------
वीज गेल्यावर चार तास प्रकाशमान रहाणारा बल्ब
---------------------------------------

याशिवाय जमीन पड ठेवणे, पिकांची फेरपालट करणे यामुळेही जमिनीत असणाऱ्या सूक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाण पूर्वीच्या काळी कमी होत नसे. परंतु गेल्या २०-२५ वर्षात अधिक उत्पादन देणाऱ्या, संकरीत जातींच्या पिकांची लागवड करीत आहोत. तसेच पाणीपुरवठ्याची सोय वाढल्यामुळे एकाच शेतातून वर्षातून दोन-तीन पिके घेऊ लागलो. नत्र, स्पुरद व पालाशयुक्त रासायनीक खते देऊ लागलो. सेंद्रिय खते कमी वापरू लागलो. या सर्वांचा परिणाम म्हणजे आपल्या जमिनीतील सूक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाण कमी झाले. त्याचा पिकावर वाईट परिणाम दिसू लागला. भरगोस प्रमाणात नत्र, स्पूरद, पालाश, कॅलशियम, मॅग्नेशियम, गंधक खते देवूनही उत्पादन घटू लागले. सूक्ष्मअन्नद्रव्याची कमतरता असल्यास असे घडू शकते हे संशोधनातून सिद्ध झाले आहे.
हि बाब लक्षात घेवून पाटील बायोटेक ने “मायक्रोडील” हि उत्पादन शृंखला बाजारात आणली आहे. या शृंखलेत अनेक उत्पादने असून त्यांचा योग्य वेळी वापर केल्याने उत्पादनात वाढ होऊ शकते.
अनेकवेळेला पिकावरील चट्टे-पट्टे-डाग बघून आपल्याला वाटते कि पिकाला कोणता रोग झालेला आहे? बुरशी-जीवाणू-व्हायरस जन्य रोग असावा असा आपण कयास लावतो, प्रत्यक्षात मात्र त्या पिकास सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता झालेली असते. महागडी औषधी फवारण्या पेक्षा माय्क्रोडील आपली चांगली मदत करू शकते. 
मायक्रोडील ग्रेड १ (पावडर): ५ व १० किलो मध्ये उपलब्ध हे उत्पादन ५ सूक्ष्मअन्नद्रव्यांचे संतुलित मिश्रण आहे. मृदेची तयार करते वेळी एकरी १० किलो चा डोस सेंद्रिय किंवा इतर भरखतात मिसळून पसरवावा. भाजीपाला पिकासाठी वाफे बनवते वेळी प्रत्येक वाफ्यात १ ते २ मुठ मिश्रण टाकावे. याचा दर्जा उत्कृष्ट असून किंमत अतिशय वाजवी आहे. अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा. 

मायक्रोडील सुपर मिक्स १ किलोच्या पॅकिंग मध्ये उपलब्ध असून यात ६ सूक्ष्मअन्नद्रव्यांचे संतुलित मिश्रण आहे. लोह, झिंक, तांबे व मंगल हि चार सूक्ष्मअन्नद्रव्य चिलेटेड स्वरूपातील आहेत. पिकाच्या वाढीच्या काळात ०.५ ग्राम प्रती लिटर च्या दराने फवारणी करावी. सुरवातीच्या काळात बेसल डोस सोबत दिले नसेल तर हे उत्पादन ड्रीप मधून देखील सोडता येईल. अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा. 
मायक्रोडील झिंक १२: पाने कमी असणे व वाढ खुंटणे अशी लक्षणे दिसत असली तर १ ग्राम प्रती लिटर फवारणी करावी. अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा

मायक्रोडील लोह १२: वरच्या बाजूची पाने पिवळी पडणे, वाढ खुंटणे अशी लक्षणे दिसत असली तर १ ग्राम प्रती लिटर फवारणी करावी. अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा
मायक्रोडील बोरान २०: पाने गळणे, फळे तडकणे अशी लक्षणे दिसत असली तर १ ग्राम प्रती लिटर फवारणी करावी. अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा
या पैकी कोणते उत्पादन केव्हा व कसे वापरावे हा प्रश्न आपल्या मनात येत असेल तर उत्तर जाणून घेण्यासाठी  स्क्रीन वर "Message us" चे बटन आहे. त्यावर क्लिक करून आपले म्हणणे मांडा. २४ तासाच्या आत आम्ही आपल्याला प्रतिसाद देवू.


मायक्रोडील चे अनेक फायदे

१) पिकाच्या उत्पादनात वाढ
२) पाने पिवळी पडत नाही
३) धान्याच्या दाण्याचा दर्जा सुधारून त्यांच्या आकारात व वजनात वाढ होते
४) पोचे दाणे भरतात
५) फुलांची संख्या वाढते
६) फुले व फळे गळत नाही
७) पिकांची वाढ जोरात होते
८) पिकांवर रोग-किडींचा उपद्रव कमी होतो

आमची उत्पादने वापरून बघितल्यावरच आपली त्याच्या दर्जा व कार्यक्षमतेविषयी खात्री पटेल. आपण नमुन्यांदाखल खाली दिलेले उत्पादन ऑनलाईन खरेदी करू शकता. 

 

18 comments

 • Really very imp info sir please keep it on

  Sandip Kanawade
 • फणसाचे छोटे झाड आहेत तर त्याचे पान पिवळे होत आहेत तर त्यासाठी हे microdeal चालेल का?

  शरद लोंढे पाटील
 • Khup chaan

  Vikas Kamthe
 • Mast

  Pravin Patil
 • Produt is very good
  Sagar Vhanmame

Leave a comment

Name .
.
Message .

Please note, comments must be approved before they are published