Call 9923974222 for dealership.

तुम्हाला यशस्वी शेतकरी व्हायचे आहे का?

जेव्हा कोणी व्यक्ती इतर कुठलाही व्यवसाय किंवा नोकरी सोडून शेतकरी व्हायचे ठरवतो त्याचे आयुष्य पार बदलून जाते. शेतीउद्योग करणे हा एक धाडसी निर्णय आहे. शेतकऱ्याचे आयुष्य चित्तवेधक, धाडसी व खळबळीचे असते. एकीकडे नवनिर्मितीचा ध्यास, अनुभव व दुसरी कडे धोका पत्करायची तयारी व कधी न संपणारी अनिश्चितता.

एखादे शेत कसायचे म्हणजे तुम्हाला रात्रीचा दिवस करावा लागणार, बदलत्या परिस्थितीचा विचार करून सतत तपशीलवार नियोजन आखत रहावे लागणार. 

अशी कठोर मेहनत करण्यासाठी तुम्हाला सतत स्वयंप्रेरित रहावे लागेल, ध्येयवेडे व्हावे लागेल. अनेक लोकांना हि संकल्पना मान्य होणार नाही, ते म्हणतील कि प्रत्येक उद्योगात अशा प्ररीस्थितीला सामोरे जावेच लागते, त्यापेक्षा उत्तम नियोजन व भरीव गुंतवणूक जास्त महत्वाची आहे. फक्त उत्तम नियोजन व भरीव गुंतवणुकीच्या भरवशावर गेलात तर तुम्ही शेतकरी व्हाल पण यशस्वी नाही. 

स्वयंप्रेरणा म्हणजे काय? अंतर्बाह्य असा स्त्रोत जो प्रत्येक परिस्थितीत तुमच्या इच्छा व उर्जा जागृत ठेवून तुमच्या ध्येयाशी तुम्हाला बांधून ठेविल. लक्ष्य गाठण्यासाठी तुमच्या भूमिकेला, कामाला व विषयाला अनुसरून तुम्हाला सातत्याने बळ देयील तीच खरी स्वयंप्रेरणा!. स्वयंप्रेरणा म्हणजे एखादे कार्य तडीस नेण्याची आर्त इच्छा. जे काही घडते ते स्वयंप्रेरणेनेच. जेव्हा तुम्हाला सकाळी  कामाच्या इच्छेने  जाग यईल, तुम्ही दिवसभर न-थकता कामात व्यग्र रहाल व आपले सर्व कौशल्य पणाला लावाल - तेव्हा तुमच्यात जी संचारलेली असते तिलाच स्वयंप्रेरणा म्हणतात. शेतीचे काम हाती घेतल्यावर पहिले काही महिने अतिशय महत्वाचे असतात. तुमची स्वयंप्रेरणेची पातळीच तुमच्या कृषीउद्योजकतेचे भवितव्य ठरवीत असते.

प्रत्येक प्रेरणेच्या मुळाशी आवड दडलेली असते, तिला तुम्ही नाद किवा छंद देखील म्हणू शकता. जर प्रेरणा म्हणजे तुमच्या गाडीचे इंजिन असेल तर आवड हे इंधन असते. प्रेरणेव्यतिरिक्त इतर हि घटक आहेत ज्याचा फायदा होतो - जसे प्रोत्साहन (आर्थिक लाभाच्या स्वरुपात). जर आपण अनुभव घेतला तर लक्षात येईल कि स्वयंप्रेरणेतून झालेले काम व आर्थिक लाभाच्या इच्छेने केलेले काम याच्या दर्जात खूप फरक असतो. शेतातल्या कामात स्वयंप्रेरणा नसली तर दर्जा दुय्यमच असतो.   

आवडीचा दुसरा अर्थ समर्पण असाही होतो. अनेक शेतकऱ्यांच्या अपयशात "समर्पणाचा अभाव" स्पष्ट दिसून येतो. छोट्या-मोठ्या अपयशानंतर ते आपल्या कामावरचा विश्वास गमावतात व हतबल होऊन प्रयत्न सोडून देतात. असे शेतकरी फक्त शेतकरीच रहातात, यशस्वी शेतकरी होऊ शकत नाहीत. जर तुम्ही स्वयंप्रेरित असाल व आपल्या कामावर प्रेम करत असाल तरच तुमच्या कामाचे चोख व्यवस्थापन होऊन कालांतराने विकास साधता येईल. 

म्हणूनच हे लक्षात ठेवा जर तुम्हाला यशस्वी शेतकरी व्हायचे असेल तर खात्री करा कि तुमचे प्रेरणा रुपी इंजिन सतत व जास्त काळ चालण्यासाठी "आवड" या इंधनाचा तुमच्या जवळ अतिरिक्त साठा आहे व नफा-तोट्याचा विचार न करता, समर्पणाच्या खडकाळ रत्यावर तुम्ही आनंदात गाडी हाकाल. तरच तुमचे ध्येय गाठणे तुम्हाला सोपे जाईल.

हा लेख आपणास कसा वाटला? कॉमेंट करायला विसरू नका. 

जर आपण आमच्या सोशल ग्रुप ला जॉईन झाले नसाल तर इथे क्लिक करून जॉईन करू शकता.

60 comments

 • नव्या पिढीत शेती विषयी माहीती मिळते.

  Pandurang B.Magdum
 • Very good

  Sudesh Khutate
 • लेख सुंदर वाटला

  विष्णुपंत भुतेकर
 • प्रेरणा मिळाली

  सुनील
 • Awesome blowg

  Nitin Khedkar

Leave a comment

Name and Mobile number .
.
Message with Address, District & Pincode .

Please note, comments must be approved before they are published