green gram

उन्हाळी मुग व्यवस्थापन

हे पिक कुणी निवडावे?

green gram for summer

जर पाणी उपलब्ध असेल तर कमी कालावधी (६०-६५ दिवस) चे पिक म्हणुन मुगाची निवड करू शकता. जर पाणी जास्त असेल व खर्चाची क्षमता असेल तर भुईमुग/ तीळ/सोयबीन ही पिके घेवु शकता. या लेखात मुगाची माहीती घेवु. या पिकाने मृदेचा कस वाढतो त्यामुळे येत्या खरिपाच्या दृष्टीकोनातून हे पूरक पिक आहे.

निवडक जाती:

  • एस आठ, वैभव, PKV ग्रीन गोल्ड, २००३-२

लागवडी चे अंतर:

  • ३० सेमी X १० सेमी, एकरी ५ किलो बियाणे लागेल

लागवडीची वेळ:

  • १५ फेबुवारी ते १५ मार्च, २० अंशाच्या वर तापमान हवे.


बिज प्रकिया:

  • प्रती किलो बियाण्यास इमिडाक्लोप्रीड ४८ टक्के एफ एस किंवा थायमेथोक्झाम ३०टक्के एफ एस ५ मिली सोबत थायफेनॉट मिथाईल 70 टक्के डब्ल्यु पी ३ ग्राम व ह्युमोल जेली २५ ग्राम या दराने चोळावे

तण नियंत्रण:

  • पेरणीनंतर २०-२५ दिवसांनी इमाजीथायपर १० टक्के एस एल २५० मिली प्रती एकर वापरावे किंवा फुल लागणी पूर्वी कोळपणी करावी.

एकरी बेसल डोस

  • २०-२०-०-१३ किंवा २४-२४-००-८ ५० किलो सोबत रीलीजर ३ किलो, मायक्रोडील ग्रेड १ ५ किलो, ह्युमॉल जी १० किलो.

कीड नियंत्रण व वाढ व्यवस्थापन:

उन्हाळी पिकात किडींची संख्या कमी असते. तरी मुगात खालील किडी येवू शकतातbiopesticide

जमीनीतील किडी: हुमणी, उधळी, करवर्म
रसशोषक किडी: काळा मावा, फुलकीड, तुडतुडा, पांढरी माशी
पाने व शेंगा खाणाऱ्या अळ्या: केसाळ अळी, शेंगा पोखरणारी अळी, तंबाखु अळी.
रोग: दह्या किंवा पावडरी मिल्डयु

पहिली फवारणी:

पेरणी नंतर २०-२५ दिवसात. फुले लागण्या पूर्वी, १५ लिटर च्या पंपाचा डोस

  • १९-१९-१९ ७५-१०० ग्राम + इमिडाक्लोप्रीड १७.८% एस एल.  (माव्याचे अस्तित्व जाणवल्यास)

दूसरी फवारणी:

फुले दिसु लागली की, १५ लिटर च्या पंपाचा डोस

  • १२-६१-०० १०० ग्राम+ पोकलँड १० मिली (किडींचे अस्तित्व दिसल्यास)+ क्लीनर डी -३० मिली (पानावर पांढरी बुरशी दिसल्यास)

तिसरी फवारणी:

शेंगा भरतांना १५ लिटर च्या पंपाचा डोस

  • ००-००-२३ १०० ग्राम+ मायक्रोडील बोरान-२०, २० ग्राम + पोकलँड २० मिली (किडींचे अस्तित्व दिसल्यास)+ क्लीनर डी -३० मिली (पानावर पांढरी बुरशी दिसल्यास)
treat boran deficiency

अपेक्षित उत्पादन:

एकरी ४००-४५० किलो.

एक महत्वाची नोट

उन्हाळ्यात काही कारणाने अचानक पाणी संपले तर मुगाचे संपूर्ण पिक गाडून टाका. हे उत्तम हिरवळीचे पिक आहे. पुढील खरीप पिकाला याचा फायदा होईलच.

 

या माहिती संदर्भात आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण श्री. अमोल पाटील यांना व्हाटसअप वर प्रश्न विचारू शकता. त्याकरिता स्कीन वर दिसणाऱ्या बटनावर क्लिक करावे.
Back to blog