मल्चफिल्मची निवड व फायदा

मल्चफिल्मची निवड व फायदा

बदलत्या युगातील शेतकरी नव-नवीन पद्धती वापरून अनेक पारंपारिक समस्या मोडीत काढतो. वाढणारे तण, पाण्याची कमतरता, महागडी मजुरी, सूर्याच्या प्रखरतेने होणारे नुकसान, सुतकृमींचा वाढता त्रास अशा अनेक समस्यांवर कमीअधिक प्रमाणात फायदेशीर ठरणारा आच्छादनाचा उपाय कधी काळी शेतकरी मित्रांनीच शोधून काढला. या पद्धतीत कालाअनुरूप सुधारणा होत जावून आज प्लास्टिकच्या आच्छादनाचा वापर व्यापारी व किरकोळ स्वरुपात देखील होतो. 
आच्छादनामुळे समस्या निवारणासोबतच काही फायदे देखील होतात जसे. 
 1. मृदेची धूप रोखली जाते
 2. खताचा निचरा होत नाही
 3. विषाणूजन्य रोगाचे वाहक असणाऱ्या किडींचे नियंत्रण होते. 
 4. पिकाच्या उत्पादकतेत 25 टक्‍क्‍यांपर्यंत वाढ होते. 
 5. शेतमालाच्या गुणवत्तेत वाढ होते. 
 6. बीज उगवण क्षमतेत वाढ होते. 

मल्चफिल्मची निवड 

मल्चचा रंग, आकार व जाडी यानुसार प्रकार आहेत व पिकाच्या गरजेनुसार मल्च ची निवड करायची असते.

 • विविध रंगी मल्च चे जे उपायोग सांगिलते जातात त्या नुसार होणारे फायदे प्रत्यक्षात होतीलच असे नाही. तंत्रशुद्ध  प्रयोगात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे निरीक्षण मिळाले त्यामुळे स्थायी अनुमान निघालेले नाही
 • पिकाच्या गरजे नुसार ९० ते १२० से. मी चा पन्हा उपलब्ध असतो.
 • भुइमुगात ७  मायक्रोन जाडीचा पेपर वापरायचा असतो.
 • एका वर्षाच्या आत निघणाऱ्या पिकासाठी २० ते २५ मायक्रोन,
 • मध्यम काळाच्या पिकासाठी ४० ते ५० मायक्रोन व
 • बहुवार्षिक पिकासाठी ५० ते १०० मायक्रोन जाडीचा पेपर वापरावा
 • ३० मायक्रोन व त्यावरील जाडीच्या मल्चिंग पेपर मधून आरपार काहीही दिसायला नको. 
 • किती क्षेत्र आच्छादन करावे हे ठरवण्यासाठी खालील तक्ता बघावा
 पिकाचा प्रकार आच्छादन क्षेत्र
जमिनीवरील वेल  २० ते २५ टक्के
सुरवातीची फळ बाग  ४० ते ५० टक्के
फळ बाग व काकडी वर्गीय ४० ते ६० टक्के
भाजीपाला, पपई, अननस ७० ते ८०. टक्के
जमीन तापवण्यासाठी १०० टक्के

 

मल्चिंग पेपर चे गणित (आकडे ढोबळ मानाने दिलेले आहेत)

 जाडी

(मायक्रोन मध्ये)

 जाडी

(गेज मध्ये)

 जाडी

(एम एम मध्ये)

एका किलोत झाकले जाणारे क्षेत्र वर्ग मीटर मध्ये एक वर्ग मीटर चे वजन ग्राम मध्ये
२८ ०.००७ १४४ ६.९
२० ८० ०.०२ ५४ १८.४
२५ १०० ०.०२५ ४२ २३
४० १६०

०.०४

२६ ३८
५० २०० ०.०५ २१ ४६
१०० ४०० ०.१ ११ ९३

 

 मल्चिंग चा सर्व साधारण खर्च

 • भाजी वर्गीय पिकासाठी ८० टक्के क्षेत्र झाकल्यास प्रत्येक वर्ग मीटर साठी अंदाजे २ रु
 • वनराईत ४० टक्के क्षेत्र झाकल्यास अंदाजे  प्रत्येक वर्ग मीटर साठी अंदाजे १.४० रु

   मल्चिंग चा सर्व साधारण फायदा

  कृषीविद्यापीठांच्या अभ्यासाच्या आधारा नुसार मिरची, आलू, कोबी, टमाटे, ढोबळी मिरची, भेंडी व वांग्यात २५ मायक्रोनची मल्चिंग वापरली असता सर्वसाधारण पणे ३० ते ६० टक्के उत्पादन वाढ दिसून आली. पेरू-डाळिंब या बागेत १०० मायक्रोन चा पेपर वापरल्यावर साधारण पणे २५ ते ४० टक्के उत्पादन वाढ मिळाली. भूईमुगात ७  मायक्रोन चा पेपर वापरल्यास ६० ते ७० टक्के इतकी घवघवीत वाढीची नोंद आहे तर उसात ५० मायक्रोन चा पेपर वापरल्यावर ५० ते ५५ टक्के उत्पादन वाढले.

  शेतकरी मित्रांनी मल्चिंग वापरते वेळी हा अभ्यास निक्षून करावा. जर पुढल्या वर्षी वापर करावा कि नाही हे ठरवण्यासाठी प्रयोग क्षेत्रात किंवा पिका खालील क्षेत्रात काही प्रमाणात वापर करून इतर क्षेत्राशी तुलना करावी. 

   

  जाडी (मायक्रोन) रुंदी (मीटर) रंग  लांबी (मीटर) किंमत पर मीटर लिंक
  २५ १.२ काळा-चंदेरी १७५ ३५.०० खरेदी करा
  २५ १.२ काळा -चंदेरी २५ ४९९ २०.०० खरेदी करा
  २५ १.२ काळा-चंदेरी १०० १०३० १०.३० खरेदी करा
  २५ १.२ काळा-चंदेरी २५०  ३०९९ १२.४० खरेदी करा 
  २५ १.२ काळा-चंदेरी ४०० ४७९९ १२.०० खरेदी करा
  ३० १.२ काळा-चंदेरी १०० ११४२   ११.४२ खरेदी करा
  ३० १.२ काळा-चंदेरी ४०० ६४२५ १६.००. खरेदी करा
  १०० १.२ काळा-चंदेरी १०० ४६९९ ४६.९९ खरेदी करा
  १०० १.२ काळा-चंदेरी ४०० १८६४९

  ४६.६२

  खरेदी करा

   

  किमती कोणत्याही क्षणी बदलू शकता, लिंक वर क्लिक करून सध्याची किंमत कळेल व खरेदी करता येईल. 

  आपल्या मनात काही शंका असल्यास प्रतिक्रियेत लिहा किंवा खाली दिलेल्या फोन नंबर वर संपर्क साधा.

  वाचकाने विचारलेला प्रश्न

  स्वप्नील बनसोड, औरंगाबाद

  मी ह्या वर्षी कापूस पिकास मल्चफिल्म वापरण्याचा विचार करत होतो, तर मला सांगा कापूस पिकास मल्चिंग फिल्म वापरू शकतो का? आणि जर वापरू शकतो तर किती प्रमाणात फायदा होईल? आणि एकरी किती फिल्म लागेल?

  उत्तर: 

  कपाशी बियाणे उत्पादक अशा फिल्म चा वापर करतात पण कापूस उत्पादकास याचा खर्च परवडेल असे वाटत नाही. २५-३० मायक्रोन च्या जाडीचे मल्च वापरल्याने फायदा होतो. वाढ वेगाने होते, रससोशक किडीचा त्रास कमी होतो. मुद्दा फक्त खर्चाचा आहे. तुम्ही छोटेखानी प्रयोग करून पाहू शकता. मल्चिंग फिल्म ची निवड, उपयोग व खर्चाचा अंदाज लावण्यासाठी आमचा लेख वाचा. लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा. 

  किशोर चोथे: सर उसामध्ये मल्चिंग पेपर चा वापर कसा करावा, कृपाया मार्गदर्शन करावे.  

  उत्तर:

  उसात पाचटाचे आच्छादन करण्याचे प्रचलन आहे. काही प्रयोगात हिवाळी लागवडीत  पारदर्शक प्लास्टिक मल्चिंग चा उपयोग करण्यात आला होता, त्यानुसार वाढीव अंकुरण मिळाले व उत्पन्नात देखील वाढ झाली. आपल्या क्षेत्रातील तज्ञांच्या मार्गदर्शनानुसार हा प्रयोग करून पाहायला हरकत नाही.

  सखाराम गटणे: कांद्यात मल्चिंग वापरले जावू शकते का? 

  उत्तर: 

  मला सोशल मिडीयावर काही फोटो सापडले. त्यावरून असे दिसते कि काही शेतकरी बांधवांनी असा प्रयोग केलेला दिसतोय. 

  २५-३० मायक्रोन जाडीचे, चंदेरी  मल्च वापरल्याने फायदा होतो. वाढ वेगाने होते, रससोशक किडीचा, बुरशीजन्य रोगांचा, सुतकृमींचा त्रास कमी होतो. मुद्दा फक्त खर्चाचा आहे. तुम्ही छोटेखानी प्रयोग करून पाहू शकता. मल्चिंग फिल्म ची निवड, उपयोग व खर्चाचा अंदाज लावण्यासाठी आमचा लेख वाचा. लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा. 

   

  चौधरी कल्पेश: मल्चिंग पेपर दोन रंगाचा असल्यास समजा काळा आणि चंदेरी तर कुठला रंग वर वापरावा कुठला खाली आणि का ?

  उत्तर: 

  चंदेरी रंग वर ठेवावा कारण त्यावरून प्रकाश परावर्तीत होईल. प्रकाश खालच्या बाजूला जावू शकणार नाही त्यामुळे खालून वाढायचा प्रयत्न करणाऱ्या तणाला सूर्यप्रकाश मिळणार नाही, तणाची वाढ खुंटेल शिवाय प्रवर्तित प्रकाश पिकावर पडून पिकास त्याचा लाभ होईल. 

  आमच्या सोशल ग्रुपला जॉईन केल्याने आमचे नवीनलेख आपल्याला लगेच वाचायला मिळतील

  ---------------------

  Back to blog