सुतकृमींचे नियंत्रण करण्यापेक्षा प्रतिबंध करणे अधिक फायदेशीर

सुतकृमींचे नियंत्रण करण्यापेक्षा प्रतिबंध करणे अधिक फायदेशीर

सुतकृमींना (निमॅटोड) नेहमिच्या जीवनात जंतु असे संबोधले जाते. परपोशी असल्याने, ते सडणाऱ्या पदार्थात जगतात अथवा जीवंत प्राणी-वनस्पतीचे शोषण करतात. ते सूक्ष्म आणि धाग्यासारखे लांबट असतात व सरासरी लांबी ०.२ ते ०.५ मि.मी. इतकी असते. सुतकृमी उघड्या डोळ्यांनी सहज दिसत नाहीत, त्यांच्या निरीक्षणासाठी कमी क्षमतेच्या सूक्ष्मदर्शिकेचा वापर केला जातो.

या जंतूंमुळे पिक निस्तेज होते, पानांचा आकार लहान होतो, पाने पिवळी पडून वाळतात व पिकाची वाढ खुंटते, तसेच फुले येण्याचा कालावधी लांबतो, प्रादुर्भाव जास्त असेल तर बरेचदा पिक वाळून जाते. ही सर्व लक्षणे अनेक परिस्थितीत (अन्नद्रव्य व पाण्याची कमतरता, मृदेतील दोष जसे क्षारांचे प्रमाण)दिसून येत असल्याने अनेक वेळ निदान चुकीचे होते व आग रामेश्वरी व बंब सोमेश्वरी अशी अवस्था होते. नुकसान होते. सुतकृमींचा संसर्ग लक्ष न दिल्यास पसरतो व दुरगामी नुकसान करतो. प्रदुर्भावग्रस्त पीक इतर रोगांना लवकर बळी पडते.

सुतकृमी प्रथम विकर स्त्रवतात. हे विकरं पेशींचे विघटन करतात. सुतकृमी या विघटीत पदार्थांचे आपल्या सुईसारख्या तीक्ष्ण अवयवांद्वारे रस शोषण करतात. प्रादुर्भाव जास्त झाल्यास झाडांची वाढ खुंटते व ते सुकते. सुतकृमींनी इजा केल्यामुळे बुरशी व जीवाणु जन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्यास मदत होते.

सुतकृमीची मादी सरासरी ९० ते १०० अंडी पुंजक्यानने घालतात. यांच्यामध्ये नर आणि मादी असे दोन प्रकार आढळतात. अंड्यातून बाहेर पडलेल्या आखूड, जाड अवस्था नर बनतात; तर लांबट, पातळ अवस्था माद्या बनतात. नर आणि मादी पिल्लाची वाढ चार अवस्थांमध्ये पूर्ण होते.

सुतकृमी नाशके:


सुतकृमी नाशकात मिथाइल ब्रोमाइड, १-३ डायक्लोरोप्रोपेन अशा धुरडण्या, तसेच, थायनोझीन, इथोप्रोफॉस अशा आरगॅनोफाँसफेटस् व अल्डिकार्ब, ओक्सामिल अशा कार्बामटेस् चा अंतर्भाव होतो. ही रासायाने महागडी, पर्यावरणाला घातक तर आहेतच पण तितकिशी प्रभावी देखील नाही.


सुतकृमी नाशकांचा वापर करणे खर्चाचे व अवघड असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना फायद्याची ठरते. अश्या सर्व योजनांचा उद्देश कृमिंचा संपूर्ण नाश करण्यापेक्षा त्यांची संख्या घातक पातळीच्या आत येईल व वाढणार नाही व पुन्हा घातक पातळीच्या वर जाणार नाही असा असावा. जैविक, भौतीक व रासायनिक व्यवस्थापनातील विवीध पद्धतींचा एकात्मिक वापराने हे सहज शक्य आहे.

  • उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरट कारावी
  • उन्हाळ्यात प्लँस्टिकच्या आच्छादनाने तापमानात चांगली वाढ होउन इतर बुराशिजान्य व जीवणुजन्य रोगांसोबत जंतुंचेपण नियंत्रण होते. तण ही कमी होते.
  • पिकांची फेरपालट करावी.
  • फेरपालट करताना द्विदल पिकानंतर एकदल पिके घेणे फायद्याचे ठरते.
  • निवडलेले, रोगरहीत, प्रतीकारक्षम बियाणे वापरावे.
  • झेंडू पिकाची मुळे सुतकृमीनाशक सोडतात. त्यामुळे पिकांमध्ये झेंडूचे आंतरपीक म्हणून लागवड करावी.
  • निंबोली, एरंडी किंवा करंज पेंड १५०० ते २००० किलो प्रती हेक्टहरी न चुकता वापरावी
  • कंपोस्ट चा वापर करताना ते संपूर्ण कुजलेले असून प्रक्रियेत त्यातील घातक जीवांचा नाश झालेला आहे याची खात्री करावी.
  • कंपोष्ट पसरवण्यापूर्वी त्यात एकरी ३ किलो हुमणासुर मिसळून द्यावे
  • रोपवाटिकेत, वाफ्यात तीन टक्के कार्बोफ्युरान किंवा 10 टक्के फोरेट दाणेदार औषध हेक्टरी अनुक्रमे 66 किलो किंवा 20 किलो या प्रमाणात मिसळावे.

हुमणासुर हे उत्पादन हुमणीच्या नियंत्रणासाठी वापरले जाते. उस उत्पादन घेणाऱ्या अनेक शेतकरी बांधवानी हुमणासुर वापरून हुमणीवर जबरा नियंत्रण मिळवले. आमच्या अभ्यासावरून हे स्पष्ट आहे कि मातीती वाढणारे जीव जसे हुमणी, निमाटोड, वाळवी या सर्वांवर हुमणासुर अतिशय प्रभावी आहे. 

हुमणासुर महाराष्ट्रातील सर्व नामांकित कृषीकेंद्रात उपलब्ध आहे, ऑनलाईन खरेदी केली जावू शकते. खाली एक ऑफर देत आहोत तिचा लाभ घ्यावा.

Back to blog