वांग्यात हि चूक करू शकते मोठे नुकसान!

वांग्यात हि चूक करू शकते मोठे नुकसान!

फळ आणि शेंडा पोखरणारी कीड वांगे उत्पादक शेतकरी बांधवासाठी मोठी डोकेदुखी ठरते. काही करून या किडीचे नियंत्रण झालेच पाहिजे या विचाराने तो भारंभार कीटकनाशक फवारणी करतो. काही शेतकरी बांधव वांग्यात मक्षिकारी सापळेहि लावतात! एव्हडे सारे करून कीड नियंत्रणात येत नाही. एकीकडे उत्पादन खर्च खूप मोठा होऊन बसतो व दुसरीकडे काढणी केलेल्या मालाचा दर्जा दुय्यम असतो. असा माल विक्रीदेखील होत नाही. एव्हढे मोठे नुकसान कोणत्या चुकी मुळे होते?

या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यापूर्वी आपण वांग्यावर दोन लेख प्रसिद्ध केले आहेत, ते आपण वाचले आहेत का? नसतील तर या लेखाच्या खाली तुम्हाला या दोघी लेखाच्या लिंक मिळतील. ते लेख वाचायला विसरू नका. 

१. वांग्यातील फळ व शेंडे पोखरणारया अळीचे कसे करणार नियंत्रण?

२. वांग्याचे कीडनियंत्रण करा स्वस्तात

आता मूळ मुद्याकडे वळू...

बेतहाशा कीटकनाशक फवारणी केल्याने खूप फायद्याची अपेक्षा करणे चुकीचे आहे. सर्वप्रथम किडीचे सर्वेक्षण करून आर्थिक नुकसान करण्याची पातळी किडीने गाठली आहे का? हे पाहावे. त्यासाठी कामगंध सापळे लावावेत व एका दिवसात ५ किंवा त्यापेक्षा जास्त कीटक त्यात अडकले तरच फवारणीचा निर्णय घ्यावा. एकाच कीटकनाशकाची फवारणी पुन्हा पुन्हा केल्याने किडीतील प्रतिकार क्षम प्रजात वाढीस लागू शकते म्हणून सर्वप्रथम खाली दिलेल्या चार कोम्बो कीटकनाशका पैकी एकाची फवारणी करावी. पुढील दोन-तीन दिवस पुन्हा एकदा कामगंध सापळ्यात अडकलेल्या किडीची संख्या रोज मोजावी. हि संख्या रोज कमी झाली तर ठीक नाहीतर पाच दिवसात पुन्हा दुसऱ्या कोम्बो कीटकनाशकाची फवारणी घ्यावी. परिणाम मिळत नसेल तर तुम्ही नकली कीटकनाशक तर नाही वापरत? याची पडताळणी करावी. 

 • बीटा सायफ्लूथ्रीन ८.४९ + इमीडाक्लोप्रीड १९.८१ ओडी (सोलोमोन) ५-६ मिली प्रती पंप, तोडणी सूर व्हायच्या ७ दिवस अगोदर वापरू नये
 • सायपरमेथ्रीन३% + क़्विनोलफोस २०% इसी (रिले १०१, विराट) ५-८ मिली पर पंप, तोडणी सूर व्हायच्या ७ दिवस अगोदर वापरू नये
 • डेल्टामेथ्रीन १% + ट्रायझोफोस ३५ % इसी (टायगर, डेलफोस, अशोका) २-२.५ मिली प्रती लिटर, तोडणी सूर व्हायच्या ३ दिवस अगोदर वापरू नये
 • पायरीप्रोकझीफेन ५% इसी + फेनप्रोपाथ्रीन १५ % इसी १ ते १.२५ मिली पर लिटर, तोडणी सूर व्हायच्या ७ दिवस अगोदर वापरू 

जर वर दिलेली कोम्बो कीटकनाशके उपलब्धच होत नसतीलतर खालील पैकी कीटकनाशक निवडावे. 

 • क्लोरानट्रानिप्लोर १८.५ टक्के (ड्यूपांटचे कोराजेन) ५-६ मिली प्रती १५ लिटर, तोडणी सूर व्हायच्या २२ दिवस अगोदर वापरू नये
 • इमामेक्टीन बेन्झोएट ५ एसजी  (प्रोक्लेम, डेरिम, ओेलेक्स, हिलक्लेम, तत्काळ, सफारी) ६ ग्राम प्रती पंप, तोडणी सूर व्हायच्या ३ दिवस अगोदर वापरू नये

 • क्लोरपायरीफॉस २० ईसी  (डर्सबान, त्रिशुल, रडार, क्लोरगार्ड, क्लोरवीप, फोर्स, ट्रायसेल, क्लोरोसन, क्लासिक, लिथल, क्लोरोसील) १- २ मिली प्रती लिटर
 • सायपरमेथ्रीन १० टक्के प्रवाही (सापरमार, स्टार सायप्रीन, रीपकॉर्ड, अंकुश, फेनसान, सायपरमील, उस्ताद) १ ते ४ मिली/लिटर, तोडणी सूर व्हायच्या ३ दिवस अगोदर वापरू नये
 • सायपरमेथ्रीन २५ टक्के प्रवाही (बासाथ्रिन, सिबील, रुद्र, सायपरसान, सिंबुश, सापरगार्ड, सूपर फाईटर, कोब्रा, सायरस) ५ ते ६ मिली/लिटर, तोडणी सूर व्हायच्या ३ दिवस अगोदर वापरू नये 
 • डेल्टामेथ्रीन २.८ टक्के प्रवाही (डेसिस, डिकामेथ्रीन, डेकागार्ड) १ मिली/लिटर, तोडणी सूर व्हायच्या ३ दिवस अगोदर वापरू नये
 • फेनव्हलरेट २० टक्के प्रवाही (बीलफेन, सुमिसीडीन, लुफेन, फेनकिल) १० मिली प्रती पंप, तोडणी सूर व्हायच्या ५ दिवस अगोदर वापरू नये
 • फेनप्रोपाथ्रिन ३० टक्के प्रवाही  (मिथोथीन) ५ ते ७ मिली प्रती लिटर, तोडणी सूर व्हायच्या १० दिवस अगोदर वापरू नये
 • लॅमडा- सीहॅलोथ्रीन ४.९ सीएस-(मिट्रो) ०.५ ते १ मिली प्रती लिटर, तोडणी सूर व्हायच्या ५ दिवस अगोदर वापरू नये
 • फोसॅलॉन ३५ टक्के प्रवाही -(झोलोन, होल्टोन) ३ मिली प्रती लिटर
 • थायक्लोप्रीड २१.७ % एस सी (अलर्ट, अलंटो) १.५ मिली/लिटर, तोडणी सूर व्हायच्या ५ दिवस अगोदर वापरू नये
 • थायोडिकार्ब ७५ टक्के पा.वि.भु.(लार्वीन, सर्वीन) १.२ तो २.० ग्राम प्रती लिटर, तोडणी सूर व्हायच्या ६ दिवस अगोदर वापरू नये.

 

 
मित्रहो कीड नियंत्रणासाठी योग्य पर्याय निवडल्याने तुमचा खर्च नियंत्रणात राहील. निव्वळ रसायनिक फवारणी करणे हा कीडनियंत्रणाचा मार्ग नाही त्यासाठी आपण खतांचे नियोजन चांगले करू शकता.
आपल्याला कोणत्या पिकाचे व्यवस्थापन शेड्यूल हवे आहे का? शेड्यूल मिळवा स्क्रीन वर दिसणाऱ्या बटणावर क्लिक करा.
Back to blog