ऑफर्स वर ऑफर

३००० रु च्या पुढील सर्व खरेदीवर १० टक्के सूट.

3000 ऐवजी भरा फक्त २७०० रु '

४००० ऐवजी भरा फक्त ३६०० रु

मला डीलरशिप मिळाली नाही. आता काय करू?

मला डीलरशिप मिळाली नाही. आता काय करू?

दौऱ्याची तयारी सूरु होती. १५-२० दिवसाचा दौरा असल्याने तयारी मोठी असते. एकीकडे आपला प्रवास, व्यावसायिक उद्दिष्ट लक्षात ठेवायचे असतात तर दुसरीकडे या दरम्यान कुटुंबाची महत्वाची कामे अडणार नाही, त्यांची काही गैरसोय होणार नाही याकडेहि लक्ष द्यायचे असते. माझी लगबग सुरु होती आणि फोन खणखणला. मोबाईल मुळे स्थळ-काळ-परिस्थिती पलीकडे जावून व्यावसायिक कामे सुरूच रहातात. हा फोन परिचयातील नसल्याने मोबाईल वर “unknown” असे झळकत होते, तरी मी फोन उचलला....


“डीलरशिप पाहिजे होती, आपला ऑनलाईनचा फॉर्म भरला, आपल्या प्रतिनिधीचा एकदा फोन आला, डीलरशिप देत नाही म्हटला.” पलीकडून विषय सरळ व सोप्या पद्धतीने मांडण्यात आला.

“माझ्या कडून काय अपेक्षा आहे आपली?” मी विचारले.

“मला नाही ऐकायची सवय नाही!” समोरची व्यक्ती ठाम पणे म्हणाली.

हे ऐकून मला आश्चर्य वाटले! पाटील बायोटेकची उत्पादने दर्जेदार असतात, फिल्डवर्क उत्तम असते त्यामुळे डीलरशिपसाठी धडपडणारे खूप व्यक्ती मी बघितले आहेत. पण हा असा प्रसंग नवीनच होता. “मला नाही ऐकायची सवय नाही!” या वाक्यात समोरच्याची दादागिरी दिसत होती तशी त्याची दुर्दम्य इच्छाशक्ती देखील! 

समोरच्या व्यक्तीची इच्छाशक्ती पाहून मी भारावून गेलो.बाजारात खंडीभर उत्तम दर्जाच्या कंपन्या असतांना आपल्या कंपनीसाठी हट्ट धरणारा डीलर प्रत्येकाला मिळत नाही. हातचे काम बाजूला ठेवून मी या व्यक्तीशी तब्बल अर्धातास बोललो. ज्या ठिकाणासाठी त्यांनी प्रस्ताव दिला होता त्या ठिकाणी एक चांगला डीलर अगोदरच कार्यरत असल्याने हा नवीन प्रस्ताव नाकारण्यात आला होता. पण या व्यक्तीची इच्छाशक्ती चांगली होती. असा डीलर सोडणे अशक्य आहे.  त्यामुळे सुरवातीला सब-डीलरशिप देवून मग काही काळात जवळच्या दुसऱ्या पिनकोड वर डीलरशिप देण्याचे मी मान्य केले. त्यासाठी या व्यक्तीने दुसऱ्या पत्त्यावर (२५ किमी दूर) नवीन कृषीकेंद्र टाकायची तयारी दाखविली हे विशेष! 


मित्रहो, पाटील बायोटेक प्रा. ली. चा नवीन डीलर नोंदणी कार्यक्रम वर्षभर सरू असतो पण मे-जून मध्ये विशेष मोहीम हाती घेण्यात येते. मोहिमेत शेकडोच्या संख्येने नवीन प्रस्ताव येतात. या प्रस्तावांवर निकष लावून, यातील ४५-५५ टक्के प्रस्ताव सरसकट बाद करण्यात येतात. उर्वरित प्रस्तावाबाबत रीतसर चर्चा करण्यात येते. या चर्चेतून निवडक प्रस्ताव पूर्णत्वास जातात. साधारणपणे १०० सुरवातीच्या प्रस्तावातील ७-८ प्रस्ताव पूर्णत्वास जातात. कोणते निकष लावले जातात हा प्रश्न आपल्या मनात येणे साहजिक आहे.

काही निकषांची चर्चा इथे करत आहे

प्रस्ताव का नाकारले जातात

  • ज्या ठिकाणी व्यवथित काम सुरु आहे, नियमित व्यवसाय सूरु आहे तिथे नवीन प्रस्ताव घेण्यात येत नाही.
  • कृषीविषयक ज्ञान-आवड नसलेल्या, शेतकऱ्याबद्दल आत्मीयता नसलेल्या व्यक्तीचे प्रस्ताव स्वीकारल्याने कंपनीचे नुकसान होऊ शकते, त्यामुळे असे प्रस्ताव देखील नकारले जातात.
  • खत नियंत्रण आदेशानुसार पुर्तता नसल्यास तांत्रिकदृष्ट्या व्यापार सुरळीत चालत नाही.
  • सुरवातीला आर्थिक गुंतवणूक करण्याची अजिबात तयारी नसल्यास प्रस्ताव स्वीकारण्यात धोका आसतो. स्वत:वर आत्मविश्वास असणारी व्यक्ती गुंतवणूक करायला मागेपुढे पहात नाही. डीलरनेटवर्क मध्ये स्वत:वर विश्स्वास न ठेवू शकणारी व्यक्ती नको असते. 
  • दळणवळण उपलब्ध नसलेल्या भागातील प्रस्ताव स्वीकारून उपयोग होत नाही. अशा ठिकाणच्या व्यक्तीने प्रस्ताव देतांना अडचणीवर तोडगा देणे आवश्यक असते. 
  • निम्नदर्जाची शेती असलेल्या क्षेत्रातील प्रस्ताव स्वीकारले जात नाही

मित्रहो, जर आपला डीलरशिपचा प्रस्ताव नाकारण्यात आला असेल तर आपण वरील कोणत्या गटात मोडतो याचा विचार करावा. तुम्हाला नकार ऐकायला आवडत नसेल तर आम्हाला देखील आपल्यासारखा डीलर गमवायचा नाही. तुम्ही एक पाउल पुढे या....पुढल्या वळणावर आम्ही आपली वाट पहातोय. 

टरबूज (कलिंगड) व खरबूज व्यवस्थापन
टरबूज (कलिंगड) व खरबूज व्यवस्थापन
जातींची निवड:  टरबूज: सागर किंग, डॉन, ब्लेक सुप्रीमो, ब्लेक बोस, सुपर क्वीन, शुगरक्वीन, एच २०, एन...
Read More
गाजर उत्पादन व्यवस्थापन
गाजर उत्पादन व्यवस्थापन
गाजराला थंड हवामान मानवते. 15-20 अंश तापमानात उगवलेली गाजरे रंगाने आकर्षक व चवीला गोड असतात तर १८...
Read More
उन्हाळी मुग व्यवस्थापन
उन्हाळी मुग व्यवस्थापन
हे पिक कुणी निवडावे? जर पाणी उपलब्ध असेल तर कमी कालावधी (६०-६५ दिवस) चे पिक म्हणुन मुगाची निवड क...
Read More
सोयाबीन पिकाचे खत व फवारणी व्यवस्थापन
सोयाबीन पिकाचे खत व फवारणी व्यवस्थापन
बीज प्रक्रिया एकरी २५-३० किलो बियाणे लागते. बीज प्रक्रीये साठी ह्युमॉल जेली ५०० ग्राम + बुरशीनाशक...
Read More
मका पिकाचे खत व फवारणी व्यवस्थापन
मका पिकाचे खत व फवारणी व्यवस्थापन
 मक्याची लागवड वर्षातून तीन वेळा करता येते. पावसाळी लागवड मध्य जून ते मध्य जुलै, रब्बी लागवड मध्य...
Read More
टरबुज खरबुज लागवडीची पुर्वतयारी
टरबुज खरबुज लागवडीची पुर्वतयारी
शेतकरी मित्रहो, सदर लेख "पाटलांचा फळा" या आमच्या नियमित प्रसारित होणाऱ्या तात्कालिक युट्युब व्हिड...
Read More
हंगामानुसार कांदा बीजोत्पादन वेळापत्रक
हंगामानुसार कांदा बीजोत्पादन वेळापत्रक
खरिपातील जातींचे बीजोत्पादन : खरिपातील जातींचे कांदे ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात तयार होतात. या का...
Read More
Back to blog

युट्यूब