तुम्ही "ऑक्टोबर हिट" मध्ये टरबूज घेणार का?

तुम्ही "ऑक्टोबर हिट" मध्ये टरबूज घेणार का?

पर्यावरण असंतुलना मुळे गेल्या काही वर्षात आपण वातावरणात मोठे बदल बघत आहोत. ओस्ट्रेलियातील भीषण वणवा असो किं कॅनडा मधील गर्मीचे थैमान, जागतिक तापमान वाढत आहे. हिवाळा आकुंचन पावत असून उन्हाळा वाढत आहे.  याचमुळे आजकाल बाजारात १२ माही टरबूज दिसते!

 

ऑक्टोबर हिट मध्ये टरबूज मागणीत वाढ होते. त्यानंतर हिवाळ्यात घरघुती मागणी कमी असली तरी हॉटेल व्यावसायिकांची मागणी अबाधित रहाते. जानेवारीच्या मध्यानंतर टरबूज पुन्हा भाव खावू लागतो तो फळांचा राजा “आंबा” बाजारात येई पर्यंत टरबूजाचेच राज्य बाजारावर सुरु असते.

या उतार चढावांचा अंदाज असलेले शेतकरी बांधव मग टरबूज लागवडीची वेळ साधत असतात. 

वालुकामय, पोयट्याची, मध्यम ते काळी, पाण्याचा निचरा असणारी, सेंद्रिययुक्त जमीन लागवडीसाठी उत्तम असते. आठपेक्षा जास्त सामू, चुनखडीयुक्त, चोपण जमीन लागवडीत हे पिक घेवू नये.

उष्ण, भरपूर सूर्यप्रकाश व कोरडे हवामान चांगले मानवते. कलिंगडाच्या उत्तम वाढीसाठी २२ ते २५ अंश सेल्सिअस तापमान उपयुक्त असते. वाढीच्या कालावधीमध्ये हवेमध्ये दमटपणा व धुके असल्यास वेलीची वाढ व्यवस्थित होत नाही. पीक रोगास बळी पडण्याची शक्यता असते.

ऑक्टोबर हिट मध्ये बाजार साधायची असल्यास ऑगस्ट मध्ये टरबूज लागवड करावी. फळे ऑक्टोबर मध्ये बाजरात विक्रीसाठी तयार होतात. मागणी बऱ्यापैकी असते. थंडी पडली नाही तर नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये हि मागणी येतच असते.  

अनेक शेतकरी १५ डिसेंबर ते १५ फेब्रुवारी दरम्यान लागवड करतात. त्यांची फळे एप्रिल-मे मध्ये बाजारात विक्रीसाठी तयार होतात. या काळात लागवडीचे क्षेत्र जास्त असले तर भाव साधने कठीण होऊन बसते.

पाटील बायोटेक तंत्रज्ञानात "टरबूज व खरबूज" या दोघी पिकांना जवळपास सारखी प्रक्रिया वापरले जाते. यात खालील बाबींचा समावेश होतो.

  • जमिनीची मशागत
  • लागवडीचे अंतर
  • आळवणी व्यवस्थापन
  • एकात्मिक कीड नियंत्रण
  • फवारणी व्यवस्थापन . 

आळवणी व्यवस्थापनाचे १५-१८ टप्पे असून यात पिकाच्या संतुलित पोषणावर भर देण्यात येतो. पिक जोमाने वाढावे, त्याची रोगप्रतिकार शक्ती टिकून रहावी, योग्य वेळी फुल व फळधारणा व्हावी तसेच फळाची साईज व वजन उत्तम व्हावे अशी योजना असते.

एकात्मिक कीड व्यवस्थापनात रसशोषक किडींच्या संख्येवर नियंत्रण कसे ठेवायचे व फळमाशीचा प्रकोप कसा टाळावा या दोन महत्वाच्या बाबी लक्षात घेतल्या जातात.

फवारणी व्यवस्थापनाचे १०-१५ टप्पे असून या माध्यमातून रोग, किड व अन्नद्रव्य कमतरता यांना नियंत्रणात ठेवले जाते. 

तंत्रज्ञान परिपूर्ण असून या तंत्रज्ञानाच्या मदतीने अनेक शेतकरी बांधवांनी रेकोर्ड ब्रेक उत्पादन व चोख नफा घेण्यात यश मिळवले आहे. 

इथे दिलेल्या लिंकवरून आपण “टरबूज खरबूज पिकाचे शेड्युल” मोफत डाऊनलोड करू शकता (त्यासाठी Digitalfarmer हा कोड वापरावा). जर आपणास शेड्युल प्रिंटेड स्वरुपात हवे असेल तर ५० रु हाताळणी खर्च ऑनलाईन देवून आपण प्रिंटेड कोपी घरपोच मागवू शकता. 

या किंवा इतर कोणत्याची पिकाच्या बाबतीत श्री. अमोल पाटील यांचे मार्गदर्शन हवे असेल तर स्क्रीन वर तरंगत असलेल्या व्हाटसअप बटनावर क्लिक करा.

Back to blog