भेंडी एक्स्पोर्ट करणार का? वाचा नियोजन

मित्रहो, जुलैच्या पहिल्या आठवडयात, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात आणि जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात भेंडी लागवड केली जाते. लागवडीपूर्वी जमिनीची मशागत करून त्यात कमीत कमी एकरी २ ते ३ टन शेणखत, तीन किलो हुमणासूर व २० किलो मायक्रोडील ग्रेड वन मिसळावे.

बियाणे निवडते वेळी चागल्या कंपनीचे बियाणे खात्रीशीर ठिकाणाहून घ्यावे. ४० ते ४५ दिवसात तोडणी सुरु होणारे व वायव्हीएमव्ही (यलो व्हेन मोझॅक व्हायरस) तसेच ओएलसीव्ही (ओक्रा लीफ कर्ल व्हायरस) या विषाणूला बळी न पडणारे बियाणे निवडावे. भेंडीची लांबी साधारण १० ते १२ सेमी इतकी असावी व तोडायला सोपी असावी. लागवड दोन फुटावर सरी पाडून, सरीच्या दोघी बाजूस १ फुट x अर्धा फुटावर केल्यास एकरी ६ ते ७ किलो बियाणे लागते. चांगल्या कंपनीचे बियाणे घेतल्यास त्यावर बुरशीनाशकाची प्रक्रिया केलेलीच असते, नसल्यास थायरम अथवा कार्बेन्डॅझिम ३ ग्राम प्रती किलो दराने , सुपर जिब व ह्युमोल जेलीत मिश्रित करून प्रक्रिया करावी. थोडे सुकवून लगेच टोकून लागवड करावी. पावसाळ्या व्यतिरिक्त वेळेस भेंडी साठी ठिबक व चंदेरी पेपर मल्च चा उपयोग करणे फायदेशीर ठरते.बी टोकन यंत्राचा वापर केल्यास वेळ व मजुरीचा खर्च वाचतो.

------------------

आपणास कोणती रोपे हवीत?

रोपवाटीकांची यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा

------------------

लागवडीपूर्वी ४५ किलो युरिया, १३० किलो सिंगल सुपर फाँस्पेट व ३४ किलो एम ओ पी द्यावे. लागवडी नंतर ३० दिवसांनी ४५ किलो युरिया परत द्यावा. मात्र माती परीक्षण केलेले असल्यास त्या नुसार खताचे डोस नियंत्रित करावेत. अमृतगोल्ड १९-१९-१९ व ००-५२-३४ या विद्राव्य खतांची आलटून-पालटून फवारणी, अमृत ड्रेंचींग कीट ची आळवणी व लोह-मंगल-जस्त-तांबे-मोलाब्द व बोरॉन युक्त मायक्रोडील ग्रेड २ या खताची फवारणी केल्याने पिकाचे संतुलित पोषण होऊन रोग-किडींचा त्रास कमी होतो, पिक लवकर तोडणीवर येते. या फवारण्या माफक खर्चात होतात व पिकाच्या वाढीत येणाऱ्या अडचणी जसे “अन्नद्रव्याची कमतरता, अपटेक न होणे, ढगाळ वातावरण व रससोशक किडीमुळे कमी झालेले प्रकाससंश्लेषण” यावर मात करण्यास पिकास मदत करतात. 


तणनाशकांच्या विशेषतः उगवणपूर्व तणनाशकांच्या वापरामुळे पिकाच्या सुरवातीपासूनच्या काळापासून प्रभावी तणनियंत्रण होऊन पिकांची जोमदार वाढ होते, तर कोळपणीसारख्या कायिक पद्धतीच्या तणनियंत्रण पद्धतीमुळे पुढे उगवून आलेल्या तणांचाही बंदोबस्त तर होतोच, तसेच पिकांना आंतरमशागतीचा दुहेरी फायदा व पर्यावरणाचा समतोल राखणे यासारख्या बाबीही साध्य होतात.

 

भेंडीत मावा, फळ व खोड किडा, पांढरी माशी, तुडतुडे, ठिपकेदार बोंड अळी, फुलकिडे, लालकोळी या किडींचा प्रादुर्भाव होऊ शकतो. सर्वसाधारण कीटकनाशक वापरल्यास किडीच्या प्रतिकारशक्ती मुळे फारसा फायदा होत नाही. किडींचा प्रदुर्भाव वाढल्यास त्याच्या माध्यमातून विषाणूचा प्रसार होऊ शकतो. विविध किडीसाठी खालीलप्रमाणे कीटकनाशक भेंडीत वापरले जावू शकतात

 • भेंडीतील मावा नियंत्रणासाठी इमीडाक्लोप्रीड १७.८ टक्के  ३ ते ५ मिली प्रती पंप, एसीटामीप्रीड २० टक्के ३ ते ५ टक्के प्रती पंप किंवा डायमेथोएट ३० टक्के ३५-४० मिली प्रती पंप फवारावे. इमीडाक्लोप्रीड १७.८ टक्के व एसीटामीप्रीड २० टक्के फवारणी नंतर तीन दिवस तोडणी टाळावी.
 • पांढरी माशी नियंत्रणासाठी अझाडिरेक्टिन ३०० पी पी एम ५० ते ७५ मिली प्रती पंप  किंवा फेन्प्रोपॅथ्रीन ५ ते ६ मिली प्रती पंप फवारावे. फवारणी नंतर सात दिवसांपर्यंत या औषधीचे अवशेष भेंडीत येवू शकतात त्यामुळे सात दिवसापर्यंत तोडणी करू नये. 
 • खोड व फळ पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी डेल्टामेथ्रीन २.८ टक्के १५ ते २० मिली प्रती पंप किंवा फेनप्रोपाथ्रीन ३० टक्के ५ ते ७ मिली प्रती पंप वापरावे. डेल्टामेथ्रीन फवारल्यावर १ दिवस व फेनप्रोपाथ्रीन फवारल्यास ७ दिवस तोडणी टाळावी.
  ------------------------------------
  --------------------------------------
 • भेंडीतील फळ पोखरणारी अळी म्हणजेच बहुभक्षी हेलीकोव्हर्पा अर्मिजेरा नावाची कापसाची बोंडअळी. नियंत्रणासाठी अझाडिरेक्टिन ३०० पी पी एम ५० ते ७५ मिली प्रती पंप (सात दिवस तोडणी टाळावी) किंवा क्लोरांट्रालीनीप्रोल ४ ते ५ मिली प्रती पंप (पाच दिवस तोडणी टाळावी) किंवा क्विनोल्फोस२५ टक्के १५ ते २५ मिली प्रती पंप वापरावे. 
 • जर भेंडीत लाल कोळी आलेला असेल व तोडणी सुरु व्हायला १५ दिवस अवकाश असेल तर डीकोफोल 18.५ टक्के ४० ते ५० मिली प्रती पंप वापरावे पण जर फक्त ७ दिवस शिल्लक असतील तर फेनाझाक्विन १० टक्के ४० मिली प्रती पंप किंवा फेनप्रोपाथ्रीन ३० टक्के ५ ते ७ मिली प्रती पंप वापरावे. जर तोडणी सुरु असेल तर क्विनोल्फोस २५ टक्के १५ ते २५ मिली प्रती पंप वापरावे.
 • फुलकिडीच्या नियंत्रणासाठी  इमीडाक्लोप्रीड १७.८ टक्के  ३ ते ५ मिली प्रती पंप फवारावे, तोडणीसाठी तीन दिवस वाट पहावी
 • तुडतुडे नियंत्रणासाठी  अझाडिरेक्टिन ३०० पी पी एम ५० ते ७५ मिली प्रती पंप फवारावे पण जर तोडनी सुरु असेल तर डायमेथोएट ३० टक्के ३५-४० मिली प्रती पंप फवारावे किंवा क्विनोल्फोस २५ टक्के १५ ते २५ मिली प्रती पंप वापरावे.

कीटकनाशकच्या वापरातून अनेकवेळा कीडनियंत्रण होत नाही याचा अनुभव आपणास असेलच. कीटकनाशकाचा दुय्यम दर्जा, बनावटपणा व कीड़ीत निर्माण झालेली रोगप्रतिकार क्षमता यामुऴे असे घडते. अनेक वेळा दुर्लक्ष झाल्याने शेतातील कीड़ीचे प्रमाण हाताबाहेर गेले की उशिरा लक्षात येते. लागवडीच्या दिवसापासून काढणी पर्यंत चिकट सापळे व कामगंध सापळे वापरल्यास किडींची लवकर ओळख होते. प्रत्येक आठवड्यात शेतात चौफेर फिरून एकरी कमीत कमी शंभर झाडांचा अभ्यास करायला हवा. जर ९५ टक्के झाडे किडीपासून मुक्त असली तर भेंडीची निर्यात होऊ शकते. त्यामुळे किडींवर बारीक नजर ठेवणे जास्त सोयीचे आहे. त्यासाठी आपण पाटील बायोटेक चे पिवळे व निळे चिकट सापळे ३:२ प्रमाणात, एकरी १० ते १२ लावावेत, पिक जसेजसे वाढेल तसे सापळ्याची उंची वाढवत रहावी.  निरीक्षण करत राहिल्यास आपल्या शेतात कोणती कीड आहे व किती प्रमाणात आहे याचा आपण अभ्यास करू शकता. जर आपण २० ते २५ सापळे लावले तर कीडनियंत्रण देखील चांगल्या प्रमाणात होते. किडीचे प्रमाण वाढतच असल्यास आपण कीटकनाशकाची फवारणी करू शकता. पाटील बायोटेक चे अरेना चॉकलेट पिकात लीग्निफिकेशन ची प्रक्रिया सुरु करते. या प्रक्रियेत पिकातील मऊपणा कमी होऊन काठीण्य वाढते. पाने, देठ व फांद्याचा पृष्ठभाग कडक झाल्याने रससोषक किडींच्या जबड्याला इजा होते, ते रसपान करू न शकल्याने त्यांचे प्रजनन कमी होते व कीड वाढू शकत नाही. किडीच्या माध्यमातून पसरणाऱ्या व्हायरसला देखील याच्या मुळे चाप बसतो. १५ लिटर च्या पंपासाठी छोटे व २०० लिटर च्या पंपासाठी मोठे चॉकलेट उपलब्ध आहे. 

भेंडीत बुरशीजन्य रोगांची देखील लागण होत असते. मर रोगात खोड व मूळ काळपट पडून रोपे कोलमडून पडतात. फिर फेरपालट केली नसल्यास किंवा पाण्याचा निचरा नीट नसला तर हि समस्या उदभवू शकते. सुरवातीला सांगितल्याप्रमाणे हुमणासूर वापरल्याने बचाव होतो.

ढगाळ वातावरणात भुरी या रोगाची लागवड होऊ शकते. त्यामुळे अशा दिवसात रीलीजर प्लस २२ ते ४० ग्राम प्रती पंप चांगले वस्त्रगाळ करून फवारावे. वस्त्रगाळणीत अडकलेले “सल्फर” देखील प्युअरच असते ते कुठल्याही खतात मिसळले तरी चालते.

जर पिकाची वाढ खुंटली असेल तर रोप उपटून मूळावर गाठी आहेत का हे बघावे. सुरवातीला सांगितल्याप्रमाणे हुमणासूर वापरल्याने बचाव होतो. 

  

या पिकासाठी पाटील बायोटेक तंत्रज्ञान उपलब्ध आहे.

तंत्रज्ञान म्हणजे काय हे जाणून घेण्यसाठी

इथे क्लिक करा.

 भेंडीची निर्यात

 

भेंडीची निर्यात

 महाराष्ट्रात भेंडीचे एकरी उत्पादन ७ ते १२ टना पर्यंत जावू शकते. जागतिक पातळीवर भारत भेंडीचा सर्वात मोठा उत्पादक व निर्यातक आहे. भेंडी निर्यातक्षम रहाण्यासाठी तिचे नियोजन उत्तमोत्तम करणे आवश्यक आहे. योग्य पोषण करून, नियमित काळजी घेवून व कमीत कमी रासायनिक फवारण्या घेवून भेंडीचे उत्पादन घेणे आवश्यक आहे. पाटील बायोटेक चे अनेक उत्पादने यात आपली बहुमुल्य मदत करू शकतात. आमची उत्पादने आपण महाराष्ट्रातील २००० पेक्षा अधिक कृषीकेंद्रातून किंवा ऑनलाईन खरेदी करू शकतात.

निर्यातीसाठी भेंडी तोडते वेळी व पॅकिंग करते वेळी काही खास खबरदारी घ्यावी लागते. सकाळी व सायंकाळी, थंड वेळेत तोडणी करावी. तोडणी करते वेळी, भेंडी ब्लेडने किंवा धारदार चाकूने देठासहित कापावी. प्रतवारी करून सावलीत ठेवावी. २५० गेज जाडीच्या प्लास्टिक पिशव्यात भरल्यास भेंडी जास्त काळ टिकून राहील. पॅकिंग करते वेळी भेंडीत "पाने, फुले, किडी" जाणार नाही हे निक्षून बघावे. 

जर तुम्हाला भेंडीची लागवड करून ती एक्स्पोर्ट करायची असेल तर याचा अनुभव असलेल्या कंपन्यांची मदत घ्यावी लागेल. खाली काही संपर्क देत आहोत त्याच्या कडे चौकशी करून बघावी.

भेंडी निर्यात करणाऱ्या कंपन्यांची यादी

M.s.y Traders, India
381/17, Bhawani Peth, Pune - 411042
Mobile:9371095152;9370605152
Telephone: 020-26439111; 020-26455152

Vaishvik Foods Private Limited
S.V Group Of Companies, S.no 166, Sinhagad Road, Nanded Phata, Pune - 411041, 
Mobile: 9860099090; 9552566488
Telephone: 020-24391881; 020-24390444

Smart Exim
No. 105, Alliance Residency, Sector-20, Belapur Village Near Chintamani CHS Road, CBD Belapur, Navi Mumbai - 400614
Mobile: 8976786890; 9029275590

महत्वाची नोट: आम्ही हि माहिती काळजीपूर्वक गोळा केलेली असली तरी एकदा स्वत: पडताळून घ्यावी.

  आमच्या सोशल ग्रुपला जॉईन केल्याने आमचे नवीनलेख आपल्याला लगेच वाचायला मिळतील

  ---------------------