Call 9923974222 for dealership.

भेंडी लागवड व पोषण

मित्रहो, जुलैच्या पहिल्या आठवडयात, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात आणि जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात भेंडी लागवड केली जाते. लागवडीपूर्वी जमिनीची मशागत करून त्यात कमीत कमी एकरी २ ते ३ टन शेणखत, तीन किलो हुमणासूर व २० किलो मायक्रोडील ग्रेड वन मिसळावे.

------------------

आपणास कोणती रोपे हवीत?

रोपवाटीकांची यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा

------------------

बियाणे निवडते वेळी चागल्या कंपनीचे बियाणे खात्रीशीर ठिकाणाहून घ्यावे. ४० ते ४५ दिवसात तोडणी सुरु होणारे व वायव्हीएमव्ही (यलो व्हेन मोझॅक व्हायरस) तसेच ओएलसीव्ही (ओक्रा लीफ कर्ल व्हायरस) या विषाणूला बळी न पडणारे बियाणे निवडावे. भेंडीची लांबी साधारण १० ते १२ सेमी इतकी असावी व तोडायला सोपी असावी. लागवड दोन फुटावर सरी पाडून, सरीच्या दोघी बाजूस १ फुट x अर्धा फुटावर केल्यास एकरी ६ ते ७ किलो बियाणे लागते. चांगल्या कंपनीचे बियाणे घेतल्यास त्यावर बुरशीनाशकाची प्रक्रिया केलेलीच असते, नसल्यास थायरम अथवा कार्बेन्डॅझिम ३ ग्राम प्रती किलो दराने , सुपर जिबह्युमोल जेलीत मिश्रित करून प्रक्रिया करावी. थोडे सुकवून लगेच टोकून लागवड करावी. पावसाळ्या व्यतिरिक्त वेळेस भेंडी साठी ठिबक व चंदेरी पेपर मल्च चा उपयोग करणे फायदेशीर ठरते. (मल्च फिल्म स्वस्तात खरेदी करण्याठी इथे क्लिक करा) बी टोकन यंत्राचा वापर केल्यास वेळ व मजुरीचा खर्च वाचतो.

 

लागवडीपूर्वी ४५ किलो युरिया, १३० किलो सिंगल सुपर फाँस्पेट व ३४ किलो एम ओ पी द्यावे. लागवडी नंतर ३० दिवसांनी ४५ किलो युरिया परत द्यावा. मात्र माती परीक्षण केलेले असल्यास त्या नुसार खताचे डोस नियंत्रित करावेत. 

अमृतगोल्ड १९-१९-१९ व ००-५२-३४ या विद्राव्य खतांची आलटून-पालटून फवारणी, मृत ड्रेंचींग कीट ची आळवणी व लोह-मंगल-जस्त-तांबे-मोलाब्द व बोरॉन युक्त मायक्रोडील ग्रेड २ या खताची फवारणी केल्याने पिकाचे संतुलित पोषण होऊन रोग-किडींचा त्रास कमी होतो, पिक लवकर तोडणीवर येते.

या फवारण्या माफक खर्चात होतात व पिकाच्या वाढीत येणाऱ्या अडचणी जसे “अन्नद्रव्याची कमतरता, अपटेक न होणे, ढगाळ वातावरण व रससोशक किडीमुळे कमी झालेले प्रकाससंश्लेषण” यावर मात करण्यास पिकास मदत करतात.  

  

या पिकासाठी पाटील बायोटेक तंत्रज्ञान उपलब्ध आहे.

तंत्रज्ञान म्हणजे काय हे जाणून घेण्यसाठी

इथे क्लिक करा.

 

आमच्या सोशल ग्रुपला जॉईन केल्याने आमचे नवीनलेख आपल्याला लगेच वाचायला मिळतील

---------------------

पुन्हा भेटू पुढील लेखात तो पर्यंत हि पोष्ट अधिकाधिक शेतकरी बांधवापर्यंत पोहोचावी म्हणून फेसबुकवर शेअर करायला विसरू नका.
शेअर प्लीज

2 comments

  • पोखरी शिंगाडे

    Angad natha nangare
  • धन्यवाद माहिती दिल्याबद्दल

    Bhimrao Shinde

Leave a comment

Name and Mobile number .
.
Message with Address, District & Pincode .

Please note, comments must be approved before they are published