माझ्या शेतातील 40% भेंडी सध्या वाकड़ी होत आहे, कृपया उपाय सुचवा.

माझ्या शेतातील 40% भेंडी सध्या वाकड़ी होत आहे, कृपया उपाय सुचवा.

तुषार भागचंद जगताप. मु.पो.रांजणगाव सांडस,ता.शिरूर,जिल्हा-पुणे.पिन-412211 याच्याकडून वरील प्रश्न फेसबुक मेसेंजरवर प्राप्त झाला. त्याचे उत्तर खाली देत आहे. 
प्रश्न पाठवल्या बद्दल आपला आभारी आहे.
तुषारदादा आपल्या भेंडीवर रससोषक कीड असेल. जिथे कीड रसशोषण करते तिथे ती काही द्रव सोडते. त्याभोवतालच्या पेशींची वाढ थांबते पण विरुद्ध बाजूच्या पेशी नेहमी प्रमाणे वाढतात त्यामुळे भेंडी वाकडी होते. तुमच्या पिकावर कुठली रससोशक कीड आहे याचा प्रथम शोध घ्या म्हणजे कीटकनाशक निवडता येईल. खरे तर भेंडी तोडणीसाठी तयार असल्याने फार कमी औषधे वपरता येतील. औषध निवडण्यासाठी खाली लिंक देत आहे त्यावर लिंक करून कीड ओळखा - त्याखाली योग्य औषधांची यादी आहे त्यातून कीडनाशक निवडा.
 
पुढील वेळी आपने जेव्हाही कोणते पिक घ्याल तेव्हा सुरवाती पासून चिकट सापळे वापरायला विसरू नका. त्यावर चिकटलेल्या किडी बघून आपण योग्य वेळी योग्य निर्णय घेवू शकाल.
पाटील बायोटेक च्या अरेना चोकलेट ची फवारणी सुरवाती पासून सुरु केल्यास पिकाच्या नाजूक भागावर लीग्निफीकेशन होऊन किडींना रसशोषक करण्यास त्रास होतो. त्यांचे जबडे दुखतात. त्यामुळे कीड भुकेली राहून कमजोर होते. अरेना मुळे पिक जोमाने वाढते हा वाढीव फायदा तर होतोच.
अमृत कीट च्या वापरातून खत मात्रांचे संतुलन होते व पिकात रोगप्रतिकार क्षमता विकसित होते. बेसल डोस चांगला लागू होतो व बहुआयामी फायदे होतात. 
भेंडीवरील कीटकनाशक निवडण्यासाठी इथे क्लिक करा.
Back to blog