Call 9923974222 for dealership.

भेंडी पिकासाठी सर्वोत्तम कीडनाशकाचा शोध कसा घ्याल?

यापूर्वी आपण भेंडी वरील कीडनियंत्रणा बद्दल आमचे लेख वाचले असतील (वाचायचे असतील तर इथे क्लिक करा). या लेखात कीडनाशकाची निवड कशी करावी याविषयी आपण माहिती घेवू.

 • इतर देशांच्या मानाने कमी कीटकनाशके वापरून देखील आपल्या पिकात अंश आढळून येतात. असे का होते? 
 • कीटकनाशकावर अवास्तव खर्च करून उत्पादन खर्च वाढतो. कमी खर्चात कीडनियंत्रण करायचे असेल तर त्याचा शास्त्रीय अभ्यास आपण करायला हवा.
 • आपण चुकीचे कीटकनाशक वापरतो का?, नकली कीटनाशक वापरतो का? महाग कीटकनाशक म्हणजे चांगले कीटकनाशक असा विचार आपण करतो का? याचा अभ्यास करणे आवश्यक आहे.
 • पूर्वी आपण कोणते कीटकनाशक वापरले, त्याचा किडीवर नेमका काय परिणाम होतो व आता कीडनाशक बदलायचे असल्यास किडीवर कोणता परिणाम करणारे कीडनाशक वापरावे
 • कीड दिसली कि लगेच फवारणी करतो पण कीडीने आर्थिक नुकसानीची पातळी (Economic threshold level) गाठली आहे कि नाही याचा विचार किंवा अभ्यास करत नाही. उगाच करच वाढतो.

शेतातील किडींवर लक्ष ठेवण्यासाठी एकरी १० व सुरवातीच्या काळात नियंत्रण ठेवण्यासाठी एकरी ४० चिकट सापळे नक्की वापरा! 

 

पिकाच्या संतुलित पोषणासाठी अमृत प्लस आळवणी कीट वापरा.पिकाची वाढ उत्तम होईल, पिकात कीड व रोग प्रतिकार शक्ती येईल. कीटकनाशके कमी लागतील.

मित्रहो इथे एक टेबल देत आहे यात ७ रकाने आहेत. हा टेबल आपण सर्च करू शकता त्यासाठी त्यावर एक सर्च विंडो दिली आहे त्यात कि-वर्ड टाकून आपण शोध घेवू शकता. हे कि-वर्ड इंग्रजीत टाकायचे आहेत.

 • पहिल्या रकान्यात किडींची नावे आहेत. भेंडीत साधारण पणे aphid मावा, Fruit & shoot borer खोड व फळ पोखरणारी कीड, Jassid तुडतुडे, Leaf Hopper नाकतोडे, mite कोळी, Thrips फुलकिडे, whitefly पांढरी माशी या किडी येतात.
 • दुसऱ्या रकान्यात आपणास आर्थिक नुकसानीची पातळी (Economic threshold level) कशी ओळखायची ते दिसेल
 • तिसऱ्या रकान्यात शिफारस केलेलं कीडनाशक कोणते आहे ते दिसेल
 • चवथ्या रकान्यात हे कीटकनाशक किडीच्या कोणत्या भागावर परिणाम करते ते दिसेल. कीटकनाशक निवडते वेळी आपण कोणत्या भागावर परिणाम करणारे कीटकनाशक यापूर्वी वापरले आहे ते लक्षात घेवून या वेळी कोणत्या वेगळ्या भागावर परिणाम करणारे कीटकनाशक निवडता येईल का असे बघावे.
 • पाचव्य रकान्यात ते कीटकनाशक कसे वापरावे याबद्दल माहिती दिली आहे. 
 • पूर्वी आपण एकल (SINGLE) कीटकनाशक वापरत असू पण आता अधिक प्रभावशाली मिश्र (COMBO) कीटकनाशक उपलब्ध आहेत. आपण मिश्र कीटकनाशक वापराचा प्रयत्न करावा
 • शेवटच्या रकान्यात कीटकनाशकाचे स्वरूप दिलेले आहे.

 मित्रहो सर्च विंडोत आपण WHITE GROWTH हे दोन शब्द टाकले तर आपण white fly अर्थात पांढऱ्या माशी च्या growth अर्थात वाढीवर परिणाम करणारे Pyriproxyfen 5% EC + Fenpropathrin 15% EC हे कीटकनाशक दिसून येईल. आपण शेतात शोधत असतांना जर आपल्याला प्रत्येक पानावर चार प्रौढ पांढऱ्या माशा आढळून आल्या किवा चिकट संपळ्यावर मोठ्या प्रमाणत हि कीड दिसून आली तर आपण निर्देशित कीटकनाशक फवारणीसाठी निवडावे.

मोबाईलवर टेबल बघत असाल तर आडवे स्वाईप करा जेणेकरून उजवीकडील रखाने आपण बघू शकाल.

1 comment

 • शेवगा पिकाचे रश्क्षन सांगा सर

  Shared more

Leave a comment

Name and Mobile number .
.
Message with Address, District & Pincode .

Please note, comments must be approved before they are published