भेंडीतील कीडनियंत्रण

भेंडीतील कीडनियंत्रण

भेंडीत मावा, फळ व खोड किडा, पांढरी माशी, तुडतुडे, ठिपकेदार बोंड अळी, फुलकिडे, लालकोळी या किडींचा प्रादुर्भाव होऊ शकतो. सर्वसाधारण कीटकनाशक वापरल्यास किडीच्या प्रतिकारशक्ती मुळे फारसा फायदा होत नाही. किडींचा प्रदुर्भाव वाढल्यास त्याच्या माध्यमातून विषाणूचा प्रसार होऊ शकतो. विविध किडीसाठी खालीलप्रमाणे कीटकनाशक भेंडीत वापरले जावू शकतात.

  • भेंडीतील मावा नियंत्रणासाठी इमीडाक्लोप्रीड १७.८ टक्के  ३ ते ५ मिली प्रती पंप, एसीटामीप्रीड २० टक्के ३ ते ५ टक्के प्रती पंप किंवा डायमेथोएट ३० टक्के ३५-४० मिली प्रती पंप फवारावे. इमीडाक्लोप्रीड १७.८ टक्के व एसीटामीप्रीड २० टक्के फवारणी नंतर तीन दिवस तोडणी टाळावी.
  • पांढरी माशी नियंत्रणासाठी अझाडिरेक्टिन ३०० पी पी एम ५० ते ७५ मिली प्रती पंप  किंवा फेन्प्रोपॅथ्रीन ५ ते ६ मिली प्रती पंप फवारावे. फवारणी नंतर सात दिवसांपर्यंत या औषधीचे अवशेष भेंडीत येवू शकतात त्यामुळे सात दिवसापर्यंत तोडणी करू नये. 
  • खोड व फळ पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी डेल्टामेथ्रीन २.८ टक्के १५ ते २० मिली प्रती पंप किंवा फेनप्रोपाथ्रीन ३० टक्के ५ ते ७ मिली प्रती पंप वापरावे. डेल्टामेथ्रीन फवारल्यावर १ दिवस व फेनप्रोपाथ्रीन फवारल्यास ७ दिवस तोडणी टाळावी.
  • भेंडीतील फळ पोखरणारी अळी म्हणजेच बहुभक्षी हेलीकोव्हर्पा अर्मिजेरा नावाची कापसाची बोंडअळी. नियंत्रणासाठी अझाडिरेक्टिन ३०० पी पी एम ५० ते ७५ मिली प्रती पंप (सात दिवस तोडणी टाळावी) किंवा क्लोरांट्रालीनीप्रोल ४ ते ५ मिली प्रती पंप (पाच दिवस तोडणी टाळावी) किंवा क्विनोल्फोस२५ टक्के १५ ते २५ मिली प्रती पंप वापरावे. 
  • जर भेंडीत लाल कोळी आलेला असेल व तोडणी सुरु व्हायला १५ दिवस अवकाश असेल तर डीकोफोल 18.५ टक्के ४० ते ५० मिली प्रती पंप वापरावे पण जर फक्त ७ दिवस शिल्लक असतील तर फेनाझाक्विन १० टक्के ४० मिली प्रती पंप किंवा फेनप्रोपाथ्रीन ३० टक्के ५ ते ७ मिली प्रती पंप वापरावे. जर तोडणी सुरु असेल तर क्विनोल्फोस २५ टक्के १५ ते २५ मिली प्रती पंप वापरावे. स्पीरोमीसीफेन २२.९% एस सी किंवा स्पीरोटेट्रामॅट ११.०१ + इमिडाक्लोप्रीड ११.०१% एस सी हे  कोम्बो कीटकनाशक  १ मिली प्रती लिटर च्या दराने तोडणीच्या तीन दिवस अगोदर पर्यंत फवारणी करू शकता.
  • फुलकिडीच्या नियंत्रणासाठी  इमीडाक्लोप्रीड १७.८ टक्के  ३ ते ५ मिली प्रती पंप फवारावे, तोडणीसाठी तीन दिवस वाट पहावी
  • तुडतुडे नियंत्रणासाठी  अझाडिरेक्टिन ३०० पी पी एम ५० ते ७५ मिली प्रती पंप फवारावे पण जर तोडनी सुरु असेल तर डायमेथोएट ३० टक्के ३५-४० मिली प्रती पंप फवारावे किंवा क्विनोल्फोस २५ टक्के १५ ते २५ मिली प्रती पंप वापरावे.

कीटकनाशकच्या वापरातून अनेकवेळा कीडनियंत्रण होत नाही याचा अनुभव आपणास असेलच. कीटकनाशकाचा दुय्यम दर्जा, बनावटपणा व कीड़ीत निर्माण झालेली रोगप्रतिकार क्षमता यामुऴे असे घडते. अनेक वेळा दुर्लक्ष झाल्याने शेतातील कीड़ीचे प्रमाण हाताबाहेर गेले की उशिरा लक्षात येते. लागवडीच्या दिवसापासून काढणी पर्यंत चिकट सापळे व कामगंध सापळे वापरल्यास किडींची लवकर ओळख होते. प्रत्येक आठवड्यात शेतात चौफेर फिरून एकरी कमीत कमी शंभर झाडांचा अभ्यास करायला हवा. जर ९५ टक्के झाडे किडीपासून मुक्त असली तर भेंडीची निर्यात होऊ शकते. त्यामुळे किडींवर बारीक नजर ठेवणे जास्त सोयीचे आहे. त्यासाठी आपण पाटील बायोटेक चे पिवळे व निळे चिकट सापळे ३:२ प्रमाणात, एकरी १० ते १२ लावावेत, पिक जसेजसे वाढेल तसे सापळ्याची उंची वाढवत रहावी.  निरीक्षण करत राहिल्यास आपल्या शेतात कोणती कीड आहे व किती प्रमाणात आहे याचा आपण अभ्यास करू शकता. जर आपण २० ते २५ सापळे लावले तर कीडनियंत्रण देखील चांगल्या प्रमाणात होते. किडीचे प्रमाण वाढतच असल्यास आपण कीटकनाशकाची फवारणी करू शकता. पाटील बायोटेक चे अरेना चॉकलेट पिकात लीग्निफिकेशन ची प्रक्रिया सुरु करते. या प्रक्रियेत पिकातील मऊपणा कमी होऊन काठीण्य वाढते. पाने, देठ व फांद्याचा पृष्ठभाग कडक झाल्याने रससोषक किडींच्या जबड्याला इजा होते, ते रसपान करू न शकल्याने त्यांचे प्रजनन कमी होते व कीड वाढू शकत नाही. किडीच्या माध्यमातून पसरणाऱ्या व्हायरसला देखील याच्या मुळे चाप बसतो. १५ लिटर च्या पंपासाठी छोटे व २०० लिटर च्या पंपासाठी मोठे चॉकलेट उपलब्ध आहे. 

भेंडीत बुरशीजन्य रोगांची देखील लागण होत असते. मर रोगात खोड व मूळ काळपट पडून रोपे कोलमडून पडतात. फिर फेरपालट केली नसल्यास किंवा पाण्याचा निचरा नीट नसला तर हि समस्या उदभवू शकते.  हुमणासूर वापरल्याने बचाव होतो. 

ढगाळ वातावरणात भुरी या रोगाची लागवड होऊ शकते. त्यामुळे अशा दिवसात रीलीजर प्लस २२ ते ४० ग्राम प्रती पंप चांगले वस्त्रगाळ करून फवारावे. वस्त्रगाळणीत अडकलेले “सल्फर” देखील प्युअरच असते ते कुठल्याही खतात मिसळले तरी चालते.

जर पिकाची वाढ खुंटली असेल तर रोप उपटून मूळावर गाठी आहेत का हे बघावे. हुमणासूर वापरल्याने बचाव होतो. 

  

या पिकासाठी पाटील बायोटेक तंत्रज्ञान उपलब्ध आहे.

तंत्रज्ञान म्हणजे काय हे जाणून घेण्यसाठी

इथे क्लिक करा.

पुन्हा भेटू पुढील लेखात तो पर्यंत हि पोष्ट अधिकाधिक शेतकरी बांधवापर्यंत पोहोचावी म्हणून फेसबुकवर शेअर करायला विसरू नका.
शेअर प्लीज
    Back to blog