कांद्यात आढळून येणाऱ्या अन्नद्रव्य कमतरता, कारणे व उपाय

कांद्यात आढळून येणाऱ्या अन्नद्रव्य कमतरता, कारणे व उपाय

कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात होत आहे. चांगला नफा होण्यासाठी कांद्याचा दर्जा उत्तम हवा, वजन चांगले असावे व एकरी उत्पन्न देखील भरगोस हवे . 

पिकात अन्नद्रव्य कमतरता निर्माण झाल्यास दर्जा, वजन व उत्पादकता या तिघी मापदंडावर परिणाम होऊन नुकसान होऊ शकते. या लेखात उपयुक्त माहिती देत आहे. आमची कोणती उत्पादने आपली मदत करू शकतात हे देखील निर्देशित केले आहे. पाटील बायोटेक तंत्रज्ञान घेण्यासाठी लेखाखाली लिंक दिली आहे. 

स्पुरद कमतरता:  कांद्याचा आकार चांगला रहावा व उत्पादन वाढण्यासाठी स्पुरद महत्वाचा घटक आहे. स्पुरदाची कमतरता झाल्यास वाढीचा वेग मदवतो. मुळांची वाढ थांबते. अति आम्ल किंवा विम्ल मृदा, सेंद्रिय कर्बाची कमतरता, थंडी व ओलावा, लोहाचे वाढीव प्रमाण यामुळे स्पुरदाची कमतरता वाढीस लागू शकते. कमतरता भरून काढण्यासाठी अमृत गोल्ड ००-५२-३४ चा वापर करावा. शेत तयार करते वेळी ह्युमोल गोल्ड कंद स्पेशल वापरल्याने सेंद्रिय कर्ब संतुलन साधले जाईल.

मॅग्नेशियमची कमतरता: क्लोरोफिल निर्मिती साठी व सड थांबवून कांद्याची टिकवण क्षमता (शेल्फ लाईफ) वाढविण्यासाठी मॅग्नेशियम अत्यंत महत्वाचा घटक आहे. वालुकामय मृदा, आम्ल मृदा, अतिरिक्त पोटाश, थंडी व ओलावा यामुळे मॅग्नेशियमची कमतरता जोर धरू शकते. या घटकाची कमतरता निर्माण झाल्यास जुनी पात खालपासून वरपर्यंत पिवळी पडते. काळजी घेतली नाहीतर  पात टोकाकडून जळायला सुरवात होते. वाढ पूर्णपणे थांबू शकते.

पाटील बायोटेक तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास मॅग्नेशियमची कमतरता येत नाही असा आमचा अनुभव आहे. मृदेची तयारी करते वेळेस एकरी १० किलो ह्युमॅग द्यावे. जर पिक वाढीच्या काळात लक्षणे दिसली तर अर्धा टक्काह्युमॅगची फवारणी करावी.

कॅल्शियमची कमतरता: मुळे चांगली रुजण्यात आणि लांब वाढण्यात कॅल्शियम महत्वाची भूमिका बजावतो. कॅल्शियममुळे पातीची उंची व सामर्थ्य वाढते. कांद्याची टिकवण क्षमता वाढते. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे पात टोकाच्या बाजूने सुरवातीला कोणताही पिवळेपणा न दाखवता जळून जाते. आम्लधर्मी हलकी मृदा, मृदेतील अति सोडियम व अल्युमिनियम मुळे, दुष्काळी परिस्थितीमुळे अडचणी वाढू शकतात. पाटील बायोटेकचे कॅलनेट वापरून कमतरता कमी करता येईल. कॅलनेट मधील कॅल्शियम १०० टक्के विद्राव्य असून सोबत नायट्रेट असल्याने लगेच अपटेक होते. कॅलनेट आंतरराष्ट्रीय दर्जाचे उत्पादन आहे.

गंधक कमतरता: एन्झाईम (विकरे) व प्रथिनात गंधक असते. हरितलवक बनण्यासाठीदेखील गंधक आवश्यक असते. कांद्याचे एकूण उत्पादन, प्रत्येक कांद्याचे वजन, त्याची चव, त्यातील शर्करा, रोग व कीट प्रतिकारशक्ती यासाठी गंधक महत्वाचे आहे. या घटकाची कमतरता झाली तर पातीची संख्या घटते. नवी पात पूर्ण पिवळी पडते.

आम्ल धर्मी हलकी मृदा, सेंद्रिय घटकाची कमतरता, पाणथळ यामुळे गंधकाची कमतरता वाढू शकते.

पिवळे पिठूर गंधक पाण्यात विरघळत नाही त्यामुळे शेतात नीट पसरू शकत नाही. पिवळ्या गंधकाचा कण जाड असल्याने लागू होण्यास १०-१५ दिवस लागतात. मुळांच्या क्षेत्रात पोहोचणे त्याला कठीण जाते. पाटील बायोटेकचे रीलीजर पाण्यात भिजले कि त्यातील कण वेगाने वेगळे होतात व पसरतात. चार दिवसात पूर्ण मात्रा पिकास लागू होते. गंधकाची कमतरता सहज भरून निघते. एकरी ३ किलोचा डोस आहे.

बोरानची कमतरता: वालुकामय व विम्ल मृदेत बोरानची कमतरता निर्माण होते कारण ते सहज वाहून जाते. नत्र व कॅल्शीयमयुक्त खते अतिप्रमाणात वापरली तर बोरानच्या वहनात अडचणी येवून कमतरता निर्माण होते. कमतरतेची लक्षणे थोडी वेगळी आहेत. पात अति गडद हिरवी होते तिचा सहज तुकडा पडतो. वाढ खुंटते. पात दिसायला देखील वाकडी-तिकडी असते.


पाटील बायोटेक चे मायक्रोडील बि-२० पाण्यात पूर्णपणे विरघळते व याची फवारणी करून हि अडचण दूर केली जावू शकते.

तांब्याची कमतरता:

तांब्याची कमतरता असेल तर पातीचे टोक पांढरे पडते व पात मळसूत्रा सारखी वळलेली आते. नत्राचा जास्त वापर, अति सेंद्रिय घटक, चुनखडीची मृदा, वालुकामय मृदा यामुळे हि कमतरता बळावू शकते.

मृदेची तयारी करतांना पाटील बायोटेकचे कंद स्पेशल ह्युमोल जी, मायक्रोडील ग्रेड १ यांचा वापर करावा. लक्षणे दिसू लागल्यावर मायक्रोडील सुपर मिक्स ची फवारणी करावी.

लोहाची कमतरता: कांदा सहजासहजी लोहाच्या कमतरतेला बळी पडत नाही. फारच कमतरता असल्यास पातिचा रंग उडतो व ती पिंगट दिसते.

विम्ल मृदा, पाणथळ मृदा, चूनखळी तसेच मृदेत गरजेपेक्षा जास्त तांबे, मेंग्नीज किंवा झिंक असल्यास लोहाची कमतरता बळावते.

मृदेची तयारी करतांना पाटील बायोटेक चे ह्युमोल गोल्ड, मायक्रोडील ग्रेड १ यांचा वापर करावा. लक्षणे दिसू लागल्यावर पाटील बायोटेक चे मायक्रोडील आयर्न-१२ ची फवारणी करावी.

झिंकची कमतरता: या घटकाची कमतरता रोपांवर अधिक परिणाम करते. विम्ल, चुन्याची मृदा, थंड व ओलसर वातावरणात जास्त परिणाम होतो. पिकाची वाढ खुंटते, पात बाहेर च्या बाजूला लपकते.

मृदेची तयारी करतांना पाटील बायोटेक चे ह्युमोल गोल्ड, मायक्रोडील ग्रेड १ यांचा वापर करावा.

पाटील बायोटेक चे मायक्रोडील झिंक-१२ पाण्यात पूर्णपणे विरघळते व याची फवारणी करून हि अडचण दूर केली जावू शकते.

संदर्भ:

एफएओ.ओआरजी

आपणास हि माहिती कशी वाटली? प्रतिक्रिया द्यायला विसरू नका.

शेअर नक्की करा

  

या पिकासाठी पाटील बायोटेक तंत्रज्ञान उपलब्ध आहे.

तंत्रज्ञान म्हणजे काय हे जाणून घेण्यसाठी

इथे क्लिक करा.

आमच्या सोशल ग्रुपला जॉईन केल्याने आमचे नवीनलेख आपल्याला लगेच वाचायला मिळतील

---------------------

Back to blog