कांद्याचा नफा कसा राखावा?
बाजारभाव मागणी-पुरवठा या तत्वावर चालतो असे मानले जाते. प्रत्यक्षात मात्र तसे होत नाही. छुपा साठा करून मागणी-पुरवठ्यात लपंडाव निर्माण केला जातो. सर्वसामान्य, बेसावध व काही अंशी बेजबाबदार शेतकरी यात भरडला जातो. त्याच्या शेतीमालाला कधीही योग्य भाव मिळत नाही. त्याचे शोषण होते. बाजारातील काही मंडळी मात्र “लोण्यावर” ताव मारून नको तितके फुगतात. कांदा उत्पादक शेतकरी अश्या पद्धतीने नेहमीच लुटला जातो. त्याची हि लुट थांवायची असेल तर त्याने कांदाचाळ तयार करायला हवी.
कांद्याच्या एकूण उत्पादनापैकी मोठा हंगाम पावसाळ्यात येतो व उर्वरित हंगाम रब्बी व उन्हाळ्यात येतो. यामुळे सहाजिकच सर्वोच्च भाव जून ते सप्टेबर या काळात असतो. यामुळे कांदाचाळीमध्ये तीन ते सहा महिन्यापर्यंत कांदा साठवावा लागतो व जून ते सप्टेबर दरम्यान कांदाचाळी टप्याटप्याने, नफा राखत, रिकाम्या करता येतात.
शास्त्रीय पद्धतीने बांधलेल्या चाळीत आद्रता व हवेचे नियमन नैसर्गिक पद्धतीने केलेलं असत. त्यामुळे वजनातील घट कमी येते, कोंब कमी येतात व सड देखील नियंत्रणात रहाते. दर्जा टिकून रहातो त्यामुळे बाजारभाव साधण्यास मदत होते. याव्यतिरिक्त बेण्यासाठी स्वत:चा दर्जेदार प्रतवार केलेला कांदा मिळतो ज्यामुळे दर्जेदार बिजोत्पादन करता येते. एकूणच बिजवाई मध्ये केल्याजाणाऱ्या साठमारीमधून देखील शेतकरी स्वत:ला वाचवू शकतो. कांद्याचा नफा राखण्यास यामुळे मोठी मदत होते.
कांदाचाळीची बांधणी करण्यासाठी झाडाच्या सावलीत, हवेच्या दिशेला काटकोनात, पावसाळ्यात देखील कोरडी रहाणारी व वाहतुकीला सोयीची ठरेल अशी जागा निवडावी. खेळत्या हवेचे महत्व असल्याने चाळीच्या शेजारी कोणतेही दुसरे बांधकाम नसावे. आपल्याकडे उपलब्ध साधनांचा शक्य तितका चांगला वापर करणे गरजेचे आहे.
कांद्याची काढणी कांदा पूर्णपणे तयार झाल्यानंतर करावी. प्रथम प्रतवार करावी. प्रतवार झाल्यावर महत्वाचा टप्पा म्हणजे रीलीजरच्या वापराचा. रीलीजर म्हणजे मायक्रोनाइज्ड सल्फर (गंधक) पावडर. रीलीजर अतिशय बारीक (बाजारात मिळणारया पावडरच्या १००० पट अधिक बारीक) असते. रिलीजर आद्रतेचे प्रमाणबद्ध नियंत्रित करून, कांद्याचा रंग जसाचा तसा ठेवते. बुरशीला प्रतिबंध करून, हाताळणीत डेमेज झालेला कांदा सुकवून टाकते. सड थांबवून, कोंबाचे प्रमाण कमी करते.
रीलीजरच्या उपलब्धतेत काहीअडचण असल्यास, कांदा चाळीच्या शास्त्रशुद्ध बांधकामाची अथवा सरकारी योजनेची माहिती हवी असल्यास तसेच कांदा बिजोत्पादन व कांदा उत्पादनाचे आळवणी व फवारणी शेड्युल हवे असल्यास आपण आमच्या प्रतिनिधीची मदत घेवू शकता. त्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरावा. आमचे अन्य लेख वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा.