खरेदी फायद्याची!

लहानपणी मी आजीसोबत बाजारात जात असे. पिशव्या रिकाम्या असेपर्यंत आपण धरायच्या, भरायला लागल्या कि आजीच धरत असे. हलवायाच्या दुकानापासून पुढे सर्व पिशव्या आजीच धरे, माझ्या हातात गोडीशेवाची पुडी येई! रमत गमत मी आजीच्या मागे मागे चालत राही. ते दिवस गमतीदार होते. आजीसोबत बाजारात जायचा नियम ५ ते ६ वर्ष होता! "बाजारात कसे बोलायचे, कसा भाव ठरवायचा, दर्जा कसा बघायचा" हे सारे मी आजी कडूनच शिकलो. तिने निवडलेल्या वस्तू दर्जेदार असत. काही दुकानदार ठरलेले होते त्यांच्याशी तोलमोल होत नसे. खरेदी व्यतिरिक्त दुकानदारांकडे वेळ असला तर ख्याली-खुशालीच्या गप्पा देखील ती करायची. इतर दुकानदारांशी मात्र आजी खूप तोलमोल करायची. भाव ठरवायची, वजनाकडे लक्ष द्यायची, निवडानिवड करायची, वस्तू ची परीक्षा घ्यायची (जसे भाजीचा वास, फळाची चव, पालेभाजी कुचकरून बघायची). चार उलटसुलट प्रश्न करायची. तिच्या अश्या वागण्याची मला गंमत वाटायची. 

 मी तिला खूप प्रश्न विचारीत असे. माझ्या प्रश्नांचे तिला फार कौतुक. थोडे प्रश्न सोडले तर बहुतेक ती सर्व प्रश्नांचे उत्तरे देखील ती देतच असे.

"काही दुकानदारांशी तू गप्पा मारते इतरांना मात्र खूप त्रास देते असे का?" एकदा मी तिला विचारले.

"जे दुकानदार मला चांगली वस्तू योग्य किमतीत देतात त्यांच्याशी तोलमोल का करायचा?" इतर दुकानदार एकतर नियमित नसतात, मिळेल ते विकतात, काही दुकानदार दर कमी सांगून वजनात किंवा दर्जात  गडबड करतात, काही दुकानदार वाजवी पेक्षा जास्त दरात वस्तू विकायचा प्रयत्न करतात, काही दुकानदार मधाळ बोलून निरुपयोगी वस्तू विकतात. एकूणच त्यांच्याशी बोलावेच लागते, तोलमोल करावाच लागतो, परीक्षा करावीच लागते." 

आजीने सांगितलेली हि गोष्ट तिने पुढे वेळोवेळी पुन्हा पुन्हा समजावून सांगितली. खाच खळगे लक्षात आणून दिलेत. तिने मला एक चोख "खरेदीदार" बनवले. आता आजी नाही पण तिने दिलेल्या आठवणी व व्यवहारीपणाचे  बाळकडू, जसे काही अमृतच!

"तुम्ही कसलीही खरेदी करा, किफायतशीर किमतीत योग्य दर्जाची वस्तू मिळवा."  

काळ बदलतो तसे संदर्भ बदलतात, पद्धती बदलतात. आता आपण इंटरनेट युगात आहोत. मोबाईलच्या माध्यमातून व्यवहार होतात. इलेक्ट्रोनिक चलन वापरले जाते. बहुतेक सर्वच वस्तूंची खरेदी-विक्री ऑनलाईन होते. अर्थात आजही व्यवहारातील मुळ तत्व बदलेली नाहीत.

समजा तुम्ही खते खरेदी करत असाल तर? माझी आजी असती तर तिने काय केले असते?

  1. खते रोखीत खरेदी केली असती. उधारीत तिने कधीच काहीच खरेदी केलेच नाही. 
  2. तोल मोल केलाच असता. कारण तो ग्राहकाचा अलिखित अधिकार आहे. ज्या दुकानदाराला तोलमोल केलेली चालत नाही तो दुकानदार कसला? त्याच्या कडून खरेदी नकोच करायला
  3. खते पारखून बघितली असती. वजन नीट आहे का? पॅकिंग योग्य आहे का? दर्जा कसा आहे?

तुम्ही म्हणाल पहिला व दुसरा मुद्दा ठीक आहे. तिसऱ्या मुद्द्यातील वजन व पॅकिंग पर्यत ठीक आहे पण दर्जा कसा ओळखणार? 

खतांच्या दर्जाची चाचणी फक्त प्रयोग शाळेतच शक्य असली तरी प्रयोगशाळे शिवाय इतर काही ढोबळ चाचण्या नक्की केल्या जावू शकतात. जसे नमुने खरेदी करून त्याचा प्रत्यक्ष प्रयोग करून निरीक्षण करणे. चांगल्या नामांकित कंपन्यांचेच खत खरेदी करणे, अधिकृत विक्रेत्या कडूनच खरेदी करणे ई.

मित्रहो, पाटील बायोटेक सर्व्हीसेस डॉट इन या वेबसाईटच्या माध्यमातून आपण आमची विविध दर्जेदार उत्पादने किफायतशीर किमतीत मिळवू शकतात. "ते कसे?" याबद्दल अधिक माहिती पुढे दिलेलीच आहे, त्यापूर्वी या वेबसाईटचा अजून काय उपयोग आहे हे माहिती करून घेवू. 

शेती हा जगातील सर्वात धडाकेबाज व्यवसाय आहे. या व्यवसायात जितका नफा आहे त्यापेक्षा अधिक नफा इतर कुठल्याही व्यवसायात नाही. असे असले तरी हा व्यवसाय अजिबात सोपा नाही. शेतीत नफा कमवणे सोपे नाही. उन-वारा-पाऊस-वादळ-गारपीट यांचा सामना करीत, असेल नसेल ते सारे भांडवल पणाला लावून, हाती आलेला हंगाम बाजारात पोहोचे पर्यंत मातीमोल ठरू शकतो. त्यामुळे या व्यवसायात जसे वैज्ञानिक, तांत्रिक ज्ञान असणे आवश्यक आहे तितकेच व्यवहारिकमानसिक बळ असणे आवश्यक आहे. पाटील बायोटेक सर्व्हीसेस डॉट इन हि वेबसाईट या प्रत्येक स्तरावर आपली मदत करते. 

सर्व माहिती मुक्तपणे उपलब्ध करून देण्यात आली आहे. वाचकांच्या सूचनांनुसार नवीन नवीन लेख वेळोवेळी प्रकाशित व प्रसारित करण्यात येतात. भविष्यात प्रसारित होणारी माहिती आपल्यापर्यत पोहोचावी म्हणून आपण आमच्या फेसबुक पेज ला लाईक करावे तसेच न्यूजलेटर देखील सबस्क्राइब करावे. "ब्लॉग" या मेनूवर क्लिक करून आपण या पूर्वी प्रकाशित झालेले लेख वाचू शकता. लक्षात ठेवा ज्ञानाची हि शिदोरी नियमित उघडून बघायला हवी. 

या शिवाय या वेबसाईटच्या माध्यमातून आपण जवळच्या कृषीकेंद्राचा पत्ता, पाटील बायोटेक तंत्रज्ञान, प्रतिनिधींचे फोन नंबर मिळवू शकता. "संपर्क" या मेनूवर क्लिक करून आपण अधिक माहिती मिळवावी.

पाटील बायोटेक सर्व्हीसेस डॉट इन या वेबसाईटच्या माध्यमातून आपण आमची विविध दर्जेदार उत्पादने किफायतशीर किमतीत कसे मिळवू शकता? 

 या वेबसाईटवर आमची उत्पादने दोन स्वरुपात उपलब्ध आहेत.

ऑफर स्वरूपातील उत्पादने आपण ऑनलाईन पेमेंट करून लगेच मागवू शकतात. पेमेंट करण्यासाठी आपण बँक डीपोझीट देखील करू शकता. आमच्या बहुतेक ऑफर आपल्याला ५० टक्क्या पर्यत सूट मिळवून देतात. इतर कुठलेही शुल्क (कर, पाठवण्याचा खर्च) आपणा कडून वसूल केले जात नाही. पेमेंट प्राप्त झाल्यावर दोन दिवसाच्या आत आम्ही ते उत्पादन कुरियरच्या ताब्यात देतो. महाराष्ट्र राज्याच्या काना कोपऱ्यात या वस्तू चार ते पाच दिवसात पोहोचत्या होतात. आमच्या उत्पादनांचा दर्जा जाणून घेण्यासाठी ऑफर स्वरूपातील उत्पादने खूप उपयुक्त आहेत. जसे फोलीअर कीट खरेदी केली तर त्यात सात खते येतात. एकाच वेळी सात खतांचा दर्जा तुम्ही पारखू शकता!  

ऑफर व्यतिरिक्त इतर सर्व उत्पादनांसाठी आपण अंदाजपत्रक (Quote) मागवू शकता. त्यासाठी आपल्याला हवे असलेले उत्पादन "Add to Quote" करावे. हवी असलेली सर्व उत्पादने "Add to Quote" केल्यावर "View Quote" करावे. हवी असलेली "Quantity" निश्चित करून आपले नाव, ई-मेल, मोबाईल व पत्ता टाकून "Submit Request" हे बटन दाबावे.  आम्ही लवकरच आपल्याला हव्या असलेल्या उत्पादनांचे अंदाजपत्रक आपणास ई-मेल ने पाठवू. तसे मोबाईल वर संपर्क करून कळवले देखील जाईल. 

आपली Quote Request प्राप्त झाल्यावर आम्ही सदर मागणीवर अभ्यास करतो. जसे, उत्पादन उपलब्ध आहे का? नसेल तर कसे उपलब्ध करून देता येईल? त्याच्या पॅकिंगला किती खर्च येईल? पाठवायला किती खर्च येईल?  ते किती किफायतशीर किमितीत आपण देवू शकतो? या आधारावर आम्ही आपणास अंदाज पत्रक पाठवतो. आपण याचे पेमेंट ऑनलाईन किंवा बँक डीपोझीट ने करू शकता. पेमेंट प्राप्त झाल्यावर पाच दिवसाच्या आत, शक्य तितक्या लवकर, हा माल ट्रान्सपोर्टच्या हवाली करून आपल्याला माहिती कळवली जाते. 

कृषीकेंद्र चालकांनी आमची उत्पादने मागवते वेळी पत्यात व्यावसाईक नावाचा स्पष्ट उल्लेख करावा व सोबत आपले व्यावसाईक डीटेल्स (जीएसटी नंबर, फर्टिलायझर व कीटकनाशक परवाना क्रमांक) देखील द्यावा जेणे करून आपल्याला त्या दृष्टीने सोर्स सर्टिफिकेट सहित बिल पाठवले जाईल. 

आमची उत्पादने पाठवते वेळी ते शक्य तितक्या जवळच्या गोडावून मधून किंवा डीलर मार्फत पाठवले जातात. अश्या वेळी ती उत्पादने दोन किंवा तीन टप्प्यात आपल्यापर्यत पोहोचतील.  

मित्रहो, "व्यवहार" हि सामाजिक जीवनातील सर्वात महत्वाची प्रक्रिया आहे. ती पारदर्शी, पथदर्शी व दूरदर्शी  असायला हवी. ऑनलाईनच्या माध्यमातून "उत्पादक" व "ग्राहक" हे शक्य तितक्या जवळ येत आहेत अश्या वेळी "व्यवहारा"ची हि त्रि-सूत्री अधिक मजबूत होणार आहे.तेव्हा आजच सुरवात करा ऑनलाईन खरेदी ला.