Call 9923974222 for dealership.

पपई लागवड तंत्रज्ञान (शेड्युल सहित)

पाटील बायोटेक तंत्रज्ञान पपईत फारच यशस्वी ठरते. तंत्रज्ञानाच्या वापरातून अनेक शेतकरी बांधवांनी रेकॉर्डब्रेक उत्पादन घेतले आहेत. पाटील बायोटेक चे सल्लागार या क्षेत्रात नियमित कार्यरत असतात. कार्यशाळा व प्रत्यक्ष शेतात भेट देवून शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करण्यात येते.

लागवडी ची वेळ: जून- जुलै, सप्टेबर- ऑक्टोबर आणि जाने -फेब्रु

 

------------------

फेसबुक व टेलेग्राम वरीलआमच्या सोशल गृप्सला जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा आणि वेळो वेळी प्रसारित होणारे लेख नियमित मिळवा.

------------------

पपई पिकाची मुळे नाजूक व उथळ असतात. यामुळे या पिकास उत्कृष्ट निचरा, तसेच भरपूर सेंद्रिय कर्ब असणारी जमीन आवश्‍यक असते व तुमच्याकडे अशी जमीन नसेल तर उंच गादीवाफा व ठिबक सिंचनाचा  अवलंबन करणे गरजेचे असते. महाराष्ट्रातील उष्ण व दमट हवामान पपई पिकास चांगले मानवते. 38 ते 45 अंश से. पर्यंत तापमान योग्य असते. ढगाळ, धुके, लांब कालावधीचा गारठा पपईस घातक ठरतो.  

फेब्रुवारीच्या शेवटी किंवा मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पपई ची रोपे शेतात लावली गेली पाहिज, हि वेळ चुकली तर निर्धारित लागवडीपेक्षा 30 टक्के रोपे नांगे भरण्यासाठी तयार ठेवावीत. 
 
उंच गादीवाफे रोपे लावण्यापूर्वी आठ ते दहा दिवस अगोदर तयार करावीत. यासाठी सर्वांत प्रथम जमिनीची चांगली मशागत करावी. जमिनीतील खालचा थर कडक झाला असल्यास जमिनीतील पाण्याचा चांगला निचरा होण्यासाठी खालचा कडक झालेला थर (खोली 60 ते 70 सें.मी.) फोडणे गरजेचे असते. हा थर फोडण्यासाठी ट्रॅक्‍टरला जोडता येणारा सबसॉयलर उपयुक्त आहे. 
 
त्यानंतर जमिनीची नांगरट व उभी-आडवी वखरटी करून घ्यावी. यासाठी रोटाव्हेटरचाही वापर करता येतो. यावेळी आपण पाटील बायोटेक तंत्रज्ञाना नुसार काही खते मिसळून टाकायची असतात.

खते मिसळल्यानंतर ट्रॅक्‍टरला उंच गादीवाफे बनविणारा रिजर जोडून उंच गादीवाफे तयार करून घ्यावेत. या गादीवाफ्याची उंची दीड फूट, तर रुंदी अडीच फूट असावी. असे गादीवाफे तयार झाल्यावर त्यावर ट्रॅक्‍टरला रोलर जोडून रोलर फिरवून घ्यावा. यामुळे उंच गादीवाफ्यात पोकळी राहणार नाही. पोकळी राहिल्यास उन्हाळ्यात पोकळीतून पपईच्या कोवळ्या रोपांच्या मुळांना गरम हवेची झळ पोचून रोपे दगावतात.

------------------

आपणास कोणती रोपे हवीत?

रोपवाटीकांची यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा

------------------

 

पपई पिकात पाण्याचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी ठिबक सिंचन पद्धत उपयुक्त आहे, तसेच उंच गादीवाफ्यावर पपईच्या रोपांची लागवड करत असल्यास ठिबक सिंचनाचाच पर्याय स्वीकारावा लागतो. गादीवाफा तयार झाल्यानंतर गादीवाफ्याच्या मध्य भागावर लॅटरलची मांडणी करावी. मातीचा उत्कृष्ट निचरा होणार असल्यामुळे दोन ड्रीपरमधील अंतर दीड फूट ठेवावे. लागवडीच्या आठ ते दहा दिवस अगोदर गादीवाफा तयार झाल्यावर रोज नियमित ठिबक संच सुरू ठेवून बेड पूर्णपणे ओला होईल असे पाहावे. यामुळे गादीवाफ्यात असणारी उष्णता पूर्णपणे निघून जाईल. सुरवातीला पोयटा माती किंवा शेणखतामुळे संभाव्य उगवून येणाऱ्या तणांचे रोपलागवडीअगोदर नियंत्रण करता येईल.


पपईच्या रोपांची लागवड झाल्यानंतर सुरवातीला रोपांना पाणी कमी लागते, पण पाण्याचा नियमित पुरवठा गरजेचा असतो. लागवडीपासून सुरवातीच्या एक महिन्याच्या कालावधीत प्रति दिन एक लिटर पाणी मिळेल इतकेच मोजके पाणी ठिबक संचाने द्यावे. त्यानंतर रोपे दोन महिन्यांची होईपर्यंत दोन लिटर पाणी द्यावे.

पपईच्या रोपांची लागवड 8 X 6 फुटाच्या अंतरावर केली पाहिजे. या पद्धतीने सरासरी 905 रोपे एक एकरात लावली जातात. हिवाळ्यात आठ फुटांच्या अंतरामुळे बागेत हवेशीरपणा राहतो, तसेच दुसऱ्या बाजूच्या सहा फुटांच्या अंतरामुळे उन्हाळ्यातील प्रखर सूर्यकिरणांपासून फळांचे काही प्रमाणात संरक्षण होते.

पपई व्यवस्थापनातील ९ महत्वाच्या टिप्स अश्या आहेत

 1. जुन्या पपईच्या बागांजवळ पपईची नवी लागवड करू नये.
 2. पुनर्लागवडीसाठी रोपे किमान 12 सें.मी. उंचीची सहा पानी, मजबूत दांडी असलेली निवडावीत.
 3. रोपांची लावणी शक्‍यतोवर दुपारी चारनंतर करावी.
 4. रोपे लावताना बुंध्याच्या चौफेर माती घट्ट दाबावी. मुळांच्या परिसरात पोकळी राहणार नाही, याची दक्षता घ्यावी.
 5. लागवडीनंतर लगेच रोपांना पाणी द्यावे.
 6. पपईचे खोड सुरवातीला बारीक राहून वाढ जास्त जाणवत असल्यास पाण्याचा थोडा ताण द्यावा किंवा क्‍लोरमेक्वॅट क्‍लोराईड चार मि. लि. प्रति 15 लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
 7. पपई पिकात फोरेटचा वापर टाळावा.
 8. उन्हाळ्यात लॅटरल तापत असल्याने त्याचा चटका लागून रोपे मरतात. त्यामुळे रोपांपासून लॅटरल किमान दहा सें.मी. दूर ठेवावीत.
 9. एकदा लॅटरल ठेवल्या नंतर सतत हलवू नये. लॅटरलची शेवटची टोके खुंट्यांना बांधून घ्यावीत

   

    


  पपई शेड्युल डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा

  75 comments

  • Nice information but i want to know spraying schedule to control diseases in papaya

   अशोक वाघ
  • पपई रोपे मिळतील का?

   Nikhil
  • मला पपईची लागवड करायची आहे एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केली तर चालेल का

   Mangesh Deshmukh
  • Papai pika saati margdarsahn paije 15 divas zale aahe papai laaun

   Auranganbad Kannad yete

   9833197043
  • papai cultivation & fertilition

   9420836002

  Leave a comment

  Name and Mobile number .
  .
  Message with Address, District & Pincode .

  Please note, comments must be approved before they are published