पपई-मैलाचा दगड फेसबुक लाइव मधील महत्वाचे मुद्दे

पाटील बायोटेकचे फेसबुक लाइव हा दर शनिवारी सा. ६ वाजता होणारा कार्यक्रम शेतकरी व कृषीकेंद्र धारकांमध्ये प्रचंड वेगाने लोकप्रिय झाला आहे. अचूक व शास्त्रशुद्ध मांडणी, अद्ययावत माहिती, वातावरणाचा वेध, बाजार भाव व व्यावहारिकदृष्ट्या फायदेशीर सल्ला, व्यक्तिगत शंका निरसन असे अनेक पैलू या कार्यक्रमात दिसून येतात.

"पपई-मैलाचा दगड" हे फेसबुक लाइव फेब्रुवारी २७, २०२१ ला शनिवारी सा. ६ वाजता आपले आवडते मार्गदर्शक श्री. अमोल पाटील यांनी घेतला. या कार्यक्रमाचा व्हिडीओ आपण आमच्या युट्युब चानल वर पाहू शकता.


या कार्यक्रमात सरांनी सांगितलेले महत्वाचे मुद्दे असे आहेत:

जातीची निवड: आईस बेरी, ग्रीन बेरी, रेड लेडी (तैवान ७८६) या तीन जाती बाजारात उपलब्ध असून ग्रीन बेरी व आईस बेरी या प्रजाती अतिशय गोड आहे पण फळाची टिकवण क्षमता कमी असल्याने जास्त दूर वाहतूक करणे कठीण आहे. बाजारपेठ जवळ असेल तर २५% ग्रीन/आईस बेरीची लागवड करा. रेड लेडी: या प्रजातीची टिकवण क्षमता उत्तम असून दूर पाठवण्यासाठी हि प्रजाती चांगली आहे. ७५ % रेड लेडी लावा.

पिकाचे पोषण उत्तम पद्धतीने करणे महत्वाचे आहे. हलक्या जमिनीत हे पिक नये. एकरी ८-१० टन पूर्ण पणे कुजलेले (खतास कोणतीही दुर्गंधी येता कामा नुये) शेणखत/सेंद्रिय खत/गांडूळ खत टाकावे. उभी आडवी नांगरणी करून खत एकसारखे पसरवावे.

लागवड पद्धत: प्रती एकर रोपाची संख्या हि उत्पादकतेची महत्वाची बाब आहे. ७ ते ८ X ६ फुट हे अंतर वापरल्यास एकरी ९०० रोपांची संख्या बसते. दोन समांतर ओळीत रोपे लावतांना एका ओळीतील दोन रोपांच्या मध्यावर बाजूच्या ओळीत एक रोप ठेवावे. झिक-झॅक पद्धत वापरल्याने दाटी होत नाही.

लागवडी 10-15 दिवस अगोदर बेड मध्ये द्यायची खते इथे क्लिक करून डाऊनलोड करा
लागवड करण्यापूर्वी दोन दिवस बेड चांगला भिजवून घ्यावा जेणे करून बेड थंड राहील व रोपे लावल्यावर त्यावर वाफ जाणार नाही.

रोपांच्या उपलब्धतेसाठी आमच्या वेबसाईटवर नर्सरीचे पत्ते दिले आहेत, त्यासाठी इथे क्लिक करा. ६ ते ८ इंच उंच रोपे घ्या त्यापेक्षा जास्त उंचीची रोपे घेवू नये. उंच रोपे घेत असाल तर त्याचा बुंधा जाड आहे याची खात्री करावी.

आळवणी शेड्यल: फळगळ होऊ नये, फळ गोड व वजनदार असावे, बागेने जास्तीत जास्त जगून वर्षाअखेर पर्यंत फळे द्यावी याद दृष्टीकोनातून आळवणी शेड्युल बनवले आहे. या शेड्युल मध्ये 10 व्या दिवसापासून २३० व्या दिवसापर्यंतच्या १८ आळवण्या देण्यात आल्या आहेत. हे शेड्युल रिसर्च पेपर व संशोधनावर आधारित फॉर्म्युला नुसार असून इथे क्लिक करून आपण हे शेड्युल डाऊनलोड करू शकता.

रोग व कीड व्यवस्थापन: व्हायरस हि मोठी समस्या आहे. यलो व्हेन मोझाइक, लीफ कर्ल, रिंगस्पॉट व्हायरस येतात. मिलीबग हि कीड येते. तसेच पावडरी मिल्ड्यू, डाऊनि मिल्ड्यू सरकोस्पोरा या बुरशी येतात. व्यवस्थापनासाठी फवारणी शेड्युलची अपडेट मिळवण्यासाठी इथे क्लिक करा

हे लेख अधिकाअधिक शेतकरी बांधवासोबत नक्की शेअर करा.

या माहिती संदर्भात आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण श्री. अमोल पाटील यांना व्हाटसअप वर प्रश्न विचारू शकता. त्याकरिता स्कीन वर दिसणाऱ्या बटनावर क्लिक करावे.