Call 9923974222 for dealership.

मल्चिंग केलेल्या पपई पिकात कलिंगडाची आंतरलागवड केल्यास पिकांवर व्हायरस येतो का?

इंदापूर येथील शेतकरी श्री.सदाशिव काळे यांनी "मल्चफिल्मची निवड व फायदा" या लेखाच्या कोमेंट सेक्शनमध्ये "मल्चिंग केलेल्या पपई पिकात कलिंगडाची आंतरलागवड केल्यास पिकांवर व्हायरस येतो का?" असा प्रश्न विचारला होता. या अनुषंगाने माहिती देत आहे.

पपईमेध्ये अनके प्रकारचे व्हायरस आढळून येतात. त्यापैकी "पपया रिंग स्पॉट व्हायरस" (prsv) मोठ्या प्रमाणात नुकसान करतो. दमट हवामान या व्हायरसच्या प्रसाराला मदत करते.रोगाची लक्षणे फळधारणा सुरुव्हायच्या वेळेसच दिसू लागतात. शेंड्याची वाढ खुंटते. पानाच्या शिरा पिवळ्या पडतात, कडा वळतात, फळांवर रिंगा उमटतात. लहान फळे वेडीवाकडी होतात. खोडावर पुरळ दिसते.

याचा प्रसार छाटणीसाठी वापरल्या जाणाऱ्या साधनाच्या माध्यमातून तसेच रसशोषक किडी (मावा)च्या माध्यमातून होत असतो. या व्हायरसच्या दोन प्रजाती (prsv-p; prsv-w) असून त्यापैकी एक प्रजाती (prsv-p) टरबूज, खरबूज, काकडी इत्यादी पिकात देखील प्रादुर्भाव करू शकते. एकूणच हि दोन पिके एकत्र/एकाच परिसरात घेतल्यावर पपया रिंग स्पॉट व्हायरसच्या (prsv-p) प्रादुर्भाव वाढून मोठे नुकसान होऊ शकते.

"पपया लीफ कर्ल व्हायरस" हा आपल्या भागातील दुसरा महत्वाचा व्हायरस आहे. पाने दुमडणे, शिरा जाड होणे, झाडाची वाढ खुंटणे, थोडी व वेडीवाकडी फळे अशी याची लक्षणे आहेत. याचा प्रसार पांढऱ्या माशीच्या माध्यमातून होत असतो.

सौजन्य


वर दिलेली दोघी व्हायरस एकाच वेळी प्रादुर्भाव करू शकतात व अश्या वेळी होणारे नुकसान प्रचंड असते.

दुषित झाडे मुळासहित काढून टाकणे, छाटणीच्या साहित्याचे उत्तम निर्जंतुकीकरण (5.25 टक्के सोडियम हायपोक्लोराईट चे द्रावण), रसशोषक किडींचे उत्तम नियंत्रण (चिकट सापळे, कीटकनाशक फवारणी), व्हायरस प्रतिकार करणाऱ्या प्रजातीच्या रोपांची निवड, पिकाचे संतुलित पोषण (अमृत गोल्ड, अमृत प्लस, मायक्रोडील) व रोगप्रतिकार शक्ती वर्धक (अरेना चोकलेट) उत्पादने वापरून पपईत व्हायरस नियंत्रणात ठेवता येतो. 

----------------------------

आपण पपईची रोपे बनवता का? किंवा
आपल्याला पपई ची रोपे हवीत का?
आपल्या शेतावर उत्पादित पपईच्या विक्रीसाठी तुम्हाला खरेदीदार हवा आहे का?
 
 पाटील बायोटेकच्या फार्म एक्चेंज सुविधेचा लाभ घ्या. फार्म एक्चेंज मध्ये  आपण आपला संपर्क देवू शकता.

----------------------------

तपकिरी-पिवळा मल्चिंग पेपर (पिवळा वरच्या बाजूने) वापरल्यास रसशोषक किडींचे नियंत्रण उत्तम होते कारण पिवळा रंग किडींना आकर्षित करतो व दुपारच्या वेळी या पेपरच्या चटक्याने कीड मारली जाते असा उल्लेख काही ठिकाणी आढळून येतो. हा प्रयोग कुणी केलेला असल्यास काय अनुभव आला आहे हे कोमेंट सेक्शन मध्ये नक्की नोंदवा.

 हा लेख व्हाटसअप वर फोरवर्ड करायला व फेसबुकवर शेअर करायला विसरू नका. प्रतिक्रिया देखील नोंदवा.

संदर्भ: विकिपीडिया, विविध शोधनिबंध 

2 comments

  • पपई लागवड बेडवर योग्य,का सरीमध्ये करावी

    शिवदास पाटील
  • पपई लागवड कधी करावी …आणि लागवडी साठी मध्यम जमिनीला दोन्ही रोपातील अंतर किती ठेवावे .

    उमेश उत्तमराव नादरे

Leave a comment

Name and Mobile number .
.
Message with Address, District & Pincode .

Please note, comments must be approved before they are published