छोटा शेतकरी - मोठी जबाबदारी

छोटा शेतकरी - मोठी जबाबदारी

जागतिक अर्थकारणात कृषी क्षेत्राचा अर्थातच शेतकऱ्याचा हिस्सा सर्वात महत्वाचा आहे. आर्थिकदृष्ट्या कार्यरत जनसंख्येच्या एक तृत्यांश जनसंख्या शेतीतून गुजराण करते. आशिया व आफ्रिका खंडातील करोडो शेतकरी, पशुपालक व आदिवासी जमिनीच्या अगदी छोट्या-छोट्या तुकड्यांवर काम करून आपल्यासाठी अन्न उपलब्ध करून देतात.

वाढती लोकसंख्या, पर्यावरणातील बदल  व लोप पावत चाललेले नैसर्गिक श्रोत यामुळे शेतकऱ्याची जबाबदारी आता पराकोटीची वाढते आहे. २०५० पर्यंत ९०० कोटी लोकांसाठी अन्न उपलब्ध करून देतांना त्याची पोषकता अबाधित ठेवायची आहे, भक्कम मिळकत मिळवायची आहे व पर्यावरणाला देखील पूरक ठरायचे आहे. 

जगातील शेतांचे वर्गीकरण (टक्के)

१० हेक्टर खालील १० हेक्टर वरील
 आशिया ८५ १७
आफ्रिका १० 
युरोप २७
अमेरिका ४६


जगातील ५७ कोटी शेतांजमिनींपैकी  ९० टक्के जमिनी छोट्या शेतकऱ्यांच्या आहेत. हे शेतकरी कौटुंबिक मालकिच्या शेतात स्वत: राबतात. जगातील ८० टक्के अन्न हेच छोटे छोटे शेतकरी पिकवतात

मित्रहो, या छोट्या शेतकऱ्यांची उत्पादकता महत्वाची आहे. हे छोटे शेतकरी आपल्या शेतीकडे अधिक काटेकोर पणे लक्ष ठेवू शकतात व आपल्या कमी क्षेत्रातून अधिक उत्पादकता निर्माण करू शकतात. अर्थात असे करण्यासाठी त्यांना नित्य नवीन तंत्रज्ञान अवगत असायला हवे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कमी जागेत, कमी वेळेत, कमी खर्चात व कमी कष्टात अधिक व दर्जेदार  उत्पादकतेकडे कल असायला हवा, मग पिक कोणतेही असो. 

तंत्रज्ञान म्हणजे काय?

  • मृदा संवर्धनासाठी मृदेचे नियमित निरीक्षण करून मशागत करते वेळी योग्य व दर्जेदार भू-सुधारकांचा वापर व्हावा
  • जल व्यवस्थापनातून योग्य वेळी योग्य पद्धतीने पाणी कसे द्यायचे, कसे वाचवायचे हे निश्चित केले जाऊन तशी व्यवस्था करावी
  • पिकाबदल, फळबाग-कुरण व्यवस्थापन व  पूरक पशुपालन या संबंधी योग्य निर्णय घेवून कृतीत उतरवावेत
  • नत्र-स्पुरद-पालाश या व्यतिरिक्त दुय्यम, सूक्ष्म व जैविक खतातून पिकासोबत मृदेचे देखील पोषण होईल याकडे लक्ष ठेवावे.
  • योग्य बीजांची निवड करण्यासाठी वेळोवेळी प्रयोग करावेत. पेरणीची योग्य वेळ साधावी
  • लागवडीची घनता, पिकव्यवस्थापन या सोबत पिक संरक्षण अचूक राहील हे निश्चित करावे. 
  • योग्य वेळी काढणी व काढणी पश्चात व्यवस्थापनातून जोखीम कमी करावी
  • सातत्याने नवीन बाजारपेठेचा अभ्यास करावा व विस्तृत नोंदी ठेवाव्यात

 जागतिक अर्थकारणात छोट्या शेतकऱ्याचे महत्व आहे पण त्यास आवश्यक तंत्रज्ञान पाठबळ मिळत नाही. हि मोठी अडचण आहे.

पाटील बायोटेक लागवड तंत्रज्ञान या ठिकाणी महत्वाचे कार्य करते. माहिती तंत्रज्ञानावर आधारित डेटा बेस च्या माध्यमातून "पाटील बायोटेक " छोट्या व माहितीतंत्रज्ञानाच्या दृष्टीकोनातून "निरक्षर"  अशा शेतकरी बांधवांना मदत करते.  हि सेवा १०० पेक्षा अधिक पिकांसाठी उपलब्ध असून त्यात फळ, धान्य, तेलबिया, फळभाज्या, पालेभाज्या व व्यापारी पिकांचा समावेश आहे.

 

पाटील बायोटेक तंत्रज्ञानाचा अर्ज भरण्यासाठी इथे क्लिक करा

Back to blog