ऑफर्स वर ऑफर

३००० रु च्या पुढील सर्व खरेदीवर १० टक्के सूट.

3000 ऐवजी भरा फक्त २७०० रु '

४००० ऐवजी भरा फक्त ३६०० रु

पाटील बायोटेक च्या व्हायरल पोष्ट कोणत्या?

पाटील बायोटेक च्या व्हायरल पोष्ट कोणत्या?

पाटील बायोटेक प्रा. ली. च्या वतीने या पेजवर आल्याबद्दल मी आपला आभारी आहे. मित्रहो, कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत पोहोचणे व त्यांना उपयोगी होईल अशी माहिती "मोजक्या शब्दात पण प्रभावी पद्धतीने पोहोचवणे"  हे आमचे एक मोठे उद्दिष्ट आहे. पाटील बायोटेक सर्व्हिसेस डॉट इन या वेबसाईट च्या माध्यमातून व फेसबुक/पाटीलबायोटेक या पेज च्या माध्यमातून आम्ही ते सातत्याने करीत आहोत व करीत राहू.

आमच्या अनेक पोष्ट व्हायरल होतात कारण त्यात दिलेली माहिती शेतकरी बांधवांसाठी उपयोगाची असते व इतरांसोबत शेअर करावी असे शेतकरी बांधवांना मनापासून वाटते. अशाच काही पोस्ट बद्दल माहिती इथे देत आहे.  

 २० सप्टेंबर २०१७ ला सायंकाळी ६ वाजेला हा फोटो शेअर केला. माउली या कपाशीच्या वाणाचा फोटो अगदी बोलका आहे. शेतकरी बांधवाने संतुलित खत मात्रेच्या माध्यमातून कपाशी चे इतके सुंदर पोषण केले आहे कि प्रत्येक झाड बोंडानी बहरून गेले आहे. "१०० दिवसात १०० बोंडे" हे आमचे घोषवाक्य इथे खुजे झाले कारण प्रत्येक झाडावर १५० पेक्षा अधिक बोंडे डवरून आलीत.   

पाटील बायोटेक तंत्रज्ञानाचा काय आधार आहे? असा प्रश्न विचारला जातो. देवासमोर नुसते हात जोडून उभे राहिल्याने काही प्राप्त होत नाही. तुमच्या मनात श्रद्धा असली, सुविचार असले व विचारांना जोड देणारी कृती तुम्ही करत असलात तर हात न जोडता देखील "तो" भरभरून देतो. हा अनुभव आहे. शेतीतही तसेच आहे. "पेरले ते उगवते" हे सत्य आहे पण जे संवर्धीत केले ते "बहरते-डवरते". हे सर्वात मोठे सत्य आहे. "पाटील बायोटेक तंत्रज्ञान" याच तत्वावर बनवलेले आहे. उभ्या पिकाची खरी गरज काय? त्याला नेमके काय हवे आहे हे जो शेतकरी समजून घेतो तो "भरगोस" उत्पन्न घेतो. आमची पुढची पोष्ट शेकडो वेळा नव्याने शेअर केली जाते व प्रत्येक वेळी ती "व्हायरल होतेच". कारण काय ते तुम्हीच शोधा!
पपई हे पिक "भरगोस आर्थिक उत्पादन" देणारे झाले आहे. पाटील बायोटेक तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक शेतकरी बांधवांनी रग्गड हंगाम घेतला आहे. त्यावर आलेली हि पोष्ट अल्प काळात १५ वेळा शेअर झाली व त्यावर शेकडो ने लाईक जमा झाल्या. 
हे फळ वर्षभर उपलब्ध असते. चविष्ट व पाचक गुणधर्म असल्याने यास उत्तम मागणी आहे. शिवाय याच्या चिकापासून "औषध" बनते, कैंडी बनते, पानाचा रस गुणकारी आहे. पोटभर खावून देखील कुपोषित रहाणाऱ्या आजच्या जनतेसाठी पपई हे फळ वरदान आहे. 
नागपूर-मुंबई हायवे पासून सव्वा किलोमीटर आत दोन एकरावर पपई ची लागवड केल्यावर आमच्या एका शेतकरी बांधवाच्या शेतात इतकि अफाट फळे लागली कि "एव्हढा माल कुठे खपणार" हा प्रश्न त्याच्यासमोर उभा ठाकला. आमच्या प्रतिनिधीने त्याचा प्रश्न चुटकीसरशी सोडवला. हायवे वर "पपईमिल्कशेक" चे दुकान लावून रस्त्याच्या दुतर्फा दोन किलोमीटर पर्यत "पपईमिल्कशेक" चे बोर्ड लावले. अनेक वाहने थांबू लागली. ग्राहकाच्या चेहऱ्यावरील समाधानाने "आमच्या शेतकरी बांधवाला नवी दिशा दाखवली". मोठी रोजगार निर्मिती झाली, दूर दूर पळणारे सर्व होतकरू नातेवाइक आत्ता यांच्या मदतीला धावून आले आहेत, सर्वांच्या हाताला काम मिळाले आहे.
पुन्हा भेटू पुढील भागात तो पर्यंत तुम्ही आमची  हि पोष्ट फेसबुकवर शेअर करायला विसरू नका, हि पोष्ट व्हायरल व्हायला हवी ना!
क्रमश:
शेअर प्लीज

मका पिकाचे खत व फवारणी व्यवस्थापन
मका पिकाचे खत व फवारणी व्यवस्थापन
 मक्याची लागवड वर्षातून तीन वेळा करता येते. पावसाळी लागवड मध्य जून ते मध्य जुलै, रब्बी लागवड मध्य...
Read More
टरबुज खरबुज लागवडीची पुर्वतयारी
टरबुज खरबुज लागवडीची पुर्वतयारी
शेतकरी मित्रहो, सदर लेख "पाटलांचा फळा" या आमच्या नियमित प्रसारित होणाऱ्या तात्कालिक युट्युब व्हिड...
Read More
हंगामानुसार कांदा बीजोत्पादन वेळापत्रक
हंगामानुसार कांदा बीजोत्पादन वेळापत्रक
खरिपातील जातींचे बीजोत्पादन : खरिपातील जातींचे कांदे ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात तयार होतात. या का...
Read More
पपई-मैलाचा दगड फेसबुक लाइव मधील महत्वाचे मुद्दे
पपई-मैलाचा दगड फेसबुक लाइव मधील महत्वाचे मुद्दे
पाटील बायोटेकचे फेसबुक लाइव हा दर शनिवारी सा. ६ वाजता होणारा कार्यक्रम शेतकरी व कृषीकेंद्र धारकां...
Read More
हळदीवरील करप्याचे नियंत्रण
हळदीवरील करप्याचे नियंत्रण
शेतकरी मित्रहो, सदर लेख "पाटलांचा फळा" या आमच्या नियमित प्रसारित होणाऱ्या तात्कालिक युट्युब व्हिड...
Read More
रब्बी मका घेणाऱ्या शेतकऱ्यांना सावधानतेचा इशारा!
रब्बी मका घेणाऱ्या शेतकऱ्यांना सावधानतेचा इशारा!
शेतकरी मित्रहो, सदर लेख "पाटलांचा फळा" या आमच्या नियमित प्रसारित होणाऱ्या तात्कालिक युट्युब व्हिड...
Read More
हरभर्‍याचा भरगोस फुलोरा
हरभर्‍याचा भरगोस फुलोरा
शेतकरी मित्रहो, सदर ब्लॉग पाटलांचा फळा या आमच्या नियमित युट्युब व्हिडीओ वर आधारित आहे. आमचे व्हिड...
Read More
रानडुकराच्या जाचातून मुक्ती
रानडुकराच्या जाचातून मुक्ती
हजारो बागायतदार शेतकरी रानडुकरांच्या भितीने धास्तावलेले असतात. चांगल्या हाती येणाऱ्या पिकात रानडु...
Read More
Back to blog

युट्यूब