कीटकनाशकांवर बंदी व शेतकऱ्याचा संकल्प

कीटकनाशकांवर बंदी व शेतकऱ्याचा संकल्प

बेनोमील, कार्बारील,  फेन्थिआॅन, मिथिल पॅराथिआॅन,  ट्रायडेमॉर्फ,  ट्रायफ्लुरॅलीन, अलाक्लोर,  डायक्लोरव्हॉस, फोरेट, ट्रायझोफॉस, डायझिनॉन, फेनारीमोल, लिन्युरॉन, मिथॉक्सी इथिल मर्क्युरी क्लोराईड, सोडियम सायनाईड, थायोमेटॉन, फॉस्फामिडॉन, ट्रायक्लोरफॅन

केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या निर्णयानुसार वरील १८ रसायनांवर येत्या तीन वर्षात टप्या-टप्याने बंदी घालण्यात येते आहे. त्यामुळे आता प्रत्येक शेतकऱ्यास नविन औषधांचा अभ्यास करून लागवड पद्ध्त्तीत पद्धतीत योग्य परिवर्तन आणावे लागणार आहे. या अठरा रसायनांत कीटकनाशक, बुरशीनाशक व तणनाशकांचा समावेश असल्याने प्रत्येक पिकाच्या संपूर्ण लागवडपद्धतीत मोठे बदल होतील हे निश्चित आहे. तीन वर्ष हा मोठा वेळ असल्याने हे शक्य देखील आहे. तीन वर्षाच्या या कालावधीत रासायनिक औषधी निर्माण करणाऱ्या कंपन्यांना त्यांच्या उद्दिष्टात व कार्यप्रणालीत बदल करायला वेळ मीळेल तसेच बदल शेतकऱ्यास देखील करायचे आहे.  

या बंदीमुळे मानव, पशुपक्षी, मधमाश्यां व मित्रकीटक यांच्या आरोग्य सुरक्षिततेला प्राधान्य देण्याचे मुख्य उद्दिष्ट मंत्रालया समोर आहे. शेतकरी बांधवास देखील स्वत:ला "पेस्टीसाइड ट्रेड मिल" मधून बाहेर यायचे उद्दिष्ट स्वत: समोर ठेवायचे आहे.

 "पेस्टीसाइड ट्रेड मिल" आहे तरी काय?

आपले उत्पादन ग्राहकाने जास्तीत जास्त वापरावे व आपल्याला जास्तीत जास्त नफा व्हावा असे कोणत्या उत्पादकास वाटणार नाही? पण पुन्हा पुन्हा तेच एक रसायन वापरल्याने कीटक, बुरशी, जीवाणू व तण यात त्या रसायनाला सहन करायची ताकद निर्माण होते. शेतकरी जेव्हा तेच तेच रसायन अधिकाअधिक प्रमाणात वापरायला सुरुवात करतो तेव्हा त्याचे सर्व बाजूने नुकसान होण्यास सुरुवात होते.

  • कीड,रोग, तण  नियंत्रणात येत नाही त्यामुळे उत्पादन कमी होते
  • परिसरात रसायनाचे प्रमाण वाढल्याने मधमाश्या व शिकारी कीटकांची संख्या कमी होते 
  • पर्यावरणाचा दूरगामी ऱ्हास व्हायचा वेग वाढतो
  • रसायनांच्या खरेदीत निष्कारण खर्च झाल्याने आर्थिक प्रवाह रखडतो

 कीटकनाशकावरील बंदीचे औचित्य साधून शेतकऱ्याने स्वत:ची  "पेस्टीसाइड ट्रेड मिल" मधून सुटका करून घ्यायचा संकल्प करायलाच हवा.  खरेतर जो पर्यंत आपण स्वत:ची मानसिकता बदलत नाही तोपर्यंत हे शक्य होणार नाही. पाटील बायोटेक या परिवर्तनात सदैव आपल्यासोबत आहे. स्वत:चा बचाव कसा करायचा हे आपण पुढील भागत पाहू. आपण आमचा ब्लोग नित्य-नियमित वाचवा, प्रतिक्रिया देखील द्याव्यात हि विनंती.

क्रमशः

 

Back to blog