काटेकोर कीडनियंत्रणासाठी मारा ज्ञानगंगेत डुबकी! (भाग १ला)

काटेकोर कीडनियंत्रणासाठी मारा ज्ञानगंगेत डुबकी! (भाग १ला)

आजकाल अन्न म्हटले कि लोकांना कीटकनाशक अंश आठवतो. अन्ना सोबत आपल्या पोटात कीटकनाशके गेली तर आपल्याला कर्करोग होईल याची त्यांना भीती वाटते. मग ते ओर्गानिक फूडच्या शोधात नको तितका खर्च करतात! कर्करोगाची भीती खरी असली तरी अन्न म्हणजे कीटकनाशकाचा अंश हा विचार सुज्ञ मनाला पटणारा नाही. 

सामान्य जनतेच्या मनातील "या" भीतीचे खरे मूळ कीटकनाशकांच्या बाबतीत "शेतकरी बांधवांचे अज्ञान, उत्पादक व वितरकांची काळाबाजारी, शासनातील लाचखोरी व कायद्यातील पळवाटा" यात लपलेले आहे. आपल्या हातात काही गोष्टी नक्की आहेत. आपण कीटकनाशकाबद्दल चांगले ज्ञान मिळवावे, काटेकोर पद्धतीने खरेदी करावी, जबाबदारीने साठवण व उपयोग करावा. असे केल्याने आपला कीटकनाशकावरील खर्च तर कमी होईलच शिवाय उत्तम कीडनियंत्रण होऊन उत्पन्न वाढेल व आपल्या उत्पादनात कीटकनाशक अंश देखील शिल्लक रहाणार नाही. 

आजच्या पहिल्या भागात माहिती घेवू काही निवडक कीटकनाशकांची. त्यांची व्यापारी नावे, शिफारशी इ. पुढे जाण्याअगोदर प्रत्येक शेतकरी बांधवाने एक गोष्ट लक्षात घ्यावी. योग्य अन्नद्रव्य व्यवस्थापनातून आपण पिकाची कीड-रोग प्रतिकारशक्ती चांगली ठेवू शकता. यासाठी पाटील बायोटेक तंत्रज्ञान आपली १०० टक्के मदत करते. या लेखाच्या खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपण अधिक माहिती मिळवू शकता. 

इमामेक्टीन बेन्झोएट ५ एसजी हे कीटकनाशक "प्रोक्लेम, डेरिम, ओेलेक्स, हिलक्लेम, तत्काळ, सफारी" या व्यापारी नावांनी कृषीकेंद्रात उपलब्ध आहेत. आता एमेझोन वर देखील हे कीटकनाशक उपलब्ध असून खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपण ते घरपोच मागवू शकता.सुरवातीला प्रायोगिक तत्वावर अशी छोटी खरेदी करून अनुभव घ्यावा.

 • कापूस पिकातील बोंडअळी नियंत्रणासाठी ६ ग्राम प्रती १५ लिटर, वेचणीच्या १० दिवस अगोदर फवारणी बंद करावी
 • भेंडी पिकातील फळ व खोड पोखरणारी कीड नियंत्रणासाठी ५ ग्राम प्रती १५ लिटर, तोडणीच्या ५ दिवस अगोदर फवारणी बंद करावी
 • कोबीतील चौकोनि ठिपक्याचा पतंग नियंत्रणासाठी ५-६ ग्राम प्रती १५ लिटर, काढणीच्या ३ दिवस अगोदर फवारणी बंद करावी
 • मिरचीतील फळपोखरणारी अळी, फुलकिडे व कोळी नियंत्रणासाठी ५ ग्राम प्रती १५ लिटर, तोडणीच्या ५ दिवस अगोदर फवारणी बंद करावी
 • वांग्यातील फळ व खोड किडा नियंत्रणासाठी ५ ग्राम प्रती १५ लिटर, तोडणीच्या ३ दिवस अगोदर फवारणी बंद करावी
 • तुर व हरभऱ्यातील शेंगा पोख्ररणारी अळी नियंत्रणासाठी ४-६ ग्राम प्रती १५ लिटर, तोडणीच्या १४ दिवस अगोदर फवारणी बंद करावी
 • द्रक्षातील फुलकिडे नियंत्रणासाठी ३-६ ग्राम प्रती १५ लिटर, तोडणीच्या ५ दिवस अगोदर फवारणी बंद करावी

शिफारशी व्यतिरिक्त उपयोग करणे टाळावे.

 

थायमेथोक्झाम २५ % डब्लू जी

थायमेथोक्झाम हे, नियोनिकोटीनोइड प्रकारचे, एक आंतरप्रवाही कीटकनाशक आहे. विविध प्रकारच्या अनेक किडीवर त्याचा परिणाम होतो त्यामुळे ते व्यापक गटात मोडते. फवारणी नंतर हे लगेच पिकात शोषले जाते. पिकाच्या सर्व भागात पसरते. जेव्हा कीड पिकाचे शोषण करते तेव्हा ते किडीत पोहोचते. स्पर्श, श्वास व पोटावाटे हे कीटकनाशक किडीच्या शरीरात दाखल होते. तेथे ते संवेदना वहनात अडथळे आणते ज्यामुळे किडीस लखवा होतो. 

उत्पादक कंपनीच्या दाव्यानुसार थायमेथोक्झाममुळे पिकाच्या "जोशा"त वाढ होते. थायमेथोक्झाममुळे काही विशीष्ट क्रियाशील प्रथिनाची निर्मिती वाढते ज्यामुळे पिकाची तणाव प्रतिकारशक्ती वाढते. फवारणी केलेली पिके पाण्याचा ताण, उष्णता, मृदेची क्षारता, सामू, किडीमुळे होणाऱ्या जखमा, वारा, गारपीट, विषाणूचा प्रभाव इतक्या साऱ्या अडचणींना तोंड देण्यास सक्षम बनतात.

हे कीटकनाशक ॲक्टरा, ॲरो, क्लिक, स्लेअर, रिनोवा या नावांनी कृषीकेंद्रात उपलब्ध आहे.  एमेझोनवर देखील हे कीटकनाशक उपलब्ध असून घरपोच मिळवले जावू शकते.

आपल्या सुविधेसाठी इथे लिंक देता आहे

 

  • भातातील खोडकीड, गादमाशी (gall midge), पाने दुमडणारी कीड, पांढरे/तपकिरी/हिरवे तुडतूडे, व फुलकिडे नियंत्रणासाठी २-३ ग्राम प्रती १५ लिटर या दराने फवारावे. शेवटची १४ दिवस वापर करू नये
  • कापसातील तुडतूडे, फुलकिडे, मावा नियंत्रणासाठी २-३ ग्राम प्रती १५ लिटर या दराने फवारावे. शेवटची २१ दिवस वापर करू नये
  • कापसातील पांढरी माशी नियंत्रणासाठी ४-६ ग्राम प्रती १५ लिटर या दराने फवारावे. शेवटची २१ दिवस वापर करू नये
  • भेंडीतील तुडतूडे, फुलकिडे, पांढरी माशी नियंत्रणासाठी १.५-३ ग्राम प्रती १५ लिटर या दराने फवारावे. शेवटची ५ दिवस वापर करू नये
  • आंब्यातील तुडतूडे नियंत्रणासाठी 1.5 ग्राम प्रती १५ लिटर या दराने फवारावे. काढणीच्या ३० दिवस अगोदर पासून वापर प्रतिबंधित आहे
  • गव्हातील मावा नियंत्रणासाठी 1.5 ग्राम प्रती १५ लिटर या दराने फवारावे शेवटची २१ दिवस वापर करू नये
 • मोहरीतील मावा नियंत्रणासाठी 1.5-३.० ग्राम प्रती १५ लिटर या दराने फवारावे शेवटची २१ दिवस वापर करू नये
 • टमाटे व वांग्यातील पांढरी माशी नियंत्रणासाठी ३ ग्राम प्रती १५ लिटर या दराने फवारावे तोडणीच्या ५ दिवस अगोदर फवारणी थांबवावी
 • बटाट्यातील मावा नियंत्रणासाठी ३ ग्राम प्रती १५ लिटर या दराने फवारावे. आळवणी किंव ठिबकने द्यायचे असल्यास ८०-८५ ग्राम २०० ते २५० लिटर पाण्यात मिसळावे. शेवटचे ७७ दिवस वापरास प्रतिबंध आहे .
 • लिंबूतील सायला (psylla) हि कीड नियंत्रण करण्यासाठी १.५ ग्राम प्रती १५ लिटर दराने फवारणी करावी. तोडणीच्या २० दिवस अगोदर फवारणी बंद करावी.

खाली स्क्रोल करून शेतीविषयक आमचे विविध लेख नक्की वाचा. आपण आमची उत्पादने देखील ऑनलाईन खरेदी करू शकता.

थायमेथोक्झाम हे कीटकनाशक वर दिलेल्या माहितीनुसार वापरायचे आहे. बाजारातील काही पॅकिंगवर हुमणीनियंत्रणासाठी याचा वापर करावा असे चित्राच्या माध्यमातून सुचवलेले दिसते. केंद्रीय कीटकनाशक बोर्डाने मात्र अशी शिफारस कोठेही केलेली नाही. त्यामुळे दिशाभूल केली जाते आहे असे स्पष्ट आहे. मित्रहो, शेतातील हुमण्या गोळा करून त्यावर या कीटकनाशकाची फवारणी केली तर कदाचित त्या मरतीलहि. पण म्हणून हे औषध शेतात लागू होईल असे सांगता येत नाही. विधायक पद्धतीने एखाद्या उत्पादकास तसा दावा करायचा असल्यास त्याला त्याचे शास्त्रीय पुरावे केंद्रीय कीटकनाशक बोर्डास द्यावे लागतील. पुराव्यातील तथ्यांचा विचार करून बोर्ड यास परवानगी देईल. तसे करते वेळी बोर्ड याच्या दूरगामी परिणामांचा देखील विचार करेल.तूर्तास जोपर्यंत असे होत नाही तो पर्यंत हुमणी नियंत्रणासाठी हे कीटकनाशक वापरू नये.

  

विविध पिकांसाठी पाटील बायोटेक तंत्रज्ञान उपलब्ध आहे.

तंत्रज्ञान म्हणजे काय हे जाणून घेण्यसाठी

इथे क्लिक करा.

Back to blog