निसर्गाच्या रचनेतून कीटनियंत्रण
आपल्या पंचइंद्रियापैकी “गंधग्रहण क्षमता” अतिशय विस्मयकारक आहे. मंदिरातील अगरबत्ती, स्नानगृहातील साबण, शृंगारातील सुगंधी तेल-पावडर, बगलेत व कपड्यावर फवारण्याचा सुगंध या पासून प्रसन्नता, एकाग्रता, आकर्षण व चंचलता असे विविध भाव निर्माण होतात!
निसर्गाने गंधाचा पुरेपूर उपयोग केलेला दिसतो. धोक्याच्या ठिकाणी दर्पनिर्मिती होते तर चांगल्या ठिकाणी सुगंध निर्माण होतो. गरमगरम मसाले भाजीच्या वासाने भूक वाढते तर अन्नखराब झाले असेल तर त्यात भूक कमी करणारा व किळस आणणारा वास यायला लागतो.
परागीभवन व्हावे म्हणून फुले रंग व मधुरसासोबत गंध निर्मिती करतात त्यामुळे फुलपाखरू आकर्षित होऊन परागीभवन घडून येते.
निसर्गाच्या प्रगतीमध्ये प्रजनन हि प्रक्रिया सर्वात महत्वाची आहे. स्टारफिश सारख्या समुद्री जीवाचे तुकडे झाले तर प्रत्येक तुकडा वाढत जावून नवा स्टारफिश तयार होतो. अनके वनस्पती अश्या आहेत कि त्यांची फांदी मातीत खोचली तर ती वाढू लागते. पण हे सर्वत्र दिसत नाही. निसर्गाने लैंगिक प्रजननाची पद्धत विकसित केली. असे केल्याने उत्क्रांती होत वैशिठ्यपूर्ण जीव निर्माण झाले.
आजही निरीक्षण केल्यास आपल्या लक्षात येईल कि मनुष्य प्रजातीत जेव्हा दूरवरच्या प्रदेशातील व वेगवेगळ्या संस्कृतीतील दोन व्यक्तीत लग्न होते तेव्हा जन्माला येणाऱ्या अपत्यात श्रेष्ठ (शारीरिक, मानसिक व बौद्धिक दृष्ट्या) अपत्यांची संख्या जास्त असते. याउलट एका छोट्या समूहात, जवळपासच्या नात्यात लग्न होतात तेव्हा जन्माला येणाऱ्या अपत्यात श्रेष्ठ (शारीरिक, मानसिक व बौद्धिक दृष्ट्या) अपत्यांची संख्या कमी असते. लैंगिक पद्धतीने होणारे प्रजनन अलैंगिक पद्धतीने होणाऱ्या प्रजननापेक्षा कितीतरी जास्त प्रभाव शाली असते. म्हणूनच निसर्गाने लैंगिक पद्धतीच्या प्रजननाला यशस्वी करण्यासाठी अनेक रचना केलेल्या दिसतात. सिंहाची आयाळ, सुगरणीचा खोपा, मोराचा पिसारा, स्त्रियांचे सोंदर्य, पुरुषाचा रांगडेपणा अश्या अनेक रचना आपल्या सहज लक्षात येतात. निसर्ग हा सर्वश्रेष्ठ जादुगारच! वर सांगितल्या प्रमाणे निसर्गाने वास-सुगंध-दर्प यांचा वापर जसा विविध पद्धतीने केला आहे तसा तो लैंगिक प्रजननातदेखील केलेलाच आहे, यालाच कामगंध असे म्हणतात. अनेक रचनांपैकी "कामगंध" हि एक उत्कृष्ठ नैसर्गिक रचना आहे.
कस्तुरीमृग कळपात रहात नाहीत, अन्नासाठी विस्तृत क्षेत्रात एकएकटे भटकत रहातात. दूरवर व एकांतात फिरणाऱ्या कस्तुरी मृगात "लैंगिक संबंध" कसा येणार? निसर्गाने याठिकाणी कामगंधाचा उपयोग केला. निसर्गाने नरास एका उत्कट सुगंधाची देणगी दिली. कामप्रक्रियेसाठी तो उद्युक्त झाला कि त्याच्या नाभीतून एक सुगंध चौफेर पसरू लागतो. हा सुगंध ३-४ किमी अंतरावर पोहोचतो! मादी या वासाने आकर्षित होते व निसर्गाला अभिप्रेत असलेले लैंगिक प्रजनन पूर्ण होते. दुर्दैवाने हा गंध "माणसाला पण येतो, आवडतो. या सुगंधाचा व्यापार केला जावू शकतो. त्यामुळे कस्तूरीमृगाची शिकार होते. या सुगंधामुळेच आता कस्तुरीमृगाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे!
नाग डूक धरतो असे आपल्याकडे मानले जाते. अनेकांना याचा अनुभव येतो. यास कारण देखील “कामगंधच” असतो. नागीण जेव्हा माजावर येते तेव्हा ती एका पेक्षा अधिक नरांशी संबध ठेवते. यासाठी ती कामगंध सोडत फिरते. नेमकी ती याच वेळी मारली गेली तर तिच्या कामगंधाचा मागोवा घेत नर तिथे येतात. हा वास आपल्याला येत नाही, त्यामुळे नाग डूक धरतो असा गैरसमज निर्माण झाला आहे. किंगकोब्राच्या अभ्यासात मादीच्या शोधात नर एकाच आठवड्यात शेकडो किलोमीटर अंतर पार करतो असे दिसून आले आहे.
कामगंधाचा वापर कीटकवर्गात सर्वात मोठ्या प्रमाणात अढळतो. प्रत्येक प्रजातीचे कीटक विशीष्ट प्रकारचा कामगंध सोडतात त्यामुळे त्याच प्रजातीचे कीटक आकर्षित होतात व मिलन घंडून येते. वैज्ञानिकांनी याचा अभ्यास करून कामगंध सापळ्यांची निर्मिती केलेली आहे. हे कामगंध सापळे कीटकंच्या अभ्यासात व नियंत्रणात मोठ्या प्रमाणात वापरले जावू लागले आहेत. यांच्या वापराने कीटकनियंत्रणाचा खर्च कमी होतो, मित्र कीटक मारले जात नाहीत, विषारी कीटकनाशके वापरायची गरज रहात नाही, फवारणी च्या मजुरीत बचत होते, पर्यावरणाचा ऱ्हास टळतो.
फळमाशीच्या नियंत्रणासाठी मक्षिकारी हा कामगंध सापळा अतिशय उपयोगी ठरतो. याचा उपयोग आंबा, पेरू, काकडी, गिलके, दोडके, कारले, टरबूज, खरबूज, दुधीभोपळा, भोपळा, गंगाफळ याच्या शेतात करतात. पिक फुलावर आले कि मक्षिकारी चे ६ ते ८ कामगंध सापळे शेतात लावावे. या सापळ्यात नर येवून मरतात. मादेस मिलनासाठी नर न मिळाल्यामुळे ती प्रजनन करू शकत नाही. आमची हि जाहिरात आपल्याला अजून चांगली माहिती देते.
आमचा हा व्हिडीओ आपल्याला मक्षिकारी चे रिझल्ट कसे आहेत हे सांगतो.
गेल्या काही वर्षात कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव पुन्हा दिसून येवू लागला आहे. पर्यावरणातील बदल, क्षेत्रातील कापूस पिकाचे प्रमाण जास्त असणे, पुन्हा पुन्हा कापूसच लावणे, रेफ्युजीचा वापर न करणे यातून बोंडअळी मधील बी.टी. जनुकास प्रतिकारक्षम प्रजाती वाढीस लागली. बोंडअळी चा प्रादुर्भाव झाल्यावर प्रत्यक्ष नुकसानीचा अंदाज यायला वेळ लागतो. अनेक शेतकरी बांधव योग्य निरीक्षण घेण्यात कमी पडतात त्यामुळे अळी चे चांगले प्रजनन होते व कीड नियंत्रणाबाहेर जावून उत्पादनात गंभीर घट होते. निरीक्षण व नियंत्रण सोपे जावे या हेतूने पाटील बायोटेक ने पिंक्या हा कामगंध सापळा बाजारात आणला आहे. एकरी कमीत कमी १० सापळे लावावेत. जर सापळ्याच्या पिशवीत दिवसाकाठी ४ ते ५ पतंग येवून अडकले तर लागलीच फवारणी चे नियोजन करावे.
------------------------------------
ओर्गेनिक फार्मिंगसाठी आमचे मार्गदर्शन व उत्पादने मिळवण्यासाठी
इथे क्लिक करा
-----------------------------------------


मित्रहो हा लेख शेअर करायला विसरू नका!