तुरीची रोपवाटिका बनवतात का?

परतीचा पाउस झाला नाही तर तुरीचा उतारा चांगला बसत नाही त्यामुळे तूर शक्य तितक्या अगोदर लावलेली बरी. तसे करण्यासाठी उन्हाळ्यात तुरीची रोपे बनवून ठेवली तर पावसावर महिनाभर वाढ झालेल्या रोपांची पुनर्लागवड करता येते. पिक लवकर हाती लागते व परतीचा पाउस नाही झाला तरी उताऱ्यावर परिणाम होत नाही.

३ इंच रुंदी व ६ इंच उंचीच्या १०० गेज च्या प्लास्टिक च्या थैलीला खाली ३-४ छिद्र पाडावीत. चांगले कुजलेले शेणखत व माती १:१ प्रमाणात एकत्र करून या थैल्यात भरावी व २ इंच खोल बी पेरावे. हि रोपे महिनाभराची झाली कि पुनर्लागवड केली जावू शकते.

या विषयी अधिक माहितीसाठी इथे क्लिक करून फॉर्म भरा.