येत्या हंगामात कापूस लागवड करणार का?

येत्या हंगामात कापूस लागवड करणार का?

अनेक शेतकरी बांधवांनी आतापासूनच येत्या हंगामात कापूस लागवड करण्याचा मानस केला आहे. त्या अनुशंघाने अनेक शेतकरी बांधवांनी या पिकातील पाटील बायोटेक तंत्रज्ञानाबद्दल चौकशी सुरु केली आहे. पाटील बायोटेक तंत्रज्ञान वापरल्याने कपाशीच्या उत्पादनात भरीव वाढ मिळते व चांगला नफा हाती लागतो. जे शेतकरी बांधव या तंत्राचा उपयोग काटेकोर पद्धतीने करतात त्यांना नेहमीच फायदा झाला आहे व या पुढेही होत राहील. जर आपण या पूर्वी तंत्रज्ञानाच वापर केला नसेल तर या लेखाच्या खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून पाटील बायोटेक तंत्रज्ञाना बद्दल अधिक माहिती घ्यावी  त्यासाठी आवश्यक फॉर्म देखील आपण भरू शकता.
मागील तीन वर्षात गुलाबी बोंड अळीने सर्वदूर हाहाकार माजवला होता. हजारो हेक्टरवरील हिरवी कपाशी फेकून द्यायची वेळ आपल्यावर आली होती. बोंडअळीच्या त्रासाचे व्हिडिओ व्हॉटसअपवर व्हायरल झाले होते. या बोंड अळीला विषकन्या म्हणावे कि काय असे सर्वांना वाटत होते!

दरम्यान गुलाबी बोंड अळीला आळा घालण्यासाठी आम्ही "पिंक्या" नावाने कामगंध सापळे उपलब्ध करून दिले. या सापळ्यांची क्षमता अतिशय उत्तम असल्याने अनेक शेतकरी बांधवांना गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणात चांगली मदत झाली. पिंक्याची वाढीव मागणी पूर्ण करणे अतिशय जिकरीचे ठरले होते.
येत्या हंगामात देखील गुलाबी बोंड अळीचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने प्रत्येक कापूस उत्पादकास पिंक्या सापळ्यांची गरज पडणार आहे. अचानक मागणी वाढल्यास पुरवठा करणे कठीण होते हि बाब लक्षात घेवून आम्ही हे सापळे वेळेअगोदर उपलब्ध करून देत आहोत.
ज्या शेतकरी बांधवांनि कापूस लागवड करण्याचे ठरवले आहे त्यांनी कापसात लागणारा हा सापळा आजच जवळच्या कृषीकेंद्रा कडून मागवून ठेवावा. 

 

टीप: सापळ्याचे ल्युअर (आत लावायची गोळी) थंड व कोरड्या जागी ठेवावेत जेणे करून त्यांची क्षमता टिकून राहील. ज्या शेतकरी बांधवांकडे कापसाचा साठा करून ठेवला आहे त्यांनी साठवणीच्या ठिकाणी कमीत कमी एक सापळा लावून ठेवावा जेणे करून कापसाला लागून आलेल्या कोषातील पतंग बाहेर पडल्यास लगेच सापळ्यात अडकतील व प्रजनन करू शकणार नाहीत. पुढील हंगामासाठी प्रत्येक शेतकरी बांधवाने हि काळजी अवश्य घ्यावी.

 

  

या पिकासाठी पाटील बायोटेक तंत्रज्ञान उपलब्ध आहे.

तंत्रज्ञान म्हणजे काय हे जाणून घेण्यसाठी

इथे क्लिक करा.

Back to blog