डाळींबाच्या बागेत फिरता फिरता...

डाळींबाच्या बागेत फिरता फिरता...

डाळिंबात पाटील बायोटेक तंत्रज्ञान कमालीचे यशस्वी ठरले आहे. लागवडीची पूर्व तयारी, वाण, पाणी व्यवस्था, खतांचे नियोजन, संजीवन तालिका, फवारणी ची कोष्टके, बहर धरणे, छाटणी व्यवस्थापन, फळांची काढणी व विक्री असा संपूर्ण समतोल या तंत्रज्ञानातून साधला जातो. आमचे प्रतिनिधी शेतात प्रत्यक्ष भेट देवून मार्गदर्शन करतात, आपल्याला तंत्रज्ञान हवे असल्यास इथे  दिलेला फॉर्म नक्की भरावा. डाळींबाच्या बागेत फिरता फिरता...या लेखात आम्ही पानांवर दिसणाऱ्या लक्षणांचा काय अर्थ लावायचा? या प्रश्नाचे उत्तर दिलेले आहे. लेख वाचण्यासाठी खाली स्क्रोल करावे. 

 

आमच्या तज्ञांच्या अनुभवानुसार डाळींबाच्या बागेत फिरता फिरता खालील निरीक्षणे घेवून अनुमान काढता येतात. 

 • जुनी पाने पिवळी पडतात: नत्राची कमतरता झाल्यास हे लक्षण दिसून येते. १ % युरिया सोबत ०.५ मिली प्रती लिटर फ़ोलिबिओनची फवारणी केल्यास हि कमतरता दूर होते. फवारणी संपूर्ण झाडावर व दाट करावी. 
 • पानाची टोके पिवळी पडतात, नवीन पाने कमी रुंदीची रहातात. कधी कधी पाने पिवळी झाल्यावर तांबूस होतात: हि स्पुरद म्हणजेच फोस्फरस कमतरतेची लक्षणे आहेत.  फोसिड ठिबक द्वारा देणे, एकरी १ किलो
 • जुनी पाने कडे कडून शिरेकडे पिवळी होतात: हे पालाश कमतरतेचे लक्षण असून अमृत गोल्ड ०-०-५० म्हणजेच सल्फेट ऑफ पोटाश ठिबक द्वारा, एकरी १ किलो च्या दराने द्यावे. 
 • पानांवर पिवळी-गुलाबी छटा दिसते, काही भाग गडद विटकरी रंगाचा होतो. फुलगळ जास्त होते: हि कॅल्शिअमची कमतरता अतिशय घातक असून कॅलनेट एकरी ५ किलो ठिबकद्वारा दिल्याने समस्या सुटू शकते.
 • पाने पिवळसर राखाडी होतात:माग्नेशियमच्या कमतरते मुळे दिसणारी हि लक्षणे ह्युमॅग १० किलो प्रती एकर ठिबकने दिल्यास दूर होऊ शकतात. 
 • नवीन पानांच्या शिरा पिवळ्या होतात व बुरशीजन्य रोग दिसू लागतात: गंधकाची कमतरता झाल्याने अशी लक्षणे दिसतात. रीलीजर ३ किलो प्रती एकर दिल्याने हे टाळता येते.
 • पानांची वाढ अनियमित असते, टोकाकडील अंकुराचा भाग वाळतो: तांब्याच्या  कमतरते मुळे दिसणारे हे लक्षण घालवण्यासाठी मायक्रोडील ग्रेड २ ची फवारणी, २ मिली प्रती लिटर दराने करावी. कॉपर सल्फेट च्या फवारणीने दुष्परिणाम होऊ शकतात त्यामुळे मायक्रोडील ग्रेड २ हा उत्तम पर्याय आहे. 
 • नवीन पालवीतील शिरांमधील भाग पिवळा पडतो पण शिरा हिरव्या रहातात: लोहाच्या कमतरतेची हि लक्षणे दूर करण्यासाठी मायक्रोडील एफ ई १२ ची ०.५ ग्राम प्रती लिटर दराने दाट फवारणी करावी. 

 

 

 • सर्व शिरा हिरव्या राहून पाने जाळीदार पिवळी पडतात: मंगलधातूची कमतरता दूर करण्यासाठी मायक्रोडील ग्रेड २, फवारणी तून द्यावे. मात्रा १.५ मिली प्रती लिटर
 • शेंडे चुरगळलेली दिसतात, खोडास, पानास किंवा फळास तडे जातात: हि एक गंभीर समस्या असून मोठे नुकसान होऊ शकते. हि बोरॉनची कमतरता असून मायक्रोडील बी २० ची फवारणी १ ग्राम प्रती लिटरच्या दराने करावी.

 

 

 • फांदीच्या टोकावर पर्ण गुच्च्छ तयार होतात. पानांचा आकार लहान व अरुंद रहातो: हि झिंक म्हणजे जस्ताची कमतरता असून मायक्रोडील झेड १२ ची १ ग्राम प्रती लिटर च्या दराने फवारणी करावी. 

 

 

या पिकासाठी पाटील बायोटेक तंत्रज्ञान उपलब्ध आहे.

तंत्रज्ञान म्हणजे काय हे जाणून घेण्यसाठी

इथे क्लिक करा.

Back to blog