डाळिंबात पाटील बायोटेक तंत्रज्ञान

डाळिंब हे पिक कोणत्याही प्रकारच्या जमिनीत वाढू शकत असले तरी अर्ध शुष्क आणि शुष्क प्रदेश याला जास्त मानवतो. उष्ण, शुष्क व कोरड्या वातावरणा टिकून रहायची या पिकाची क्षमता वाखाणण्याजोगी आहे. वातावरणातील बदलांचा ते सहज सामना करते. कमीत कमी खर्च, वाढत जाणारी उत्पादकता, काढणीपश्चात टिकून रहायची क्षमता, औषधी गुणधर्म, रसरशीतपणा व जलसिंचनात अडचणी आल्या तरी निद्रेत जाण्याची त्याची क्षमता यामुळे येत्या वर्षात या पिकाच्या लागवडीखालील क्षेत्र वाढत जाणारे आहे. याच्या उत्पादनात भारत अग्रेसर असून गेल्या दशकात याच्या एकूण क्षेत्रात भरीव वाढ झाली आहे. निर्यातीचा वेग साडेतीन पटीने वाढला आहे हि बाब विशेष आहे. डाळिंबातून दर्जेदार पोषक व औषधी तत्व प्राप्त होत असल्याने जगभरात या फळाच्या सेवनात भरीव वाढ होत आहे

महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंध्रप्रदेश, तेलंगाना, मध्यप्रदेश, तामिळनाडू व राजस्थान या राज्यात डाळिंबाची लागवड व्यावसायिक पातळीवर केली जाते. येत्या काळात या पिकाचे क्षेत्र जसे वाढेल तसे यात मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण होणार आहे शिवाय काढणीपश्चात तंत्रज्ञान व प्रक्रिया उद्योगांच्या माध्यमातून यापासून विविध उत्पादने तयार होत आहेत.

पण आता स्पर्धा वाढली आहे. जिद्द, कष्ट व अभ्यासू वृत्ती नसली तर यात मोठा मनस्ताप होतो. अनेकांनी वर्षानुवर्षे जपलेल्या बागांवर बुलडोझर फिरवले आहे.  

पण पाटील बायोटेक तंत्रज्ञान डाळींबात खूपच यशस्वी झाले. लागवडीची पूर्व तयारी, वाण, पाणी व्यवस्था, खतांचे नियोजन, संजीवन तालिका, फवारणी ची कोष्टके, बहर धरणे, छाटणी व्यवस्थापन, फळांची काढणी व विक्री असा संपूर्ण समतोल या तंत्रज्ञानातून साधला जातो. आमचे प्रतिनिधी शेतात प्रत्यक्ष भेट देवून मार्गदर्शन करतात, आपल्याला तंत्रज्ञान हवे असल्यास इथे  दिलेला फॉर्म नक्की भरावा. डाळींबावरील आमचे अन्य लेख वाचण्यासाठी खाली स्क्रोल करावे.

 

शेतकरी मित्रांसाठी इथे निवडक पुस्तकांच्या लिंक्स देत आहे. हि पुस्तके एकदा वाचून काढावीत व नंतर अधून मधून चाळत रहावीत. यातून तुमची डाळिंब शेती नक्कीच प्रगती पथावर राहील. डाळिंबावर प्रक्रिया करून दाणे व ज्यूस बनवता येतो. त्यातून प्रगती साधने शक्य आहे.
 
पुस्तके खरेदी करण्यासाठी फोटोवर क्लिक करावे
  

पाटील बायोटेक तंत्रज्ञानावर आधारित डाळिंब बागेचे फोटो देत आहे. बाग असावा तर असा...भरपूर उत्पादन देणारा!